शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
Daily Top 2Weekly Top 5

International Yoga Day 2024: जागतिक योगदिनासाठी २१ जून या तारखेचीच निवड का झाली? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 07:00 IST

International Yoga Day 2024: जागतिक योग दिन साजरा करून दहा वर्षे होत आली, पण त्यासाठी आजच्याच दिवसाची निवड का झाली असावी? ते जाणून घ्या!

आरोग्य ही खरी संपत्ती आहे. ही संपत्ती कमावली तर इतर गोष्टीही सहज साध्य करता येतात. योगाभ्यासाचे महत्त्व जनमानसात रुजावे म्हणून पंतप्रधान मोदींनी २७ सप्टेंबर २०१४ रोजी युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीमध्ये एक भाषण केले व त्यात ते म्हणाले, '' "योग ही भारताच्या प्राचीन परंपरेची एक अमूल्य देणगी आहे; ते मन आणि शरीराच्या ऐक्याचे प्रतीक आहे; मनुष्य आणि निसर्ग यांच्यातील सुसंवाद; विचार, संयम, पूर्तता; आणि आरोग्य कल्याणासाठी पूरक आहे. योग आपल्याला स्वतःचा शोध घेण्यास आणि निसर्गाशी जोडण्यास मदत करते. आपल्या बदलत्या जीवनशैलीत योगाभ्यास समाविष्ट करण्याच्या दृष्टीने जागतिक योग दिवस साजरा करावा आणि योग साधनेसंबंधी जनजागृती करावी." 

मोदींनी मांडलेल्या प्रस्तावाला संमती देत ''जागतिक योग दिन'' साजरा करावा असे ठरले, परंतु नेमका कोणता दिवस यावर चर्चा केली असता मोदींनी २१ जून ही तारीख सुचवली. कारण २१ जून हा वर्षातील मोठा दिवस असतो आणि योगाभ्यास दीर्घायुष्य देतो. १ डिसेंबर २०१४ रोजी, संयुक्त राष्ट्रसंघाच्या १७७ सदस्यांनी २१ जून हा दिवस "आंतरराष्ट्रीय योग दिवस" ​​म्हणून साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली.

पंतप्रधान मोदींचा हा ठराव ९० दिवसांच्या आत पूर्ण बहुमताने मंजूर करण्यात आला. सर्वात कमी कालावधीत पूर्ण बहुमताने मंजूर होणारा तो पहिला प्रस्ताव ठरला. या उपक्रमाला अनेक जागतिक नेत्यांचा पाठिंबा मिळाला.  (Internation Yoga Day 2024)

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मान्यवरांसह सुमारे ३६,००० लोकांनी २१ जून २०१५ रोजी नवी दिल्ली येथे पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ३५ मिनिटांसाठी २१ योगासने केली. या समारंभाने गिनीज बुकमध्ये विश्वविक्रम नोंदवला गेला. पंतप्रधानांच्या सक्रिय उपस्थितीमुळे योग दिनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आणि जगभरात लाखो लोकांनी योग दिवस साजरा केला आणि आनंदाची बाब म्हणजे आजही हा दिवस तितक्याच उत्साहाने सर्वत्र साजरा होत आहे!

टॅग्स :International Yoga Dayआंतरराष्ट्रीय योग दिनYogaयोगासने प्रकार व फायदे