शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
3
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
4
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
5
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
6
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
7
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
8
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
9
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
10
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
11
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
12
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
13
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
14
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
15
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल
16
आकाश कोसळले तरी चालेल, न्याय दिला गेलाच पाहिजे!
17
एकत्र लढतील, दिसतील; पण एकत्र राहतील?
18
निवडणुका अनेक, देश एक!
19
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
20
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय

Janmashtami 2024: जन्माष्टमीच्या दिवशी हरिवंशपुराण का वाचावे? जाणून घ्या लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 9:13 AM

Janmashtami 2024: आज जन्माष्टमीनिमित्त कृष्ण उपासनेचा एक भाग म्हणून हरिवंशपुराण वाचले जाते, पण त्यात नेमके काय दिले आहे आणि वाचल्याने होणारे लाभ पाहू!

ज्यांना कृष्णकथेच्या अनुशंगाने भगवान गोपाल कृष्णाला आणि त्याचा आठव्या अवतारामागील प्रयोजनाला समजून घ्यायचे असेल, त्याने हरिवंशपुराण वाचावे असे सांगितले जाते. ते वाचल्यामुळे काय फळ मिळते आणि काय शिकायला मिळते, ते जाणून घेऊ.

आज २६ ऑगस्ट रोजी गोकुळाष्टमी आहे. या तिथीला भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला म्हणून हा जन्मोत्सव जन्माष्टमी (Janmashtami 2024) म्हणून साजरा केला जातो. या दिवशी गोपाळकृष्णाची पूजा केली जाते, नैवेद्य दाखवला जातो, कथा कीर्तन केले जाते, त्याबरोबरच हरिवंश पुराण वाचण्याचाही प्रघात आहे. या पुराणात काय आहे ते जाणून घेऊ.

हरिवंश पुराणात भगवान गोपालकृष्णाच्या अनेकविध लीलांचे वर्णन असून यातील अनेक लीला कथा भागवत, नारदपुराण, पद्मपुराण इत्यादीमध्ये थोड्याफार फरकाने आल्या आहेत. भगवान विष्णूंनी पृथ्वीचा भूभार हलका करण्यासाठी यादवकुळात वसुदेव देवकीच्या पोटी श्रीकृष्णरूपाने अवतार घेतला इथपासून या ग्रंथाचा प्रारंभ होतो. 

यानंतर श्रीकृष्णाच्या गोकुळातील बालपणीच्या खोड्या, पूतना, तृणावर्त, धेनुकासुर, प्रलंब, अरिष्टासुर इत्या दैत्यांचा केलेला वध, गोकुळातील त्याची गोरस चोरी, यशोदेला घडवलेले विश्वदर्शन, इंद्रगर्वहरण, गोवर्धनोद्धार, कंस वध, जरासंधाशी युद्ध, कालयवनाचा वध इ. अनेक अद्भूतकथा आल्या आहेत. 

कृष्ण मोठा झाल्यावर द्वारकानिर्मिती, रुक्मिणीहरण, स्यमंतकमणिप्रकरण, त्याचे अनेक विवाह, सोळासहस्त्र गोपींची सुटका व त्यांच्याशी कृष्णाचा विवाह, कृष्णाच्या अष्टनायिका, त्याने केलेली युद्धे, शेवटी यादव कुळाचा संहार, उद्धवास उपदेश व शेवटी प्रभासक्षेत्री स्वात्म विसर्जन, अवतार समाप्ती इ. कथा आल्या आहेत. 

ग्रंथाच्या शेवटी हरिवंश पुराणाचे महात्म्य व फलश्रुती सांगितली असून या पुराणाचे पारायण कसे करावे, किती टप्प्यात करावे याचीही माहिती दिलेली आहे. हे हरिवंशपुराण ब्रह्मा-विष्णु-महेश स्वरूप असून याच्या श्रवण पठणाने सर्व पातकांचा नाश होतो व मनुष्याच्या सर्व पवित्र इच्छा पूर्ण होतात. सर्व संकटांचा परिहार होतो. सर्वांचे इह पर कल्याण होते व शेवटी मोक्षप्राप्ती होते असे फलश्रुतीत म्हटले आहे. 

श्रीकृष्ण हा आपला आयुष्यभराचा सोबती आहे. आकाशातला चंद्र जसा आपण चालताना आपल्याबरोबर चालतो असे वाटते, तसा गोपालकृष्ण सदैव आपल्या बरोबर चालत असतो. मग त्याचा विस्तृत परिचय नको का करून घ्यायला? गोपालकृष्णाशी समरस व्हायचे असेल, तर हरिवंशपुराण एकदा तरी मन लावून नक्की वाचा. त्याची अनेक भाषांमध्ये भाषांतरे उपलब्ध आहेत आणि इंटरनेटवर ती पीडीएफ स्वरूपातही सहज मिळू शकतील. कृष्ण जन्माच्या निमित्ताने आपणही मनाशी चंग बांधला, तर हरिवंशपुराण आपले सहज वाचून होईल!

टॅग्स :Janmashtamiजन्माष्टमीPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३Shravan Specialश्रावण स्पेशल