शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

Janmashtami 2023: वैवाहिक जीवनासंबंधित काहीही अडचणी असतील तर जन्माष्टमीला करा 'हे' खास उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2023 1:55 PM

Janmashtami 2023: नवरा बायकोच्या नात्यात राधाकृष्णासारखे अतूट प्रेम निर्माण व्हावे, यासाठी ज्योतिष शास्त्राने दिलेले उपाय करा. 

नवरा बायकोचे नाते अतिशय नाजूक. दोन कुटुंबातून आलेल्या दोन व्यक्तींचे परस्परांशी पटणे, पटवून घेणे आणि एकमेकांना समजून घेणे यात बराच कालावधी लागतो. तोवर श्रद्धा आणि सबुरी बाळगावी लागते. तसे न केल्यास नाते विकोपाला जाते. परंतु दोघांमध्ये प्रेम हा जोडणारा धागा मजबूत असेल, तर कितीही भांडणे होवोत पण 'तुझं माझं पटेना, तुझ्यावाचून करमेना' अशी स्थिती होते. राधाकृष्णासारखे हे प्रेम अधिक वृद्धिंन्गत व्हावे, यासाठी गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर अर्थात ६ सप्टेंबर रोजी शास्त्रात दिलेले उपाय अवश्य करून पहा. 

>> पितृदोषाने जर घरामध्ये कलह होत असेल तर सर्वप्रथम पितृदोषाचे निरसन करावे. कुलदेवतेच्या दोषाने कलह होत असेल तर कुलदेवतेच्या दोषाचे निरसन करावे. वास्तुदोषाने कलह होत असेल तर वास्तुदोषाचे निरसन करावे.

>> अनिष्ट ग्रहांमुळे पती पत्नींमध्ये भांडणे होत असल्यास त्या ग्रहाचे जप, होमहवन, दानधर्म करावे. श्रीगुरुचरित्र, स्वामीचरित्र, कलियुगाचे इच्छितदाता, साईचरित्र, श्री गुरुलिलामृत किंवा सत्पुरुषांचे चरित्र वाचन करावे.

>> भांडणे घटस्फोटापर्यंत पोहोचलेल्या जोडप्याने  किंवा दोघांपैकी एकाला घटस्फोट घेण्याची इच्छा असल्यास खालील संकल्प करून एकनाथ महाराजलिखित रुक्मिणी स्वयंवराचे पारायण करावे. संकल्प अशा पद्धतीने करावा-

मम वैवाहिक जीवन कर्माणि उत्पन्नांना विविध प्रत्यवायांनासमूल परिहारपूर्वक पुन: मिलन सिद्धी द्वारा अद्यारंभ करिष्ये।।

हा श्लोक म्हणून श्रद्धापूर्व रुक्मिणी स्वयंवर वाचावे. पूर्ण पोथी शक्य नसेल, तर रोज किमान एक अध्याय तरी जरूर वाचावा.

>> दोघांनी किंवा दोघांपैकी एकाने सोळा सोमवारचे व्रत करावे. सोमवारी संधीकाळात, सोमप्रदोषकाळात आणि शिवरात्रीला शिवमंदिरात जाऊन एक नारळ अर्पण करून कणकेचा साजुकतुपाचा दिवा लावून एक मूठ नागकेशर शिवपिंडीवर अर्पण करावे.

>> काही वेळा स्त्रीचा काहीही दोष नसताना तिचा पती दुसऱ्याच्या नादी लागून त्यांच्या प्रपंचात काडीमोड घेत असेल, सतत भांडणे होऊन दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला असेल तर स्वामी समर्थांची उपासना करावी. तसेच अशा बाबतीत श्रीकृष्णाची उपासनाही फलदायी ठरते. ''ओम नमो भगवते वासुदेवाय'', हा मंत्र जप किंवा विष्णुसहस्त्रनाम पठण करावे. त्याचा निश्चित परिणाम होतो. ही उपासना शीघ्रफलदायी असल्याचे अनेकांनी अनुभवले आहे. कारण श्रीकृष्ण हा स्त्रीभोक्ता नसून स्त्रीरक्षणकर्ता आहे.

या सर्व उपासनेबरोरबर नात्यात प्रेम असावे, एकमेकांना समजून घेण्याची तयारी आणि राधा कृष्णाचा आदर्श ठेवला तर तुमच्या उपासनेला नक्कीच फळ येईन आणि नाते काडीमोड होण्याच्या उंबरठ्यावरून परत येईल!

टॅग्स :Janmashtamiजन्माष्टमीAstrologyफलज्योतिषShravan Specialश्रावण स्पेशल