शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

Kaal Sarpa Dosha Upay: कुंडलीत कालसर्प दोष कसा तयार होतो, जाणून घ्या त्याची लक्षणे आणि बिनखर्चिक उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2023 1:28 PM

Kaal Sarpa Dosha Upay: कालसर्प दोषासंबंधी अनेकांच्या मनात गैरसमज आहेत, ते दूर करण्याचे उपाय जाणून घ्या

ज्योतिष शास्त्रामध्ये काल सर्प दोष हा अत्यंत हानिकारक योग मानला गेला आहे. असे म्हणतात की ज्या व्यक्तीच्या कुंडलीत हा काल सर्प दोष तयार होतो. त्या व्यक्तीला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागतो. या दोषाचे निराकरण करण्याचे काहीच उपाय नाहीत का? आहेत! त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. 

कालसर्प दोषाची लक्षणे

१) ज्या व्यक्तीच्या कुंडलीत काल सर्प दोष असतो त्याला स्वप्नात अनेकदा मृत व्यक्ती दिसतात. इतकंच नाही तर त्यांना स्वतःच्या जीवाला धोका असल्याचेही स्वप्न दिसते. 

२) ज्या व्यक्तीच्या जीवनात काल सर्प दोष असतो त्याला जीवनात खूप संघर्ष करावा लागतो आणि गरजेच्या वेळी एकटेपणा जाणवतो.

3) कालसर्प ग्रस्त व्यक्तीच्या व्यवसायावर, आर्थिक उत्पन्नावर खूप नकारात्मक प्रभाव पडतो. त्यामुळे व्यवसायात वारंवार तोटा सहन करावा लागतो.

4) स्वप्नात साप दिसणे किंवा सर्प दंश झाल्याचे भास होणे, हे देखील कालसर्प योग असल्याचे लक्षण आहे. 

५) जोडीदारासोबत प्रत्येक विषयावर वाद होणे, मतभेद होणे, काडीमोड होण्याची परिस्थिती निर्माण होणे, हे कालसर्पाचे दुष्परिणाम आहेत. 

६) काल सर्प दोषामुळे व्यक्तीला मानसिक आणि शारीरिक त्रास होतो. यासोबतच वारंवार डोकेदुखी, त्वचारोग इत्यादीही कालसर्प दोषाची लक्षणे आहेत.

कुंडलीत काल सर्प दोष कधी तयार होतो?

ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा व्यक्तीच्या कुंडलीत सर्व ग्रह राहू आणि केतू यांच्यामध्ये येतात तेव्हा काल सर्प योग तयार होतो. तशी ग्रहस्थिती थांबवणे आपल्या हाती नाही, मात्र तशी परिस्थिती निर्माण झाली असता ती हाताळणे आपल्या हाती आहे. त्यासाठी जाणून घ्या उपाय. 

काल सर्प दोषाचा प्रभाव कमी करण्याचे काही सोपे मार्ग जाणून घेऊया.

1) काल सर्प दोष असलेल्या व्यक्तीने दर सोमवारी घरी किंवा मंदिरात जाऊन शिवलिंगावर अभिषेक करावा.

२) प्रदोष तिथीच्या दिवशी शिवमंदिरात रुद्राभिषेक करणेही लाभदायक ठरते.

3) याशिवाय संबंधित व्यक्तीने दररोज कुलदैवतेची पूजा करावी. तसेच शक्य होईल तेव्हा कुलदेवीचे तसेच कुलदेवतेचे दर्शन घ्यावे. 

४) प्रदोष काळात महामृत्युंजय मंत्राचा जप रोज किमान १०८ वेळा करावा.

5) याशिवाय दररोज ११  वेळा हनुमान चालिसाचे किंवा हनुमान स्तोत्राचे ११ वेळा पठण करावे.

काल सर्प दोष निवारणासाठी पूजेचे फायदे

1) जर एखाद्या व्यक्तीने कालसर्प दोष निवारण्यासाठी पूजा केली तर त्या वैयक्तिक कामात अडचणी येत नाहीत. २) काल सर्प दोष पूजेनंतर व्यक्तीचे वैवाहिक जीवन सुधारते. घरात आनंदाचे वातावरण राहते.३) त्याचबरोबर तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढते.४) चांगले मित्र भेटतात आणि तुमच्या विकासात त्यांचा हातभार लागतो. ५) व्यवसायात येणाऱ्या अडचणी संपतात आणि व्यवसाय वाढू लागतो.५) नोकरदारांना पद प्रतिष्ठा मिळते आणि त्यांच्या पदावर प्रगती होते.६) आर्थिक समस्यांपासूनही सुटका मिळेल.

कालसर्प दोष पूजा विधि

1) कालसर्पापासून मुक्ती मिळवण्यासाठी पूजेच्या दिवशी उपास करावा आणि ब्रह्मचर्य पाळावे.२) यानंतर शिवलिंगाचा रुद्राभिषेक करावा.३) महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. ४) नाग देवतेची पूजा करून नागाच्या मूर्तीला दूध अर्पण करावे.५) नाग गायत्री मंत्राचा जप करा - "ओम नागकुलाय विद्महे विषदन्तया धीमहि तन्नो सर्प प्रचोदयात"।६) तुम्ही "ओम नमो भगवते वासुदेवाय" या मंत्राचा जप देखील करू शकता.७) नागपंचमीच्या दिवशी भगवान शिव आणि विष्णूची पूजा केल्याने काल सर्प योगाचा प्रभाव कमी होतो.८) याशिवाय अनेक तीर्थक्षत्री कालसर्प दोष निवारणाची शांती केली जाते, ती देखील तुम्ही करू शकता. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष