शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

Janmashtami 2024: दह्या-दुधाने घर भरलेलं असूनही कृष्णाने लोकांच्या घरी जाऊन चोरी का केली? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 11:07 AM

Janmashtami 2024: कृष्णाच्या जन्मकथेपासून ते त्याच्या प्रत्येक कृतीमध्ये गहन अर्थ दडला आहे, त्याच्याकडे आध्यात्मिक दृष्टीनेच बघायला हवे, कसे ते पहा!

आज जन्माष्टमी (Janmashtami 2024) आणि उद्या दहीहंडी (Dahi Handi 2024)! हा केवळ उत्सव नाही तर राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा सण आहे. त्याच्याकडे डोळसपणे पाहिले पाहिजे. आज जे दहीहंडीचे थर लावले जातात, ते तरुणांना संघटित करून एकमेकांच्या मदतीने मानवी मनोरे बांधून यशाचे लोणी खाण्याचा संदेश देतात. त्यासाठी कष्ट उपसावे लागतात, मगच बक्षिसरुपी नवनीताची गोडी चाखता येते. हाच संदेश श्रीकृष्णाने बाळगोपाळांनाही दिला, तो असा -

मथुरेस आपल्या पित्यास कैद करून स्वत: राजगादीवर बसणाऱ्या कंसाच्या जुलमी, नितीभ्रष्ट व धर्मबाह्य सत्तेमुळे त्यावेळची प्रजा त्रस्त झाली होती. राजाचे सेवकही पिडा व त्रास देण्यात मशगुल झाले होते. गोकुळातील गौळणींनी मथुरेस विकण्यासाठी नेलेले दूध, दही, तूप, लोणी असा सकस, शक्तीवर्धक खुराक खाऊन कंसाचे मल्ल बलवान झाले होते व सर्व गोपाळ अशक्त होत चालले होते. 

Janmashtami 2024: आज जन्माष्टमी; जाणून घ्या जन्ममुहूर्त; कृष्णाचा पाळणा आणि पूजाविधी!

म्हणून भगवंताने शत्रूची शक्ती कमी व्हावी व आपली संरक्षण शक्ती बळकट व्हावी म्हणून रस्त्यावर उभे राहून गोकुळातील दही, दूध, लोणी मथुरेस विक्रीकरीता जाण्यास बंदी घातली व गोपाळांची संघटना करून त्यांना विचारले, तुम्ही असे अशक्त का?

गोपाळ म्हणाले, `आम्हाला ताकाशिवाय काही मिळत नाही.'तेव्हा भगवंताने त्यांना बरोबर घेऊन त्यांच्याच घरचे दही, दूध, लोणी, तूप चोरी करून खाऊ घातले. अशाप्रकारे आपली शक्ती वाढवण्यासाठी व दुष्टांचे पारिपत्य करण्यासाठी भगवंताने ही योजना आखली होती. कारण आपत्कालिन राष्ट्ररक्षणाकरता स्वारी तथा चोरी दोष नाही. या न्यायाने भगवंताने चौर्यकर्म आरंभले. गोपाळांचे संघटन करून मानवी मनोरे बांधले आणि सर्वांना धर्मनितीचे शास्त्र शिकवले. 

गोकुळातील गौळणी आपल्या मुलांना दही, दूध, तुप, लोणी न देता त्या विकत असत. हा त्यांच्याकडून अधर्मच घडत होता. तसेच ज्याच्या कृपेने हे प्राप्त झाले, त्या देवास अर्पण न करता त्या विकावयाच्या. शास्त्र असे सांगते, देवाला अर्पण न करता जो जे काही सेवन करतो तो पाप सेवन करतो व देवाचे हिरावून घेणारा चोर आहे, असे भगवान गीतेत कर्मयोगात सांगतात. तेव्हा या अर्धमाचे मार्जन निर्मूलन होऊन त्यांच्याकडून धर्मपालन व्हावे या हेतूने धर्मरक्षणार्थ आलेले धर्ममूर्ती भगवान कृष्ण चोरी करत असत. 

Janmashtami 2024: श्रीकृष्णाची जन्मकथा मानवी जीवनाचे रहस्य उलगडणारी आहे, कशी ते पहा!

 

 

टॅग्स :Janmashtamiजन्माष्टमीDahi HandiदहीहंडीShravan Specialश्रावण स्पेशल