शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

फक्त आठवडाभर हा प्रयोग करून पहा, तुमचं आयुष्यच बदलून जाईल!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 8:32 AM

दुसऱ्याने कसे वागावे याचा विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा तो वेळ स्वतःला घडवण्यावर खर्च करा आणि दोन वाक्यांची आयुष्याला जोड द्या. तुमचे आयुष्य बदलून जाईल. 

यशस्वी व्हावं, असं प्रत्येकाला वाटतं. परंतु, आपल्या यशात अडथळे आणण्यास आपणच जबाबदार आहोत, हे मात्र आपल्याला काही केल्या उमगत नाही. आपल्या अपयशासाठी आपण दुसऱ्याला दोष देत राहतो. लेखक व. पु. काळे म्हणत, 'माणूस अपयशाला भीत नाही, तर अपयशाचे खापर फोडायला कारण मिळाले नाही, तर तो अस्वस्थ होतो!' म्हणून स्वतःच्या यशाची किंवा अपयशाची जबाबदारी स्वतः घ्यायला शिका. दुसऱ्याने कसे वागावे याचा विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा तो वेळ स्वतःला घडवण्यावर खर्च करा आणि दोन वाक्यांची आयुष्याला जोड द्या. तुमचे आयुष्य बदलून जाईल. 

१. आजचे काम उद्यावर ढकलू नका : जेव्हा एखादे काम आपल्याला मनापासून करावेसे वाटते, ते सुरू करण्यासाठी आपण नेहमी उद्यापासून सुरुवात करण्याची योजना आखतो. इंग्रजीत म्हण आहे, 'टुमॉरो नेव्हर कम' उद्या कधीच उगवत नाही. हिंदीतही म्हणतात, 'कल करे सो आज कर, आज करे सो अब' म्हणजेच कामाची चालढकल करू नका. जेव्हा आपण उद्यापासून सुरुवात करू म्हणतो, तेव्हा आजची जबाबदारी झटकत असतो. कामाची टाळाटाळ करत असतो. आपले मन त्या कामाची जबाबदारी झटकत असते त्यामुळे मेंदूलाही ते काम न करण्याची सूचना मिळते आणि काम कधीच सुरू होत नाही. म्हणून जी गोष्ट मनात आहे, ती मनात आल्याबरोबर त्यावर लगेच काम सुरू करा. उदा. व्यायामाची सुरुवात करायची आहे. पण हा विचार रात्री मनात आला, तर सुरुवात नक्कीच उद्यापासून होईल, परंतु रात्री प्रत्यक्ष व्यायाम शक्य नसला, तरी किमान शतपावलीने मी माझ्या ठरवलेल्या कामाची सुरुवात केली, याची जाणीव मेंदूला होते आणि दुसऱ्या दिवसापासून मेंदू स्वतः तुम्हाला तुमच्या नियोजित कामाची सूचना देतो. वेळ कधीच गेलेली नसते, तिचा वापर योग्य प्रकारे करावा लागतो आणि कामाला उद्यापासून नाही, तर आजपासून सुरुवात करावी लागते. 

२. जे करेन ते चांगलेच करेन : व्यक्तीची ओळख त्याच्या कर्तृत्वावरून होत असते. ज्याचे काम चांगले त्याला दाम अधिक मिळतो. दोन पैसे अधिक गेले तरी चालतील, पण काम चांगले झाले पाहिजे, अशी आपली मानसिकता असते. याचाच अर्थ चांगल्या कामाला चांगला मोबदला मिळतो आणि चांगल्या कामाची प्रत्येक जण दखल घेतो. म्हणून लहानात लहान काम करताना सुद्धा ते इतके पद्धतशीरपणे करा, की लोकांना तुमची दखल घ्यावीच लागेल. काम करताना प्रामाणिकपणे करा. आपल्याकडून १०० टक्के कसे देता येतील, याचा विचार करा. माणसांची पारख त्याच्या गुणांवरून होते. छोट्या छोट्या सवयीवरून होते. म्हणून उरकून टाकण्याची सवय सोडून द्या. स्वतःला बजावून सांगा, 'चलता है, नही चलेगा!' कोणी माझे काम पाहो न पाहो, मला माझे काम आवडले पाहिजे, मला माझ्या कामाचे समाधान मिळाले पाहिजे. एवढी प्रामाणिकता अंगी बाणली, तरी यशापासून आपल्याला कोणीही दूर ठेवू शकणार नाही. 

हे दोन्ही प्रयोग आजपासून सुरू करा. अगदी आतापासून...!