>> संजय सोपारकर
दहीसर पश्चिम येथे एक जुने अप्रसिद्ध असे काळ भैरव मंदिर आहे. हे मंदिर सन १८५७ च्या वेळी बांधले गेले आहे असा उल्लेख त्या मंदिरातील फलकावर सापडतो.हे मंदिर दहिसर पश्चिम येथे स्मशान भूमी जवळ आहे..अगदी योग्य स्थान भैरव महाराजांनी त्यांच्या साठी निवडले आहे. या देवळात महाशिव रात्री ला तसेच काळ भैरव जयंती ला मोठा उत्सव साजरा होतो. स्थानिक लोक मिळून या उत्सवाची तयारी करतात व त्यावेळी मात्र खूप लोक तिथे येऊन जातात.
एरव्ही मात्र हे मंदिर अगदी सून सान असते. ज्याला साधना करायची असेल त्याच्या साठी मात्र हे शांत मंदिर अगदी योग्य आहे. आजू बाजूला खार फुटी ची झा डे आहेत त्यामुळे अगदी निसर्ग रम्य शांत वातावरण आहे. हे मंदिर खोलगट जागी आहे.त्यामुळे पावसाळ्यात पूर्ण मंदिर पाण्याने भरून जाते. पूर्वी कोणी लोकांनी हा खड्डा बुजवण्याचे प्रयत्न केले होते. पण त्यांना स्वप्नात सांगितले गेले की माझी इच्छा आहे की पाण्यात च राहावे तेव्हा खोलगट जागा बुजवू नये..तेव्हा पासून कोणी हा प्रयत्न केला नाही असे सांगितले जाते..या मंदिरात भैरव वाहन कुत्रे यांची ही स्वारी फिरत असते. हे कुत्रे साधक जर साधना करत बसला असेल तर त्यांच्या बाजूला अगदी शांत पणे बसून राहतात व अशा वेळी नवीन माणूस तिथे येऊन घंटा बडवू लागला की मात्र ते शांत कुत्रे त्या व्यक्तीवर भुंकून त्याला भंडावून सोडतात.
बाकी या मंदिरात साधने साठी खूप जुने साधक येऊन बसतात..कारण वातावरण असे नैसर्गिक आहे की मन चटकन निसर्गातील चैतन्य शक्ती शी एकरूप होते व इथे साधनेला संपूर्ण पूरक वातावरण आहे. हे एक जागृत देवस्थान मानले जाते. इथे काळभैरव महाराज यांचा वास आहे असा अनुभव खूप लोकांना आला आहे. येथील अपार शांती व दैवी गुण अनुभवण्यास इथे एकदा जरूर भेट द्यावी.
ज्यांना यायचे असेल त्यांना पत्ता देऊन ठेवतो. काळभैरव मंदिर. दहिसर स्मशान भूमी जवळ. दहिसर पश्चिम इथे उतरून तिथून सरळ मिरा रोड दिशेने चालत येणे व मच्छी मार्केट विचारणे तिथे येऊन स्मशान भूमि पत्ता विचारणे..तिथे च स्मशान चे थोडे पुढे एक बंद पडलेला टॉवर दिसेल त्याच्या च बाजूला मंदिर आहे..१६ नोव्हेंबर बुधवार कार्तिक शुध्द अष्टमी.. काळभैरव जयंती .त्या साठी काही तोडगे देत आहे. त्याने जीवनात थोडी शांती लाभेल तसेच अडकलेली कामे होण्यास मदत होईल.
१.. काळभैरव जयंती ची रात्री काळभैरव अष्टक पाठ किमान २१ वेळा करावा .रात्री १० नंतर..दक्षिण दिशेला मुखं करून पाठ करावा.२..काळभैरव जयंती दिवशी घरी मोहरी तेलात तळलेले पदार्थ घरी बनवून ठेवा..रात्री ते झाकून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते गरिबांना दान करा..३..काळभैरव जयंती दिवशी ५ किंवा ११ लिंबू ची माळ बनवून ते काळभैरव याना अर्पण करावे .४. या दिवशी काळभैरव मंदिरात चंदन आणि गुलाब हे चढवावे..तसेच ३३ सुगंधी उदबत्त्या पेटवून त्या दाखवावा..५..सव्वा मिटर काळ्या कपड्यात सव्वाशे ग्राम काळे तीळ..सव्वाशे ग्राम.काळे उडीद..सव्वा अकरा रुपये ( वाटल्यास ११ रुपये) काळभैरव मंदिरात मनोकामना बोलून दान द्यावे .म्हणजे मंदिरात ठेवले तरी चालतील..
काळभैरवाचे प्रभावी मंत्र:
ॐ कालभैरवाय नम:।' ॐ भयहरणं च भैरव:।' ॐ ह्रीं बटुकाय आपदुद्धारणाय कुरूकुरू बटुकाय ह्रीं।' ॐ हं षं नं गं कं सं खं महाकाल भैरवाय नम:।' ॐ भ्रां कालभैरवाय फट्।'
कालभैरवाला नैवेद्य :
प्रत्येक वारानुसार काळभैरव यांचा नैवेद्य निराळा असतो..रविवारी दूध तांदूळ यांची खीर, सोमवारी मोती चुर लाडू, मंगळवारी शुद्घ तूप + गूळ यांचे पदार्थ..किंवा शुध्द तूप + गूळ टाकून बनवलेली लापशी .बुधवारी दही, गुरुवारी बेसन लाडू, शुक्रवारी भाजलेले चणे, शनिवारी तळलेले पापड, उडीद डाळ वडे .जिलेबी इ. यथाशक्ती नैवेद्य अर्पण करू शकतो!