शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांसमोर दिले सूचक संकेत 
3
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
4
Women's T20 World Cup : कॅप्टन Fatima Sana ची अष्टपैलू खेळी; लंकेविरुद्ध पाकचा 'डंका'
5
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
6
मुलीच्या अपहरणाची तक्रार देणारा बापच निघाला विकृत, वडिलांच्याच अत्याचाराला कंटाळून मुलीने सोडले होते घर
7
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
8
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
9
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
10
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
11
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
12
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
13
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
14
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
15
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
16
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
17
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
18
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
20
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार

Inspirational Story:अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात; वाचा दोन लहान मुलांची मार्मिक गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 4:46 PM

Inspirational Story: एखादी गोष्ट आपल्याला जमणार नाही हे दुसऱ्यांना वाटते तेव्हा ती शक्य करून दाखवण्यात खरी मजा असते, त्यासाठी पाळा गोष्टीतले दोन नियम!

दोन लहान मुले खेळता खेळता गावाबाहेरच्या परिसरात गेली. त्यांच्यात एक होता आठ वर्षांचा तर दुसरा होता दहा वर्षांचा! खेळण्याच्या नादात गाव मागे राहिल्याचा त्यांना विसर पडला. सायंकाळ होत आली, तशी त्यांना घराची आठवण आली आणि पावलं घराकडे वळू लागली. घरी येत असताना एका विहीरीसदृश्य खड्ड्यात मोठा मुलगा पडला. धाकटा मुलगा घाबरला. सूर्य मावळत होता. अंधार होऊ लागला होता. ती जागा पूर्णपणे निर्मनुष्य होती. मदतीला जवळ कोणीच नव्हते. धाकट्याच्या मनात नाना शंका येत होत्या. विहिरीत पडलेला मुलगा आक्रोश करत होता. 

धाकट्याने जवळपास शोधाशोध केली. त्याला मोठ्या दोरीला बांधलेली एक जुनाट बादली दिसली. त्याने मोठ्याला हाक मारली आणि सांगितलं, मी बादली आत टाकतोय, ती धरून तू वर ये. मी तुला वर खेचून घेतो. मोठा म्हणाला वेडा आहेस का? मला वर काढण्याऐवजी तूच खाली ओढला जाशील. धाकटा म्हणाला, मी सांगतो ते कर. आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. 

मोठ्याने त्याचे ऐकले आणि धाकट्याने सर्व शक्ती एकवटून मोठ्याला विहिरीतून ओढून बाहेर काढले. दोघा मित्रांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. पण आता उशीर झाल्यामुळे घरच्यांनी विचारले तर काय सांगायचे असा त्यांना प्रश्न पडला. इथे त्यांचे आई बाबा चिंतातुर झाले होते. बराच शोध घेऊनही मुलांचा पत्ता लागत नव्हता म्हणून सगळे काळजीत होते. शेवटी मुलांनी गावात प्रवेश करताच बातमी त्यांच्या घरी पोहोचली. सगळे गावकरी गोळा झाले. मुलांना त्यांच्या पालकांनी जाब विचारला. मुलांनी खरं कारण सांगितलं. त्यांचे आई वडील म्हणाले, हे शक्यच नाही. त्यावर त्या गावातले एक वयोवृद्ध म्हणाले, 'ही मुलं सांगतात त्यात खोटं बोलण्याचा काही प्रश्न नाही. तसे असण्यामागे दोन कारणे असू शकतात. 

पहिले कारण, त्या मुलांकडे दुसरा पर्याय नव्हता आणि दुसरे कारण म्हणजे तसे करण्यापासून त्यांना परावृत्त करणारे लोक तिथे नव्हते. म्हणून या मुलांनी अशक्य तेही शक्य करून दाखवलं. 

गोष्टीतून आपल्याला तात्पर्य हेच मिळते, की जेव्हा संकट येईल तेव्हा स्वतःवर विश्वास ठेवून शेवटचा पर्याय संपेपर्यंत प्रयत्न करत राहा आणि दुसरी गोष्ट म्हणजे  जे तुम्हाला तुमच्या ध्येयापासून परावृत्त करून, हे तुला जमणार नाही वगैरे सल्ले देतील तेव्हा कान बंद करून घ्या, अर्थात त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. तसे केले तरच तुम्हीसुद्धा या लहान मुलासारखे अशक्य ध्येय सुद्धा सहज शक्य करू शकाल!

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी