शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
3
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
4
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
5
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
6
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
7
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
8
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
9
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
10
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
11
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
12
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
13
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
14
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
15
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल
16
आकाश कोसळले तरी चालेल, न्याय दिला गेलाच पाहिजे!
17
एकत्र लढतील, दिसतील; पण एकत्र राहतील?
18
निवडणुका अनेक, देश एक!
19
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
20
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय

Janmashtami 2024: जन्माष्टमीला म्हणा गोपाळकृष्णाचे 'हे' मंत्र; सोपे करेल संसारसुखाचे तंत्र!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 9:42 AM

Janmashtami 2024: कृष्णमंत्र म्हटल्याशिवाय जन्माष्टमी साजरी होणे अशक्य; त्यामुळे होणारे लाभ आणि कोणते मंत्र किती वेळा म्हणायचे याची आजच नोंद करून ठेवा!

जन्माष्टमी हा अशा युगपुरुषाचा जन्मोत्सव आहे, ज्याने प्रतिकूल परिस्थितीतही अनुकूलतेने कसे जगावे याचा आदर्श जगाला घालून दिला. तो युगपुरुष म्हणजे भगवान श्रीकृष्ण! त्याने जन्म घेतला तो कारावासात, मुसळधार पावसात, मिट्ट काळोख्या रात्री कोणालाही भयाण वाटावा असा तो क्षण मात्र गोपालकृष्णाच्या जन्माने पावन झाला. कितीही कठीण प्रसंग असो, प्रबळ इच्छा असेल तर मार्ग निघतोच, हे त्याने जन्मतः दाखवून दिले आणि आयुष्यातल्या प्रत्येक कठीण प्रसंगावर हसतमुखाने मात करायलाही शिकवले.

श्रावण वद्य अष्टमीला (Janmashtami 2024) तेव्हाची मध्यरात्र आणि आताच्या कालमापानुसार सुमारे १२ वाजता कृष्ण जन्म झाला. यंदा २६ ऑगस्ट रोजी कृष्णजन्मोत्सव आहे. हा योग अतिशय शुभ मानला जातो. या मुहूर्तावर कृष्ण जन्म साजरा करावा. कृष्णाला पाळण्यात घालून फुलं गुलाल उधळून कृष्णाचा गजर करावा आणि आपल्या मनातील सुप्त इच्छा कृष्णाजवळ प्रगट करून पुढील मंत्रांपैकी तुम्हाला अपेक्षित असलेल्या इच्छापूर्तीसंबंधित मंत्र निवडून म्हणावा. हे मंत्र मनोभावे म्हटले असता या मंत्रांची प्रचिती येते. आपली मनोकामना पूर्ण होईपर्यंत दिलेल्या मंत्राचा रोज जास्तीत जास्त १०८ अन्यथा कमीत कमी ११ वेळा जप जरूर करावा. 

मनोकामना पूर्ण करण्यासाठी -

ज्योत्स्नापते नमस्तुभ्यं नमस्ते ज्योतिशां पते! नमस्ते रोहिणी कान्त अर्घ्य मे प्रतिगृह्यताम्!!

संतानप्राप्तीसाठी -

देवकी सुत गोविंद वासुदेव जगत्पते! देहिमे तनयं कृष्ण त्वामहं शरणं गतः!!

विवाहातील अडथळे दूर होण्यासाठी-

ओम् क्लीं कृष्णाय गोविंदाय गोपीजनवल्ल्भाय स्वाहा।

शांत-समाधानी जीवन जगण्यासाठी-

ओम नमो भगवते वासुदेवाय नमः।

नोकरी, व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी- 

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते। तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्

टॅग्स :Janmashtamiजन्माष्टमीShravan Specialश्रावण स्पेशलPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३Astrologyफलज्योतिष