शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
4
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
5
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
6
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
9
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
10
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
11
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
12
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
13
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
14
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
15
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
16
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
17
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
18
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
19
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
20
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला

Janmashtami 2022: गोकुळाष्टमीनिमित्त करा काळ्या वाटण्याची आमटी आणि आंबोळीचा विशेष बेत; वाचा खास टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 2:07 PM

Janmashtami 2022: उत्सवाचा काळ म्हणजे खाद्यपदार्थांची चंगळ. यात पारंपरिक पदार्थ ठरतात जिव्हाळ्याचा विषय. आज तुम्हीसुद्धा हा बेत करून बघा!

गोकुळाष्टमीला तसेच गणेश चतुर्थीला अनेक` मालवणी घरांमध्ये काळ्या वाटाण्याची आमटी आणि आंबोळी करण्याचा प्रघात आहे. साधा सोपा तरी चविष्ट असणारा हा मेनू श्रीकृष्णालासुद्धा छप्पन भोग मिठाईवर उतारा ठरू शकेल. या आमटीला सांबार तसेच उसळ, कालवणही म्हणतात. हे सांबार झणझणीत आणि बेताने तिखट अशा दोन्ही प्रकारे करता येते. त्याच्या बरोबर पांढऱ्या शुभ्र आंबोळ्या म्हणजे स्वर्गसुखच! चला तर ही पाककृती जाणून घेऊ. त्यासाठी चकली. कॉम या पाककला विशेष संकेतस्थळाच्या वैदेही भावे यांनी दिल्या आहेत विशेष टिप्स!

काळ्या वाटण्याचे सांबार/ आमटी 

साहित्य:एक कप काळे वाटाणेकांदा-नारळ पेस्टसाठी: १/४ कप खवलेला ओला नारळ, १/२ कप कांदा, उभा चिरून, १ टेस्पून तेलफोडणीसाठी२ टेस्पून तेल, १/४ टिस्पून मोहोरी, १/२ टिस्पून जिरे, १/८ टिस्पून हिंग, १/४ टिस्पून हळद, १ टिस्पून लाल तिखट, ४ कढीपत्ता पाने१/२ कप बारीक चिरलेला कांदा१ टिस्पून धणेपूड१ टिस्पून जिरेपूड३ आमसुलं१ टिस्पून गूळ१ टेस्पून काळा मसालाचवीपुरते मिठ

कृती:१) काळे वाटाणे ८ ते १० तास भिजवावेत. नंतर पाणी काढून टाकावे आणि मोड येण्यासाठी सुती कापडात गच्चं बांधून ठेवावेत (कमीतकमी १० ते १२ तास).२) पॅनमध्ये १ टेस्पून तेल गरम करावे. कांदा नीट परतून घ्यावा. कांदा व्यवस्थित शिजला पाहिजे, कच्चा राहू देऊ नये. नंतर नारळ घालून परतून घ्यावे. (टीप) हे मिश्रण थोडे गार झाले कि मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यावी.३) लहान कूकरमध्ये २ टेस्पून तेल गरम करावे. त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद, आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. त्यात भिजवून मोड आलेले वाटाणे घालून एक मिनीटभर परतावे. नंतर त्यात धणेजिरेपूड घालून परतावे. गरजेपुरते पाणी घालावे (साधारण १ ते दिड कप). चवीपुरते मिठ, काळा मसाला आणि आमसुलं घालावीत. मिक्स करून कूकर बंद करावा आणि ५ ते ७ शिट्टया किंवा वाटाणे शिजेपर्यंत शिट्ट्या कराव्यात.४) कूकर थंड झाला कि उघडावा त्यात कांदा-नारळ पेस्ट घालून उकळी काढावी. आता गुळ घालावा. गरजेनुसार पाणी वाढवावे. चव पाहून तिखट आणि मिठ अड्जस्ट करावे.हि वाटाण्याची आमटी गरमागरम भाताबरोबर सर्व्ह करावी.

टीप:१) जर सुके खोबरे वापरायचा असेल तर कांदा परतायच्या आधी सुका नारळ परतावा नंतर कांदा घालावा.२) काही जणांना कडधान्याची आमटी फोडणीला टाकून प्रेशर कूक करायला आवडत नाही. अशावेळी, आधी प्रेशरकूकरमध्ये फक्त वाटाणे मिठ घालून शिजवून घ्यावेत. आणि नेहमीच्या फोडणीसारखे, कढईत फोडणीस टाकावेत.३) ताजा खोवलेला नारळ वापरत असाल तर आवडीनुसार जास्त घातला तरी चालेल.४) सुके खोबरे तेलात चांगले भाजून घेतल्याने त्याचा खमंगपणा या आमटीला छान लागतो. मी ओला नारळ व सुके खोबरे वापरून दोन्ही पद्धतीने आमटी बनवली. ओल्या नारळापेक्षा सुके खोबरे या आमटीत जास्त चांगले लागते, फक्त खोबरे तेलात छान खमंग भाजले गेले पाहिले.

टॅग्स :Janmashtamiजन्माष्टमीfoodअन्नShravan Specialश्रावण स्पेशल