शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
7
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
8
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
9
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
10
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
11
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
12
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
13
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
14
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
15
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
16
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
17
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
18
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
19
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
20
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

Janmashtami 2023: गोपाळकाल्याचा प्रसाद खाल्ल्यावर हात न धुण्यामागे काय आहे पौराणिक कथा? वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2023 4:12 PM

Janmashtami 2023: दहीहंडी फोडून झाल्यावर बाळ गोपाळांबरोबर काल्याचा प्रसाद जरूर खा, मात्र खरकटे हात धुवून न टाकता रुमालाला पुसा, कारण.... 

गोपाळजन्माच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला साजरा करतात. यंदा ७ सप्टेंबर रोजी गोपाळकाला आहे. त्यावेळी गोपाळकाल्याचा प्रसाद वाटला जातो. मात्र तो खाऊन झाल्यावर हात पाण्याने धुवू नये अशी अट घातली जाते. तसे सांगण्यामागे नेमके काय, हे जाणून घेण्यासाठी ज्योतिर्भास्कर जयंत साळगावर यांनी चितारलेला गोपाळकाला पाहू, म्हणजे वरील प्रश्नाचे उत्तर ओघाने मिळेलच!

गाईंना चारण्यासाठी आणि राखण्यासाठी सगळ्या सवंगड्यांसह बाळकृष्ण रानात जाई आणि दिवसभर वेगवेगळे खेळ खेळून नुसता हैदोस घाली. खेळून खेळून दमल्यावर बाळगोपाळांना भूकेची जाणीव होई आणि मग जेवण्यासाठी ते अगदी उतावीळ होऊन जात. काकुळतीला येऊन कृष्णसख्याला विनवीत, 

कान्होबा खेळ पुरे आता, मांडू रे काला, आवडी अनंता!

कृष्णाला काय तेच हवे असे. मग तोही काल्यासाठी तयार होई. सगळे मग धावत कदंबाखाली येत. तिथली जागा झटपट साफ करून रिंगण करून बसत. सगळे आपापल्या शिदोऱ्या कृष्णाच्या स्वाधीन करत. कृष्ण त्या मन लावून एकत्र करी. काय काय असे त्या शिदोरीमध्ये?

आणिती शिदोऱ्या आपापल्या, जया जैसा हेत तैशा त्या चांगल्या, शिळ्या विटक्या भाकरी, दही भात लोणी, मेळवोनी मेळा करी चक्रपाणी,एका जनार्दनी अवघ्या देतो कवळ, ठकविले तेणे ब्रह्मादी सकळ।

कोणी रात्रीची भाकरी, कांदा, चटणी आणलेली असे. तर कोणाचा दहीभात असे, कोणाला आईने लोणी दिलेले असे तर कोणी लोणचे आणलेले असे. तिथे गरीब श्रीमंत असा भेदभाव कृष्ण जरादेखील शिल्लक ठेवीत नसे. तो आधी ते सारे पदार्थ एक करी. मग सगळ्या सवंगड्यांना त्याचे समान वाटप करीत असे. मध्येच एखाद्याला आपल्या हाताने घास भरवीत असे. मध्येच कोणी त्यालाही आपल्या उष्ट्या हातो घास भरवी. अन तोही तो घास मोठ्या आवडीने गट्टम करत असे. 

एकमेकांना पहले आप, पहले आप असा आग्रहदेखील होई. प्रत्येकाशी समानतेची वागणूक कशी असावी, समता-समानता म्हणजे काय ते कृष्णाने या काल्यातून साऱ्या जगाला दाखवून दिले. नाथ महाराज लिहितात- 

वैकुंठीचा हरी, गोपवेष धरी, घेऊनि शिदोरी, जाय वना।धाकुले सवंगडे, संगती बरवा, ठाई ठाई ठेवा, गोधनाचा।बाळ ब्रह्मचारी, वाजरी मोहरी, घेताती हुंबरी, एकमेका।दहीभात भाकरी, लोणचे परोपरी, आपण श्रीहरी वाढते।श्रीहरी वाढले, गोपाळ जेवले, उच्छिष्ट सेवले, एकाजनार्दनी।

कृष्णाचा रुबाब काय विचारता? एकाने आपल्या कांबळ्याची घडी करून ती खास कृष्णासाठी अंथरली. त्यावर प्रेमपूर्वक बसवले. अन एकेकजण एकेक घास त्याला भरवू लागला. मग कृष्णानेही आपल्या वाट्याच्या काल्यातील एकेक घास प्रेमपूर्वक त्यांना भरवला. असा प्रत्येकाला घास भरवून झाला की हाताला जी उष्टी शिते लागलेली असत ती तो स्वत: चाटूनपुसून साफ करीत होता. अन्न हे परब्रह्म हे त्या परब्रह्माला चांगले ठाऊक होते. हा काल्याचा प्रसाद त्यांनाच, जे कृष्णावर जीवापाड प्रेम करत असत. मात्र जे देव, गंधर्व हा प्रसाद, काला खाण्यासाठी वेषांतर करून येत त्यांना ओळखून कृष्ण गोपाळांना सांगे...

उच्छिष्टांचे मिशे देव जळी झाले मासे,हे कळले घननिळा, सांगतसे गोपाळा।

याचाच अर्थ, की काला खाऊन झाल्यावर सगळे गोप यमुनेत हात धुवायला जाणार आणि ते प्रसादाचे कण माशांच्या रुपाने आलेल्या देवगणांना मिळणार, म्हणून कृष्णाने गोपाळांना सांगितले, 'काला खाऊन झाल्यावर हात धुवत बसू नका तर जिभेने चाटून पुसून स्वच्छ करा आणि कपड्यांना पुसून टाका!'

तेव्हापासून गोपाळकाल्याचा प्रसाद खाल्यावर हात धुवू नये अशी प्रथाच पडली. प्रसाद मिळण्यासाठी भाग्य बलवत्तर असावे लागते. गोप-गोपाळांचे भाग्य किती श्रेष्ठ, त्यांना प्रसाद मिळे व तो प्रसाद भरवणाऱ्या कृष्णाचे सान्निध्यही मिळे. असे सुखाचे कण आपल्याही वाट्याला यावे असे वाटत असेल तर निस्सिम कृष्णभक्तीला पर्याय नाही!

टॅग्स :Janmashtamiजन्माष्टमीDahi Handiदहीहंडी