शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

Kamada Ekadashi 2022: कर्जमुक्तीसाठी कामदा एकादशीला करा 'हे' उपाय, व्यवसायातही होईल वाढ!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 12:22 PM

Kamada Ekadashi 2022: अविवाहितांसाठीदेखील हे व्रत महत्त्वपूर्ण मानले जाते. त्यामुळे इप्सित मनोकामनापूर्तीसाठी विष्णूंची पूजा, उपासना करावी आणि कर्जमुक्तीसाठी पुढील उपाय करावेत. 

पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला कामदा एकादशीचे व्रत केले जाते. या व्रतामध्ये भगवान विष्णूची पूजा करतात. असे मानले जाते की या दिवशी मनोभावे पूजा केल्याने भगवान विष्णुकृपा प्राप्त होते आणि प्रत्येक इच्छापूर्ती देखील होते.अविवाहितांसाठीदेखील हे व्रत महत्त्वपूर्ण मानले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी पुढील उपास केल्यास कर्जमुक्तीसही हातभार लागतो असे म्हणतात. त्यामुळे इप्सित मनोकामनापूर्तीसाठी विष्णूंची पूजा, उपासना करावी आणि कर्जमुक्तीसाठी पुढील उपाय करावेत. 

कामदा एकादशीला हे उपाय करा

>>जर तुम्ही सतत कर्जाच्या ओझ्याने दबले जात असाल तर पिंपळाच्या झाडाला एक कलशभर पाणी अर्पण करा. तसेच पिंपळाच्या झाडाला ११ वेळा प्रदक्षिणा घालून धागा बांधावा आणि 'ओम नमो भगवते वासुदेवाय नमः' हा मंत्र म्हणावा. याचा फायदा होईल. 

>>व्यवसाय वाढवण्यासाठी आणि करिअरला नवी दिशा मिळण्यासाठी पिंपळाचे पान घ्या आणि त्यावर कुंकवाऐवजी हळदीचे स्वस्तिक बनवा. ते पान एखाद्या मंदिरात झाडाच्या बुंध्याशी ठेवून द्या. केळ्याचा नैवेद्य दाखवून गरजू व्यक्तीला केळीचे दान करा. 

>>कष्ट करूनही व्यक्तीची आर्थिक स्थिती सुधारत नसेल, तर एकादशीचा उपास करून भगवान विष्णूंची पूजा करावी. उपास शक्य नसेल तर विष्णू सहस्त्र नामाचे पठण करावे किंवा श्रवण करावे. 

>>घरातील सदस्यांमध्ये एखाद्या मुद्द्यावरून मतभेद होत असतील तर या दिवशी देवघरातील शंखामध्ये थोडे गंगाजल किंवा कलशातले साधे पाणी भरून भगवान विष्णूला अर्पण करावे. त्यानंतर भगवान विष्णूची पूजा करावी. त्यानंतर हे पाणी घराच्या कानाकोपऱ्यात शिंपडावे त्यामुळे गृहकलह मिटतात.