शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
2
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्कतव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
3
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
4
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
5
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
6
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
7
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
8
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
9
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
10
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
11
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
12
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
14
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
15
Vastu Tips: लक्ष्मीविष्णुंना प्रिय असलेले कमळ घरात लावल्याने होणारे आर्थिक लाभ जाणून चकित व्हाल!
16
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
17
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
18
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
19
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
20
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र

अपयशाची कारणे देण्यापेक्षा, अपयाशाची कारणे शोधा! - रतन टाटा!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: October 27, 2020 12:42 PM

ज्याला कर्तव्य करायचेच नसते, तो काहीही कारणे पुढे करून कर्तव्य करायचे टाळतो. याउलट मेहनती लोक अपयशाची कारणे न देता, अपयशाची कारणे शोधतात, त्यावर काम करतात आणि यशाचा मार्ग मोकळा करतात.

ठळक मुद्देलोखंडाला कोणीही तोडू शकत नाही, मात्र त्याला गंज लागला, तर तो निकामी होतो. ज्या गोष्टी परमेश्वर प्राप्तीला साधन रूप आहेत, त्याच अडचणीच्या आहेत, असे मानणारे लोक या जगात पुष्कळ आहेत.

ज्योत्स्ना गाडगीळ 

'कारणे द्या' या प्रश्नाचे शालेय वयात उत्तर दिले, की गपकन ५-६ गुणांची कमाई होत असे. तेव्हापासून, कठीण प्रश्न सोडून देत, सोप्या प्रश्नांसाठी कारणे देत राहण्याची मनुष्याला नकळत सवयच लागली. प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा आपल्या एका भाषणात म्हणाले होते, `लोखंडाला कोणीही तोडू शकत नाही, मात्र त्याला गंज लागला, तर तो निकामी होतो. म्हणून अपयश आले, तर वाईट वाटून हार पत्करण्यापेक्षा अपयशाची कारणे शोधा, त्यावर मात करा आणि भविष्याकडे यशस्वी वाटचाल करा.' 

आपल्या सभोवती असे अनेक लोक असतात, ज्यांना स्वत:च्या प्रश्नांची उत्तरे माहित असतात, परंतु ती त्यांना शोधायची नसतात. ते आळस करतात आणि नशीबाला दोष देत राहतात. दुसऱ्यांचे सगळे कसे चांगले, आपले कसे वाईट, हा विचार करण्यात आयुष्यातला बराच वेळ वाया घालवतात. लोकांमुळे आपली प्रगती कशी अडली, आपले नुकसान कसे झाले, आपण अपयशी कसे झालो, याबाबत लोकांना दोष देत राहतात. अशा लोकांना दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते, पण स्वत:च्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही! 

हेही वाचा : जेव्हा सगळं संपवून टाकावंसं वाटतं तेव्हा...; बांबू बियाणाची गोष्ट दाखवेल वाट

याउलट मेहनती लोक अपयशाची कारणे न देता, अपयशाची कारणे शोधतात, त्यावर काम करतात आणि यशाचा मार्ग मोकळा करतात. अशा लोकांची राष्ट्रविकासासाठी गरज असते. हाच धागा धरून संत तुकाराम महाराज म्हणतात, 

ढालतलवारे गुंतले हे कर, म्हणे मी झुंजा कैसा झुंजो।पोटी पडदाळे सिले टोप ओझे, हें तो झाले दुजे मरणमूळ।बैसविले मला येणे अश्वावरी, धावू पळू तरी कैसा आता।असोनि उपाय म्हणे हे अपाय, म्हणे हाय हाय काय करू।तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म, मूर्ख नेणे वर्म संतचरण।।

ज्याला कर्तव्य करायचेच नसते, तो काहीही कारणे पुढे करून कर्तव्य करायचे टाळतो. या टाळाटाळीची काही उदाहरणे महाराजांनी येथे दिली आहेत. एक रडतराव युद्धाचा प्रसंग आल्यावर काय म्हणतो पहा, त्याला लढण्यासाठी ढाल-तलवार दिली, घोड्यावर बसवले, डोक्याला टोप, अंगात चिलखत वगैरे संरक्षणात्मक पोशाख दिला, युद्धासाठी या सर्वांची मदत झाली असती, पण या शिपाई काय म्हणतो,  अहो, माझे हात ढालीने, तलवारीने गुंतून पडले आहेत. मी लढाई कशी करणार? या चिलखताची, या टोपाची केवढी अडचण झाली आहे? मला यानेच मरण येईल, मला याचेच ओझे झाले आहे. मला घोड्यावर बसविले आहे, माझ्यावर शत्रू धावून आले, तर मी पळून कसा जाऊ? म्हणजे लढायची गोष्ट दूरच! पळायचे कसे याचीच चिंता! 

हे उदाहरण देऊन तुकाराम महाराज म्हणतात, ज्या गोष्टी परमेश्वर प्राप्तीला साधन रूप आहेत, त्याच अडचणीच्या आहेत, असे मानणारे लोक या जगात पुष्कळ आहेत. तोंडाने नाम घेणे त्यांना अडचणीचे वाटते. हातांनी टाळ वाजविणे अडचणीचे वाटते. आपला देह हाच परमार्थाला सहाय्यभूत आहे, पण ते त्यांना कळत नाही. अशा लोकांना काय म्हणावे? स्वत:ला हे हीनदीन समजतात. खरोखर सर्वतोपरी हे ब्रह्मरूपच आहेत, पण त्यांना हे कळत नाही.

हेही वाचा : Sadguru Speech: 'मी काही दिवस सोशल मीडियावरून रजा घेतोय' असा मेसेज करून तर बघा...

टॅग्स :Ratan Tataरतन टाटा