शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
3
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
4
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
5
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
6
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
7
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
8
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
9
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
10
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
11
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
12
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
13
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
14
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
15
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
16
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
17
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
18
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
19
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
20
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर

Janmashtami 2022 : श्रीकृष्ण जन्माच्या मुहूर्तावर 'या' पद्धतीने करा विधिवत पूजा व म्हणा जन्माचा पाळणा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 5:08 PM

Janmashtami 2022 : कृष्णजन्माचा उत्सव शक्यतो मंदिरातच जल्लोषाने करावा, पण शक्य नसेल तर तो दिलेल्या पद्धतीनुसार घरीदेखील साजरा करता येईल.

अंधःकारात प्रकाशाची वाट दाखवणारा, दैत्यांचा कर्दनकाळ ठरणारा, आपल्या बासुरीने सर्वांना मोहून टाकणारा आणि जगाला तत्वाज्ञाचे ज्ञानामृत पाजणारा भगवान श्रीकृष्ण याचा जन्मसोहळा अर्थात जन्माष्टमीचा उत्सव आपण दरवर्षी साजरा करतो. यंदाही १८ ऑगस्ट रोजी हा उत्सव 'गोविंदा रे गोपाळा' या गजरात पार पडणार आहे. 

श्रावण वद्य अष्टमीला पूर्वरात्री भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. ही वेळ रात्री १२ वाजून ४० मिनिटे गृहीत धरली जाते. त्या मुहूर्तावर कृष्णाचा जयघोष करून जन्म झाला असे कथा कीर्तनातून घोषित केले जाते. फटाके फोडून, वाद्य वादन, टाळ-नामाचा गजर करून कृष्ण जन्म (Janmashtami 2022) झाल्याची वर्दी दिली जाते. या वर्षी हा उत्सव १८ ऑगस्ट २०२२, रोजी गुरुवारी साजरा केला जाईल. 

कृष्णाने संघटन शक्तीवर भर दिला होता. त्यामुळे हा उत्सव शक्यतो एकत्र येऊन साजरा करावा. अगदीच शक्य नसेल तर पुढे दिल्यानुसार घरच्या घरी विधिवत पूजा करावी. त्यासाठी जन्म मुहूर्ताचा काळ, पूजा विधी आणि पाळणा याबद्दल माहिती घेऊ. 

देवघरातल्या बाळकृष्णाला छोटासा पाळणा करून त्यात बाळकृष्णाला जन्माच्या मुहूर्तावर पाळण्यात जोजवले जाते. नवीन वस्त्र परिधान केली जातात. हार घातला जातो. लोणी किंवा दही साखरेची वाटी देवासमोर ठेवली जाते. गुलाल, फुलं उधळून कृष्णाचा जयघोष केला जातो. केळं, पेढे, पंजिरीचा नैवेद्य दाखवला जातो. अनेक भाविक या दिवशी उपास करतात व दुसऱ्या दिवशी गोपाळकाल्याचा प्रसाद ग्रहण करून उपास सोडतात. 

कृष्णजन्माचा मुहूर्त : 

१८ ऑगस्टच्या रात्री ९. २१ ते  १९ ऑगस्टच्या रात्री १०.५८ पर्यंत राहील अष्टमीची तिथी राहील. १८ ऑगस्टच्या रात्री ११.५९ ते १२. ४४ मिनिटांपर्यंत असेल कृष्ण जन्माचा उत्सव साजरा केला जाईल. यात पूजेचा कालावधी फक्त ४५ मिनिटांचा असेल. 

कृष्ण जन्माचा पाळणा : 

बाळा जो जो रे कुळभूषणा । श्रीनंदनंदना ।निद्रा करि बाळा मनमोहना । परमानंदा कृष्णा ॥धृ॥

जन्मुनि मथुरेत यदुकुळी । आलासी वनमाळी ।पाळणा लांबविला गोकुळी । धन्य केले गौळी ॥१॥

बंदिशाळेत अवतरुनी । द्वारे मोकलुनी ।जनकशृंखला तोडुनी । यमुना दुभंगोनी ॥२॥

मार्गी नेतांना श्रीकृष्णा । मेघनिवारणा ।शेष धावला तत्क्षणा । उंचावूणी फणा ॥३॥

रत्‍नजडित पालख । झळके आमोलिक ।वरती पहुडले कुलतिलक । वैकुंठनायक ॥४॥

हालवी यशोदा सुंदरी । धरुनी ज्ञानदोरी ।पुष्पे वर्षिली सुरवरी । गर्जति जयजयकारी ॥५॥

विश्‍वव्यापका यदुराया । निद्रा करी बा सखया ।तुजवरि कुरवंडी करुनिया । सांडिन मी निज काया ॥६॥

गर्ग येऊनी सत्वर । सांगे जन्मांतर ।कृष्ण परब्रह्म साचार । आठवा अवतार ॥७॥

विश्‍वव्यापी हा बालक । दृष्ट दैत्यांतक ।प्रेमळ भक्तांचा पालक । श्रीलक्ष्मीनायक ॥८॥

विष पाजाया पूतना । येता घेईल प्राणा ।शकटासुरासी उताणा । पाडिल लाथे जाणा ॥९॥

उखळाला बांधता मातेने । रांगता श्रीकृष्ण ।यमलार्जुनांचे उद्धरण । दावानव प्राशन ॥१०॥

गोधन राखिता अवलिळा । कालिया मर्दीला ।दावानल वन्ही प्राशील । दैत्यध्वंस करी ॥११॥

इंद्र कोपता धांवून । उपटील गोवर्धन ।गाईगोपाळा रक्षून । करीन भोजन ॥१२॥

कालींदीतीरी जगदीश । व्रजवनितांशी रास ।खेळुनि मारील कंसास । मुष्टिक चाणुरास ॥१३॥

ऎशी चरित्रे अपार । दावील भूमीवर ।पांडव रक्षील सत्वर । ब्रह्मानंदी स्थिर ॥१४॥

टॅग्स :Janmashtamiजन्माष्टमीShravan Specialश्रावण स्पेशल