शहरं
Join us  
Trending Stories
1
माहिममध्ये शिंदे गट अमित ठाकरेंना पाठिंबा देणार? मुख्यमंत्री शिंदे-सरवणकरांमध्ये चर्चा, केसरकर म्हणाले....
2
"रशिया-युक्रेन युद्ध मोदी थांबवू शकतात"; युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी व्यक्त केला विश्वास
3
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
4
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२४: नशीबाची साथ मिळेल, मित्रांशी भेटी होतील, प्रवास घडेल.
5
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
6
Mutual Fund Investment : SIP की एकरकमी... कशात मिळेल जास्त रिटर्न? म्युच्युअल फंडात गुंतवणूकीची योग्य पद्धत कोणती?
7
दिवाळी सप्ताह: ४ राशींना सर्वोत्तम वरदान, लाभच लाभ; पद-पैसा वाढ, लक्ष्मी-कुबेर शुभच करतील!
8
दिवाळीपूर्वी Infosys च्या शेअरधारकांसाठी खूशखबर; शेअरवर मिळणार 'इतका' डिविडेंड, आज अखेरची संधी
9
"तो माझ्या जवळ येऊन...", भाग्यश्रीने 'मैंने प्यार किया'दरम्यानचा सलमान खानचा सांगितला 'तो' किस्सा
10
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
11
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
12
'नागिन' फेम अभिनेत्री ३६व्या वर्षी अडकली विवाहबंधनात, उत्तराखंडमध्ये बांधली लग्नगाठ
13
मुंडेंच्या विरोधात मराठा उमेदवार, शरद पवारांनी भाकरी फिरवली; मराठा-ओबीसी लढत रंगणार
14
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
15
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
16
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
17
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
18
विमानात बॉम्ब ठेवला असल्याच्या खोट्या धमक्या कुठून येतात?
19
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
20
मन ही मन लड्डू फुटे, हाथों मे फुलझडियां!

January Birthday 2023:कामात चोख, कर्तव्यनिष्ठा आणि कुशाग्र बुद्धी या तिन्हींचा मेळ म्हणजे जानेवारीत जन्मलेल्या व्यक्ती!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 1:05 PM

Januuary born people horoscope: जानेवारीत जन्माला आलेले लोक नेतृत्त्व करतात, पण ऐकून घेण्याआधी बोलतात; वाचा त्यांचे दोष आणि गुण!

इंग्रजी वर्षाची सुरुवात जानेवारीत होते आणि त्या वर्षातील महिन्यानुसार आपलेही वाढदिवस आपण साजरे करतो. वर्षाच्या सुरुवातीला अर्थात जानेवारीत ज्यांचे वाढदिवस असतात, त्यांची नवीन वर्षाची तसेच वयाच्या पुढच्या टप्प्याची सुरुवात वर्षारंभीच होते. या महिन्यात जन्माला आलेले लोक कसे असतात, ते जाणून घेऊया.

ज्योतिषशास्त्रानुसार जानेवारीत जन्माला आलेले लोक आकर्षक आणि व्यवहाराला पक्के असतात. ते आपले भाग्य स्वत: निर्माण करतात. त्यांच्या मेहनतीला नशीबाची उत्तम साथ लाभते. तसे असले, तरीदेखील ते आपल्या व्यक्तीमत्त्वाची संवेदनशील बाजू सहसा कोणाला दाखवत नाहीत.

कामात चोख आणि कुशाग्र बुद्धी यांचा ताळमेळ त्यांच्याठायी दिसून येतो. एखादे काम हाती घेतल्यावर ते पूर्ण करेपर्यंत थांबत नाहीत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबरोबर संस्कारांचीही समोरच्यावर छाप पडते. त्यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ते अनेकांसाठी प्रेरणास्रोत असतात. खुद्द देवी सरस्वतीचा आशीर्वाद मिळाल्याने ते अभ्यासात हुशार असतात. 

व्यक्तीमत्त्वाची जमेची बाजू म्हणजे लाघवी आणि मृदू भाषा. याबाबतीत त्यांची संवादावर पकड असल्याने अनेक लोक जोडले जातात. त्यांना पसारा आवडत नाही. आवराआवर करण्याकडे त्यांचा कल दिसून येतो.

मात्र, हे लोक समोरच्याचे ऐकून घेण्याआधी बोलून मोकळे होतात. कोणावरही चटकन विश्वास ठेवतात. अर्थात हलक्या कानाचे असतात. जर सगळे काही तुमच्या मनासारखे झाले, तरच तुम्ही सौजन्याने वागता, अन्यथा संयम गमावून बसता. दुसऱ्यांच्या वेळेची किंमत करत नाहीत. या गोष्टी स्वभावाचा एक भाग आहेत. परंतु, त्या वगळता तुम्ही कोणाशी फार काळ वैर ठेवत नाही.

जानेवारीत जन्माला आलेली मुले प्रेमाच्या बाबतीत काही प्रमाणात कमनशिबी असतात. चुकीचे निर्णय घेऊन फसतात. तर, मुली प्रेमात नशीब काढतात. मुलींच्या प्रेमळ स्वभावामुळे त्यांचे जोडीदार भाग्यवान ठरतात.

या महिन्यात जन्माला आलेले लोक इलेक्ट्रॉनिक मीडिया, सैन्यदल, चार्टर्ड अकाऊंट, अध्यापन क्षेत्रात रस घेतात. त्यांच्यात नेतृत्व करण्याची क्षमताही जास्त असते. 

या महिन्यात जन्मलेल्या लोकांनी केवळ आपलेच म्हणणे खरे न करता, लोकांचेही ऐकून घेतले पाहिजे. त्यांच्या दृष्टीकोनातूनही जगाकडे पाहिले पाहिजे. लोकांचा मान ठेवला पाहिजे. तसे केल्यास त्यांना नशीबाची, कतृत्त्वाची आणि समाजाची योग्य साथ लाभेल.

या महिन्यात वाढदिवस असणाऱ्या प्रसिद्ध व्यक्ती- स्वामी विवेकानंद, सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे, अजित डोभाल,  ए. आर.रेहमान, नाना पाटेकर, विद्या बालन, वैज्ञानिक रघुनाथ मालशेकर....

टॅग्स :Astrologyफलज्योतिष