शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

Indian Temple Travels: भारतीय मंदिरांची 'ही' वैशिष्ट्ये वाचून तुम्हीसुद्धा आश्चर्यचकीत व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 1:53 PM

Indian Temple: यापैकी किती मंदिरांना तुम्ही प्रत्यक्ष भेट दिली आहे आणि किती मंदिरं तुमच्या बकेट लिस्टमध्ये आहेत, याची यादी करा आणि प्रत्यक्ष अनुभव घ्या!

नाविन्याच्या शोधात आपण जगाचा प्रवास करतो, पण 'काखेत कळसा नि गावाला वळसा' हेच विसरतो. आपला देश वैविध्यतेने नटलेला आहे. त्यातही जुने स्थापत्यशास्त्र पाहण्यासारखे, अभ्यासण्यासारखे आहे. येथील पुरातन वास्तू आपली संस्कृती आणि इतिहास यांची साक्ष देतात. आजच्या प्रगत युगातील सुसज्ज यंत्रणेसह असलेल्या स्थापत्यकरांनाही हेवा वाटावा अशी ऐतिहासिक ठिकाणे भारतात आहेत. त्यावर सातत्याने संशोधन सुरु आहे. याचाच एक भाग म्हणजे प्राचीन मंदिरे. सुबक, सुंदर, आखीव, रेखीव मंदिरांना तत्कालीन स्थापत्यकारांनी, वास्तुविशारदांनी जो काही 'युनिक' टच दिलेला आहे, तो अवाक करणारा आहे. समाज माध्यमावर अशीच एक वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांची यादी वाचनात आली, ती पुढीलप्रमाणे-

वर्षातून एकदाच सूर्यप्रकाश घेणारी मंदिरे:

१. नागलापुरम वेद नारायण स्वामी मंदिर२. कोल्हापूर लक्ष्मी मंदिर३. बंगलोर गावी गंगाधर मंदिर४. अरिसेवेली सूर्य नारायण मंदिर५. मोगलेश्वर६. कोदंडरमा कडप्पा जिल्हा

सतत पाण्याचा प्रवाह असलेली मंदिरे

१. महानंदी२. जंबुकेश्वर३. रामलिंगेश्वर झरा४. कर्नाटक कमंडला गणपती५. हैदराबाद काशी बग्गे शिवालय६. मल्लेश्वरम.. बंगलोर७. राजराजेश्वर बेल्लमपल्ली शिवालय८. सिद्धगंगा टुमकूर

मंदिरांना अखंड ज्योतीच्या रुपात दर्शन

१. ज्वालामुखी.. ज्वालादेवी२. अरुणाचल ईश्वर३. मंजुनाथ

चित्तथरारक कलहस्तेश्वर.

पूजेसाठी समुद्राच्या मागे जाणारे मंदिर१. गुजरात निशकलंक महादेव२. पुंगनूर शिवालय  जेथे 40 वर्षांतून एकदा, समुद्र जलपूजा आयोजित केली जाते.

देवीची वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे 

१. आसाम कामाक्या देवी२. केरळ दुर्गा माता

रंग बदलणारे मंदिर

१. अतिशया विनायक मंदिर  तामिलनाडू, जे उत्तरायण आणि दक्षिणायणासाठी एकदाच रंग बदलते.२. गोदावरी पंचारा सोमेश्वर मंदिर, जे पौर्णिमेला पांढरे आणि अमावस्येला काळे होते.

सतत वाढणारी मूर्ती

१. कणिपकम२. यागंती बसवण्णा३. बसवानागुडी, बंगलोरचा बसवा४. बिक्कावोलू लक्ष्मी गणपती

मंदिर जे ६ महिन्यातून एकदा उघडतात

१. केदारनाथ२. बद्रीनाथयेथे ६ महिने दार बंद करून दिवा लावला जातो.३. गुह्या काली मंदिर

वर्षातून एकदा उघडणारे मंदिर

१. अमरनाथ मंदिर२. हसनंबा मंदिर हसन..इथे वर्षभर ठेवलेला प्रसाद खराब न होता ताजा राहतो.

बिजिली महादेव मंदिर  हिमाचल प्रदेश ज्यावर १२ वर्षांतून एकदा वीज पडते.

सुंदर कृष्ण मंदिर 

१. केरळ श्री कृष्ण मंदिर..२. वृंदावनचा राधाकृष्ण

मंदिर जिथे पाण्यात दिवा लावतात : घड्या घाट माताजी मंदिर..

मंदिर जेथील देवता माणसाच्या भौतिक रूपासारखे दिसते 

१. हिमाचल नरसिंह मंदिर२. इष्टा कामेश्वरी. श्रीशैला

सावली पहावी अशी मंदिरे 

१. छाया सोमेश्वर.. खांबाची सावली दिसते.२. हम्पी विरूपाक्ष.. टॉवरची सावली विरुद्ध दिशेने उगवते..

पाण्यात वसलेले मंदिर 

१.नेपाळ विष्णू (हजार टन मूर्ती)२. तिरुपती बालाजी३. अनंता पद्मनाभ केरळ४. रामेश्वर५. कांस्य६. चिलकुरी बालाजी७. पंढरीनाथ८. बदराचलम९. अण्णावरम

जगन्नाथ पुरी मंदिराची वैशिष्ट्ये 

मंदिरावरुन पक्षी उडत नाहीत.मंदिराचे आत समुद्राची गर्जना नाही.कळस व घुमटाची सावली पडत नाही.सुवासिक प्रसाद देवाला समर्पित..

कळस हलणारे मंदिर : आळंदी संत ज्ञानेश्वर माऊली समाधी मंदिर पंढरपूरला पालखी निघते तेव्हा मंदिराचा कळस हालतो...

आपली भारतीय मंदिरे खूप वैशिष्ट्यपुर्ण आहेत. भारतीय खंडात हजारो खास मंदिरे आहेत. सदर माहिती वाचून तुम्हीसुद्धा या मंदिरांच्या पाहणीचा ध्यास घ्या आणि पुढच्या पिढीकडे हा समृद्ध वारसा हस्तांतरित करा!

टॅग्स :Templeमंदिर