शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

Janmashtami 2022: गोपाळकाल्याचा प्रसाद जरूर खा, मात्र प्रसाद घेतलेले हात धुवू नका; श्रीकृष्णाने सांगितले आहे कारण!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 12:22 PM

Janmashtami 2022: प्रसाद घेतल्यावर सरसकट आपण हात फार तर रुमालाला पुसतो, पण धुवत नाही; ही प्रथा कृष्णाने गोपाळकाल्यापासून कशी सुरु करून दिली ते वाचा!

गोपाळजन्माच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला साजरा करतात. यंदा कृष्णजन्म १८ ऑगस्ट आणि गोपाळकाला १९ ऑगस्टला आहे. त्यावेळी गोपाळकाल्याचा प्रसाद वाटला जातो. मात्र तो खाऊन झाल्यावर हात पाण्याने धुवू नये अशी अट घातली जाते. तसे सांगण्यामागे नेमके काय, हे जाणून घेण्यासाठी ज्योतिर्भास्कर जयंत साळगावर यांनी चितारलेला गोपाळकाला पाहू, म्हणजे वरील प्रश्नाचे उत्तर ओघाने मिळेलच!

गाईंना चारण्यासाठी आणि राखण्यासाठी सगळ्या सवंगड्यांसह बाळकृष्ण रानात जाई आणि दिवसभर वेगवेगळे खेळ खेळून नुसता हैदोस घाली. खेळून खेळून दमल्यावर बाळगोपाळांना भूकेची जाणीव होई आणि मग जेवण्यासाठी ते अगदी उतावीळ होऊन जात. काकुळतीला येऊन कृष्णसख्याला विनवीत, 

कान्होबा खेळ पुरे आता, मांडू रे काला, आवडी अनंता!

कृष्णाला काय तेच हवे असे. मग तोही काल्यासाठी तयार होई. सगळे मग धावत कदंबाखाली येत. तिथली जागा झटपट साफ करून रिंगण करून बसत. सगळे आपापल्या शिदोऱ्या कृष्णाच्या स्वाधीन करत. कृष्ण त्या मन लावून एकत्र करी. काय काय असे त्या शिदोरीमध्ये?

आणिती शिदोऱ्या आपापल्या, जया जैसा हेत तैशा त्या चांगल्या, शिळ्या विटक्या भाकरी, दही भात लोणी, मेळवोनी मेळा करी चक्रपाणी,एका जनार्दनी अवघ्या देतो कवळ, ठकविले तेणे ब्रह्मादी सकळ।

कोणी रात्रीची भाकरी, कांदा, चटणी आणलेली असे. तर कोणाचा दहीभात असे, कोणाला आईने लोणी दिलेले असे तर कोणी लोणचे आणलेले असे. तिथे गरीब श्रीमंत असा भेदभाव कृष्ण जरादेखील शिल्लक ठेवीत नसे. तो आधी ते सारे पदार्थ एक करी. मग सगळ्या सवंगड्यांना त्याचे समान वाटप करीत असे. मध्येच एखाद्याला आपल्या हाताने घास भरवीत असे. मध्येच कोणी त्यालाही आपल्या उष्ट्या हातो घास भरवी. अन तोही तो घास मोठ्या आवडीने गट्टम करत असे. 

एकमेकांना पहले आप, पहले आप असा आग्रहदेखील होई. प्रत्येकाशी समानतेची वागणूक कशी असावी, समता-समानता म्हणजे काय ते कृष्णाने या काल्यातून साऱ्या जगाला दाखवून दिले. नाथ महाराज लिहितात- 

वैकुंठीचा हरी, गोपवेष धरी, घेऊनि शिदोरी, जाय वना।धाकुले सवंगडे, संगती बरवा, ठाई ठाई ठेवा, गोधनाचा।बाळ ब्रह्मचारी, वाजरी मोहरी, घेताती हुंबरी, एकमेका।दहीभात भाकरी, लोणचे परोपरी, आपण श्रीहरी वाढते।श्रीहरी वाढले, गोपाळ जेवले, उच्छिष्ट सेवले, एकाजनार्दनी।

कृष्णाचा रुबाब काय विचारता? एकाने आपल्या कांबळ्याची घडी करून ती खास कृष्णासाठी अंथरली. त्यावर प्रेमपूर्वक बसवले. अन एकेकजण एकेक घास त्याला भरवू लागला. मग कृष्णानेही आपल्या वाट्याच्या काल्यातील एकेक घास प्रेमपूर्वक त्यांना भरवला. असा प्रत्येकाला घास भरवून झाला की हाताला जी उष्टी शिते लागलेली असत ती तो स्वत: चाटूनपुसून साफ करीत होता. अन्न हे परब्रह्म हे त्या परब्रह्माला चांगले ठाऊक होते. हा काल्याचा प्रसाद त्यांनाच, जे कृष्णावर जीवापाड प्रेम करत असत. मात्र जे देव, गंधर्व हा प्रसाद, काला खाण्यासाठी वेषांतर करून येत त्यांना ओळखून कृष्ण गोपाळांना सांगे...

उच्छिष्टांचे मिशे देव जळी झाले मासे,हे कळले घननिळा, सांगतसे गोपाळा।

याचाच अर्थ, की काला खाऊन झाल्यावर सगळे गोप यमुनेत हात धुवायला जाणार आणि ते प्रसादाचे कण माशांच्या रुपाने आलेल्या देवगणांना मिळणार, म्हणून कृष्णाने गोपाळांना सांगितले, 'काला खाऊन झाल्यावर हात धुवत बसू नका तर जिभेने चाटून पुसून स्वच्छ करा आणि कपड्यांना पुसून टाका!'

तेव्हापासून गोपाळकाल्याचा प्रसाद खाल्यावर हात धुवू नये अशी प्रथाच पडली. प्रसाद मिळण्यासाठी भाग्य बलवत्तर असावे लागते. गोप-गोपाळांचे भाग्य किती श्रेष्ठ, त्यांना प्रसाद मिळे व तो प्रसाद भरवणाऱ्या कृष्णाचे सान्निध्यही मिळे. असे सुखाचे कण आपल्याही वाट्याला यावे असे वाटत असेल तर निस्सिम कृष्णभक्तीला पर्याय नाही!

टॅग्स :Janmashtamiजन्माष्टमीShravan Specialश्रावण स्पेशल