शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या अपमानाची आठवण, भाजपानं सुनावलं; जे.पी नड्डांचं खरगेंना खरमरीत पत्र
2
मुख्यमंत्रिपदासाठी महायुतीत तीन नावे; भाजपाकडून कोणाचे नाव?
3
...तर मला फासावर लटकवा, जयच्या मृत्यूचं राजकारण करू नका; अमोल मिटकरींचं मोठं विधान
4
‘महाविकास’च्या जागावाटप चर्चेला सुरुवात; चर्चा सलग तीन दिवस सुरू राहणार
5
IND vs BAN : हिटमॅन Rohit Sharma चा पुन्हा फ्लॉप शो!  
6
NPS Vatsalya: दर महिन्याला ₹१००० गुंतवा, मुलांच्या रिटायरमेंटला मिळतील ₹३.८ कोटी; दीड लाखांचं पेन्शनही
7
धक्कादायक! उलट्या दिशेने धावली कोलकात्याहून अमृतसरला जाणारी ट्रेन, ड्रायव्हरला समजल्यावर...  
8
'बिग बॉस मराठी'साठी तरूण होस्ट हवा होता! केदार शिंदेंचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले- "महेशदादाला..."
9
देशात कसं लागू होणार 'एक देश, एक निवडणूक'; कॅबिनेट मंजुरीनंतर आता पुढे काय? जाणून घ्या
10
यंदाच्या निवडणुकीतून राज्यात किती जणींना मिळणार आमदार होण्याची संधी? २०१९ मध्ये २४ महिलांना मिळाली आमदारकी
11
मुंबईतील 'या' म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश
12
स्मिता पाटीलच्या लेकाचं करिअर वाचवण्यासाठी सलमान आला धावून, प्रतिक बब्बर म्हणाला- "त्याने मला सिकंदर सिनेमात..."
13
अरेच्चा! पॅरिस विमानतळावरच सुरु झाली हास्यजत्रेची रिहर्सल, टीमचा आता अमेरिका दौरा
14
‘वर्क वेल’ बनली जिल्हा बँकांची ‘लाडकी कंपनी’ सहकारातील भरतीचा घोळ; बँक म्हणते, ‘निविदा भरा’
15
बिहारमधील नवादा येथे गावगुंडांचा धुमाकूळ, गोळीबारानंतर दलितांची ८० घरं जाळली, मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात
16
मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणी वेगळं वळण; हृदयविकारानं मृत्यू नाही, तर...
17
तुम्ही Tupperware नाव ऐकलंच असेल! ₹५८६० कोटींचं कर्ज; कंपनी झाली दिवाळखोर, कारण काय?
18
किरण रावनं टाकलं आमिर खानच्या पावलांवर पाऊल, 'लापता लेडीज' आता या देशात वाजणार डंका
19
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव; शेतकऱ्यांबद्दल काय म्हणाले?
20
US Fedral Reserve नं कमी केले व्याजदर, शेअर बाजारात दिसू शकते तेजी; आणखी काय परिणाम होणार

Independence Day 2024: स्वतंत्र भारतातला तरुण 'टेन्शन फ्री' व्हावा म्हणून कपिल देव यांनी दिला अनमोल सल्ला!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 10:57 AM

Independence Day 2024: १५ ऑगस्ट रोजी आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो, मात्र आज आपण नैराश्य, ताण, वाद यांच्या बंधनात अडकलो आहोत; त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग!

भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. याचाच अर्थ आपल्या देशात तरुणांची संख्या जास्त आहे. म्हणजेच देशाला प्रगती पथावर नेण्यासाठी होतकरू, सक्षम तरुणांची पुढची फळी तयार आहे. मात्र हेच तरुण जेव्हा नैराश्य, ताणतणावाचे अवडंबर करत जबाबदारी झटकतात, आत्मसमर्पण करून मोकळे होतात किंवा नशाबाज होऊन, रिकामटेकडेपणा करून समाजासाठी उपद्रवी मूल्य होतात, तेव्हा देशाला तरुणांचा देश संबोधताना जीभ चाचरते. याबद्दलच राग व्यक्त केला आहे सुप्रसिद्ध क्रिकेट खेळाडू कपिल देव यांनी. 

एका कार्यक्रमात कपिल देव यांच्या संभाषणाचा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहिला. अवघ्या एक मिनिटाच्या व्हिडीओमध्ये त्यांनी तरुण पिढीची कानउघडणी तर केली आहेच शिवाय त्यांच्या यशाचं गुपीतही सांगितले आहे. 

ते म्हणतात, 'हल्ली आयपीएल मॅच खेळणारे खेळाडू सतत तणावाखाली असतात. आमच्यावर खूप प्रेशर आहे असे म्हणतात. यावर उपाय काय असे मला विचारतात तेव्हा मी त्यांना सांगतो, 'नका खेळू!' कारण, तणाव घेऊन केली जाणारी गोष्ट कधीच यशस्वी होत नसते. आम्ही सुद्धा कित्येक मॅच खेळल्या, पण कधी तणाव घेऊन खेळल्याचे आठवत नाही. कारण आम्ही खेळायचो ते आनंदासाठी. त्यातही प्रतिपक्षाशी स्पर्धा होती, चढाओढ होती, पण तणावाचे वातावरण अजिबात नव्हते. प्रयत्नांची शर्थ करून खेळणे एवढेच आमचे कर्तव्य होते व ते आम्ही चोखपणे बजावत असू. 

याउलट आताची शाळकरी, महाविद्यालयीन मुलंसुद्धा म्हणतात, आम्हाला टेन्शन येतं, डिप्रेशन येतं, प्रेशर येतं...! वातानुकूलित वर्गात बसून, शिक्षकांचा मार न खाताही मुलं या गोष्टींना सामोरे जातात, हे ऐकून मला प्रश्न पडतो, यांचे आई वडील कमावतात, ते यांची फी भरतात, यांना हवं नको ते सगळं पुरवतात, मग फक्त अभ्यासाची जबाबदारी मुलांवर असताना त्यांना प्रेशर घेण्याचे कारण काय हेच कळत नाही. हे पाश्चिमात्य शब्द आपले नाहीच, कधी नव्हतेच! 

मी स्वतः शेतकरी आहे आणि मी क्रिकेट खेळलो ते माझ्या आनंदासाठी. जोवर तुम्ही तुमचा आनंद शोधत नाही, तोवर हे भयावह शब्द तुमचा पाठलाग सोडणार नाहीत. जे काम कराल ते आनंदाने करा. हे शब्द आपले नाहीत, ते विसरून जा. कामाप्रती असलेले समर्पण तुम्हाला निराश होण्याची संधी देणार नाही. अपयश आले तरी आपण पूर्ण प्रयत्न केले असल्याचे समाधान तुम्हाला नवीन यश संपादन करण्याची प्रेरणा देत राहील. 

आनंद शोधण्याचे अनेक क्षण आपल्या संस्कृतीने आपल्याला दिले आहेत. इथला प्रत्येक दिवस उत्सवाचे रूप घेऊन येतो. तसे असताना दुःखी, कष्टी राहून कुढत आयुष्य जगण्यापेक्षा प्रयत्नांचे पंख लावा आणि आत्मानंद घ्या, असे सांगण्यावर कपिल देव यांचा भर दिसून येतो. हेच सूत्र त्यांनी त्यांच्या आयुष्यात अनुसरले आणि ते यशस्वी झाले. त्यांचा आदर्श बाळगून आपल्यालाही मार्गक्रमणा करायला हवी. बरोबर ना?

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीMental Health Tipsमानसिक आरोग्यKapil Devकपिल देव