शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : 'अमित शहांना पवार, ठाकरेंना राजकीयदृष्ट्या संपवण्याचे डोहाळे लागलेत'; ठाकरे गटाचा सामनातून हल्लाबोल
2
सदोष वेल्डिंग, कमकुवत ढाचामुळे कोसळला पुतळा; चौकशी समितीच्या अहवालात निष्कर्ष
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी करणार्‍यांना लाभाच्या संधी मिळतील; नशिबाची साथ लाभेल
4
पोर्न स्टार रिया बर्डे निघाली बांगलादेशी, बनावट कागदपत्रांसह भारतात राहिल्या प्रकरणी केली अटक
5
विधानसभा निवडणुकीचे वेध; आयोगाची आज पक्षांशी चर्चा, मुख्य सचिव, वरिष्ठ अधिकारी यांची बैठकही घेणार
6
शेतमजूर, कामगारांच्या किमान वेतनात वाढ; केंद्र सरकारचा निर्णय
7
अग्रलेख : विकास किती पाण्यात?; ‘स्मार्ट सिटी’ बनणाऱ्या शहरांना किंचितही अधिकसा पाऊस सोसवेनासा
8
बिल्किस बानो प्रकरणी फेरआढाव्याची गरज नाही; सुप्रीम काेर्टाने फेटाळली गुजरात सरकारची याचिका
9
मेडिकलच्या तीन मुलींनी घेतली सहा जणांची रॅगिंग; मुली एमडी अभ्यासक्रमाच्या
10
लोकमतच्या व्यासपीठावर सर्वपक्षीय नेत्यांची जुगलबंदी; विधानसभेनंतर आणखी पक्ष आमच्याकडे येतील : मुनगंटीवार
11
ड्युटीवरून गायब झालेले १२ पोलिस निलंबित; आरबीआयच्या संरक्षणाची होती जबाबदारी
12
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
13
कॅन्सरवरील उपचार सुसह्य होण्यासाठी आता ‘डॉग थेरपी’; टाटा रुग्णालयात मुलांसाठी अनोखा उपक्रम
14
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
15
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
16
शासकीय रुग्णालयांत हृदयविकारांवर अत्याधुनिक उपचार; जे.जे. मध्येही आता ईपी लॅब, ३९ कोटी मंजूर
17
नऊ प्रकल्पांच्या निधीची चिंता मिटली; एमएमआरडीएला ‘पीएफसी’कडून ३१,६७३ कोटींचे कर्ज मंजूर
18
नवी मुंबई विमानतळ सुखोईच्या लँडिंगसाठी सज्ज; सिडकोचे विजय सिंघल यांची माहिती
19
‘काैटुंबिक हिंसाचार कायदा सर्व धर्मांतील महिलांना लागू’
20
मधुमेह, जीवनसत्त्वे, रक्तदाबावरील गोळ्यांसह ५३ औषधे ठरली निकृष्ट दर्जाची

पितृपक्षात इंदिरा एकादशी: कसे करावे व्रत? पाहा, शुभ मुहूर्त, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 12:51 PM

Indira Ekadashi In Pitru Paksha 2024: पितृपक्षात येणाऱ्या इंदिरा एकादशीचे व्रताचरण करायची सोपी पद्धत आणि काही मान्यता जाणून घ्या...

Indira Ekadashi In Pitru Paksha 2024: चातुर्मास सुरू आहे. यातील भाद्रपदाचा वद्य पक्ष सुरू आहे. पितृ पक्षाचा काळ सुरू आहे. मराठी वर्षात प्रत्येक महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि वद्य पक्षात एकादशीचे व्रत केले जाते. पितृपक्षात येणाऱ्या एकादशीला इंदिरा एकादशी असे म्हटले जाते. पितृपक्षातील इंदिरा एकादशीचे व्रत कसे करावे? जाणून घेऊया...

पितृपक्षाच्या कालावधीत पूर्वजांचे श्रद्धापूर्वक स्मरण करून त्यांच्या नावाने श्राद्ध तर्पण विधी केला जातो. पितृदोष करून पूर्वजांचे शुभाशिर्वाद मिळण्यासाठी या पितृपक्ष पंधरवड्यात श्राद्ध विधी केले जातात. याच कालावधीत येणाऱ्या एकादशीला विशेष महत्त्व प्राप्त होते. या एकादशीचे व्रत करून आपले पुण्य पूर्वजांना दान केले जाते. यामुळे त्यांना मोक्षप्राप्ती होते, अशी मान्यता आहे. यंदा शनिवार, २८ सप्टेंबर २०२४ रोजी इंदिरा एकादशी आहे. २८ सप्टेंबर रोजी दुपारी ०२ वाजून ४९ मिनिटांनी एकादशी तिथी समाप्त होत आहे. वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशी दिनी भगवान श्रीविष्णूंचे पूजन केले जाते.

महाभारतात उल्लेख, श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला सांगितले व्रत महात्म्य

आपले पुण्य पूर्वजांना दान करून त्यांच्या मोक्षप्राप्तीचा मार्ग प्रशस्त आणि सुकर व्हावा, यासाठी हे व्रत केले जाते, अशी मान्यता आहे. महाभारतात या एकादशीला उल्लेख आल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्ष श्रीकृष्णांनी या व्रताबाबत आणि त्याच्या महत्त्वासंदर्भात धर्मराज युधिष्ठिराला सांगितले होते, अशी मान्यता आहे. या व्रतामुळे पूर्वजांना यमलोकातून, पितृलोकातून मुक्तता मिळते, असे मानले जाते. या व्रतामुळे पूर्वजांना यमलोकातील अनन्वित यातना भोगाव्या लागत नाहीत. तर, पितृपक्ष पंधरवड्यात येणाऱ्या या इंदिरा एकादशीला पृथ्वीतलावर वारसांनी केलेले पुण्य पूर्वजांच्या नावे दान करावे. या पुण्यदानामुळे पूर्वज नरकलोकातून स्वर्गलोकात जातात, अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते. 

इंदिरा एकादशीचे व्रतपूजन कसे करावे?

इंदिरा एकादशी व्रताच्या पूजन विधीबाबत पद्म पुराणात उल्लेख आढळतो. हे व्रत मनापासून आचरावे, असे सांगितले जाते. इंदिरा एकदशीचे व्रताचरण करणाऱ्यांनी पहाटे ब्रह्म मुहूर्तावर उठून नित्यकर्मे उरकून घ्यावीत. इंदिरा एकादशी व्रत आणि श्रीविष्णू पूजनाचा संकल्प करावा. पूर्वजांचे स्मरण करून श्रीविष्णूंचे आवाहन करावे. श्रीविष्णूंची चौरंगावर स्थापना करावी. यानंतर गंगाजल, फुले, गंध, अक्षता अर्पण करावे. श्रीविष्णूंना तुळस अत्यंत प्रिय असल्यामुळे या व्रतपूजनात याचा प्रामुख्याने वापर करावा. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्रीविष्णूंची आरती करावी. मनापासून नमस्कार करावा. शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. यथाशक्ती दान करावे. यानंतर पूर्वजांच्या नावाने श्राद्ध विधी करावा. श्रीविष्णूंकडे पूर्वजांसाठी प्रार्थना करावी.

इंदिरा एकादशीचे व्रत करताना ‘या’ गोष्टी करू नका

इंदिरा एकादशीचे व्रत आचरणाऱ्यांनी काही नियमांचे पालन करावे, असे सांगितले जाते. या व्रताचरण काळात मनात कोणत्याही प्रकारचा संशय ठेऊ नये. व्रतदिनी सात्विक आहार घ्यावा. शक्यतो कांदा, लसूणयुक्त उग्र पदार्थ खाणे टाळावे. एकादशी दिनी केलेल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला सकाळी स्नानदिक कार्ये आटोपल्यानंतर एकादशी व्रत सांगतेचा संकल्प करून तो पूर्ण करावा. यावेळी श्रीविष्णूंची मनोभावे पूजा करावी. व्रताच्या यशस्वीतेसाठी श्रीविष्णूंचे आभार मानावेत. व्रत आचरण काळात कोणाबाबतही अपशब्द बोलू नयेत. तसेच व्रताचरण करताना अनावधानाने झालेल्या चुकांबाबत श्रीविष्णूंकडे क्षमायाचना करावी.

दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या तिथीला अन्न दान करून उपास सोडावा

इंदिरा एकादशीचे व्रत पितृ पक्षात येते. त्याचा उपवास विशेषतः एखाद्याच्या मृत पूर्वजांच्या, पूर्वजांच्या उद्धारासाठी केला जातो, असे म्हटले जाते. म्हणून इंदिरा एकादशीला इतर एकादशीच्या उपवासात विशेष स्थान आहे. या एकादशी व्रताचे पारणे द्वादशीच्या दिवशी केले जाते. इंदिरा एकादशीच्या व्रताच्या आदल्या दिवशी सूर्यास्तापूर्वी अन्न घ्यावे. एकादशीच्या दिवशी वरचेवर फराळ न करता ठराविक वेळी फलाहार करावा. दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या तिथीला अन्न दान करून उपास सोडावा, असे सांगितले जाते.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. 

टॅग्स :pitru pakshaपितृपक्षPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३spiritualअध्यात्मिकchaturmasचातुर्मास