जया एकादशीचे व्रत केल्याने भगवान विष्णू आणि भगवान शिव दोघांचाही आशीर्वाद प्राप्त होतो. या एकादशीचे महत्त्व महाभारत काळात भगवान श्रीकृष्णाने धर्मराज युधिष्ठिराला सांगितले होते आणि त्यामागची पौराणिक कथादेखील सांगितली होती. ती कथा आणि या व्रतामुळे होणारे लाभ जाणून घेऊ. तसेच या व्रताचा भूत पिशाच्चांशी नेमका काय संबंध आहे तेही जाणून घेऊ.
पितरांना भूत-पिशाच योनीपासून मुक्ती मिळते
जया एकादशीचे व्रत केल्याने आत्म्यांना भवसागरातून मुक्ती मिळते. दुर्दैवाने कोणी पूर्वज भूत-पिशाचाच्या रूपात पृथ्वीवर फिरत असतील तर कुटुंबातील सदस्याने जया एकादशीचे व्रत पाळल्यास, नियमानुसार पूजा करून कथा ऐकल्यास त्याला मुक्ती मिळते. पितृदोष दूर झाला की कुटुंबाला अनेक प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते. म्हणून या व्रताचे महत्त्व अधिक आहे.
जया एकादशी व्रत कथा
पद्म पुराणातील प्रसिद्ध कथेनुसार भगवान श्रीकृष्णाने धर्मराज युधिष्ठिराला जया एकादशी व्रताची कथा सांगितली. यानुसार देवराज इंद्रासह सर्व देव स्वर्गात सुखाने राहत होते. एके दिवशी इंद्रदेव अप्सरांसोबत सुंदरवनात फिरत होते, अप्सरा पुष्पावती आणि गंधर्व माल्यवानही त्यांच्यासोबत होते. त्यामुळे गंधर्व मल्ल्यावानांना पाहून अप्सरा पुष्पावती मोहित झाली. मल्ल्यावानही मंत्रमुग्ध झाले. दोघेही इंद्रदेवांना प्रसन्न करण्यासाठी नाचत आणि गात असले तरी. पण दोघेही एकमेकांमध्ये हरवून गेले आणि गाणे आणि नृत्यात लक्ष केंद्रित करू शकले नाहीत. तेव्हा इंद्रदेवाने दोघांना शाप देऊन पृथ्वीवर पिशाचाच्या रूपात जन्म घ्याल असा शाप दिला.
शापामुळे मल्ल्यावान आणि पुष्पावती दुःखदायक जीवन जगू लागले. दरम्यान, माघ शुक्ल पक्षातील जया एकादशीच्या दिवशी शोकाने व्याकूळ झालेल्या माल्यवान आणि पुष्पावती यांनी काहीही न खाल्ल्याने संपूर्ण रात्र पिंपळाच्या झाडाखाली जागून काढली, भगवान विष्णूंची प्रार्थना केली. विष्णूंच्या कृपेने त्यांची पिशाच्च योनीतुन सुटका झाली आणि त्यांच्यासाठी स्वर्गाची दारे पुन्हा खुली झाली.
हे व्रत कसे करावे?
हे व्रत तीन प्रकारे केले जाते. उपाशी राहून, फलाहार करून किंवा फक्त पाणी पिऊन! परंतु, आजच्या धकाधकीच्या जिवनात असे कठोर व्रत करणे सर्वांनाच शक्य होईल असे नाही. म्हणून शास्त्राने यावर पर्याय सुचवला आहे, तो म्हणजे नामस्मरणाचा. एकादशी ही विष्णूंची प्रिय तिथी आहे. त्यानिमित्त विष्णुसहस्रनामाचे पठण किंवा श्रवण करणे, विष्णूंना भक्तीभावाने तुळस वाहणे किंवा गरजू लोकांना यथाशक्ती दान केले, तरी एकादशीचे पुण्य पदरात पाडून घेता येते.