शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
4
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
5
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
6
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित ठाकरेंना विधान परिषदेवरून आमदारकीची ऑफर दिली होती- देवेंद्र फडणवीस
7
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
8
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
9
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
10
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
11
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
12
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
13
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
14
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
15
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
16
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
17
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
18
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
19
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
20
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य

July birthday : गूढ व्यक्तिमत्त्व तरी यशस्वी आणि आनंदी, ही आहेत जुलै महिन्यात जन्मलेल्या लोकांची वैशिष्ट्ये!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2021 10:53 AM

July Birthday : व्यावहारिक गणितात कच्चे असले, तरीही नातेसंबंधांचे गणित अतिशय उत्कृष्टपणे सांभाळतात.

जुलै महिन्यात जन्मलेल्या लोकांना समजून घेणे, हे अवघड काम आहे. हे लोक अत्यंत गूढ विचारांचे आणि स्वभावाने मनस्वी असतात. त्यांच्या वागण्याबोलण्याचा थांगपत्ता लागू देत नाहीत. घटकेत आनंदी घटकेत दु:खी होत भावभावनांच्या लाटांवर स्वार होत राहतात. याच भावनिक आवेगामुळे आणि संवेदनशील स्वभावामुळे हृदयाने कोमल असतात. प्रसंगी हळवे होतात.

आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन स्पष्ट असल्याने करिअर बाबतील ध्येय निश्चित असत़े  निर्णयप्रक्रियेत फार काळ न घालवता, त्वरित निर्णय घेऊन मोकळे होतात. त्यामुळे कोणासाठी, कोणामुळे झुरत बसणे हे तुमच्या स्वभावातच नसते. अशा प्रकारच्या मोठ्या मानसिक ताणातून तुम्ही मुक्त असता. कुठे काय, किती आणि कसे बोलावे, हे तुमच्याकडून शिकावे. स्वभाव चंचल आणि रागाच्या बाबतीत जमदग्नीचा अवतार असलात, तरीदेखील तुमचा राग फार तर अर्ध्या तासात शांत होतो. काही काळात राग विसरून तुम्ही इतके सरळ वागता, की जसे काही घडलेच नाही.

हे लोक घरच्यांचे प्रिय असतात. त्यांच्या ठायी असलेल्या प्रतिभेमुळे मित्रपरिवारातही ते हवेहवेसे वाटतात. तसे असले, तरी तुमचा स्वभाव थोडा मुत्सद्दीपणा, स्वार्थीपणा याकडे झुकतो. तुम्ही स्वार्थापुरते दुसर्यांना वापरून घेता. जे कामाचे नाहीत, त्यांच्याशी तुम्ही मैत्रीच काय, ओळखही ठेवत नाहीत. 

कामात तरबेज असूनही तुमचा आळस तुम्हाला नडतो. मनात आणले, तर तुम्ही तुम्हाला हवे ते सहज मिळवू शकता. या महिन्यात जन्मलेले लोक साधारणपणे खेळाडू किंवा व्यावसायिक म्हणून ओळख बनवतात. शेअर मार्केट मध्ये त्यांना रस असतो आणि लाभही मिळवतात. व्यावहारिक गणितात कच्चे असले, तरीही नातेसंबंधांचे गणित अतिशय उत्कृष्टपणे सांभाळतात. पैशांची कमतरता कधी जाणवत नाही आणि पैसे खर्च करताना ते फार विचारही करत नाहीत. त्यांना उच्च राहणीमान आवडते.

व्यक्तीपारख करण्याची क्षमता त्यांच्याकडे असल्यामुळे प्रेमाच्या बाबतीत त्यांची सहसा फसवणूक होत नाही. ते क्वचितच कोणाच्या प्रेमात पडतात आणि ज्याच्याशी नाते जोडतात, त्याच्याशी नाते निभावतात. जोडीदार फसवणूक करत असेल, तर ते लगेच सावध होतात. त्यांच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे त्यांना दुसऱ्याला आकर्षित करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत. प्रेम मिळवण्याच्या बाबतीत ते भाग्यवान ठरतात.

या महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींना समाजसेवेची आवडही दिसून येते. त्यात यश आणि लौकिकदेखील प्राप्त होता़े लोकसंग्रह होतो. हे लोक अपयशाने खचून जात नाहीत. कितीही कठीण प्रसंग असो, धैर्याने तोंड देतात. त्यांच्या ओठावरचे हसू तसूभरही कमी होऊ देत नाहीत. सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे त्यांच्या मनात काय सुरू आहे, याचा समोरच्याला अदमास लागू देत नाहीत. यशस्वी आणि समाधानी आयुष्य जगतात. 

या महिन्यात जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती : प्रियंका चोप्रा, महेंद्रसिंग धोनी, दलाई लामा, अझिम प्रेमजी, पी.व्ही.सिंधू, जे.आर.डी टाटा, सोनू निगम, इ.