शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेवटी भाजपा सांगेल तेच आता करावे लागणार”; मनसे नेत्याची एकनाथ शिंदेवर टीका
2
“निवडणूक संपताच ST भाडेवाढ, लाडक्या बहिणीला २१०० देतील असे वाटत नाही”: नाना पटोले
3
बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराबाबत ममता बॅनर्जींनी मोदी सरकारला केली खास विनंती
4
"तुमची कोंडी करण्याचा प्रयत्न होईल, शिंदेंना मी आधीच सांगितलं होतं’’, या नेत्यानं केला दावा  
5
बांगलादेशमधील हिंदूंसाठी ठाकरे गट आक्रमक, प्रियंका चतुर्वेदींचं थेट मोदींना पत्र, केली अशी मागणी 
6
धक्कादायक! फुटबॉल मॅचमध्ये तुफान राडा, चाहते भिडले, हाणामारीत १००हून जास्त लोकांचा मृत्यू (Video)
7
काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे यांना ताप आणि थ्रोट इन्फेक्शन; आमदारांच्या भेटीही टाळल्या
8
भाजपाचा विधिमंडळ गटनेता कोण, निर्मला सीतारमन आणि रूपानींच्या उपस्थितीत होणार निर्णय
9
एकनाथ शिंदे नाराज होणं स्वाभाविक, त्यांच्यावर 'ही' जबाबदारी सोपवा; आठवलेंची नवी मागणी
10
Video कॉलने ९० वर्षीय आजोबांच्या आयुष्यात वादळ! आयुष्यभरात कमावलेले १.१५ कोटी गायब
11
८ दिवसांत २२ वेळा लागली शेतकऱ्याच्या घराला आग, धक्कादायक प्रकारामुळे गावकरी भयग्रस्त
12
'इतकं स्पष्ट बोलूनही शिंदेंवर आरोप करणं योग्य नाही'; संजय शिरसाटांनी मांडली भूमिका
13
ओला इलेक्ट्रिक ३२०० नवीन स्टोअर्स उघडणार, देशभरातील सर्व्हिस नेटवर्क मजबूत करणार!
14
२४ तासांत युटर्न! अविनाश जाधवांनी घेतला राजीनामा मागे; राज ठाकरेंच्या आदेशाचे पालन करणार
15
इरफान रझाक : एकेकाळी करत होते टेलरच्या दुकानात काम... आज १५००० कोटींची संपत्ती!
16
वडील जीवंत असूनही मुलांनी केलं श्राद्ध! नाना पाटेकरांच्या 'वनवास' सिनेमाचा हृदयस्पर्शी ट्रेलर बघून व्हाल भावुक
17
तिकडे शरद पवारांचे काय चाललेय? शिंदेंच्या भेटीला आव्हाड, फडणवीसांच्या भेटीला खासदाराला पाठविले
18
केडीएमसी कामगाराच्या कुटुंबाला जीवे ठार मारण्याची धमकी; नेमकं प्रकरण काय?
19
तुम्हाला माजी मंत्री ओळखता येत नाही का? शिंदेंच्या निवासस्थानाबाहेर गाडी अडवताच शिवतारे संतापले
20
PC Jewellers Share Price : वर्षभरात ५००% पेक्षा अधिक तेजी, आता १० भागांत स्प्लिट होणार 'हा' शेअर; रेकॉर्ड डेट कधी? 

Kartik Amavasya 2024: १ डिसेंबर रोजी कार्तिक आमवस्येला न विसरता करा पितृपूजन; मिळवा अनेक लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2024 2:52 PM

Kartik Amavasya 2024: यंदा 30 नोव्हेंबर आणि १ डिसेंबर अशा दोन दिवसात कार्तिक अमावस्या विभागून आली आहे, तरी १ तारखेला न विसरता पितृपुजन करावे.

ज्यांनी आपल्याला जन्म दिला, ज्यांच्या कुळात आपण वाढलो, ज्यांची परंपरा आणि नाव आपण पुढे नेत आहोत अशा आपल्या कुळातील दिवंगत व्यक्तींचा अर्थात पितरांचा सदैव आदर करावा. शक्य तेवढी सेवा करावी आणि दर अमावस्येला त्यांच्या नावे पूजन करावे, स्मरण करावे आणि मनोमन त्यांना वंदन करावे. त्यांच्यानावे दानधर्म केल्यास पुण्य लाभते आणि त्यांचा आशीर्वाद पुढच्या पिढ्यांनाही लाभतो. यासाठी तसेच पितृ दोषातून मुक्त होण्यासाठी धर्मशास्त्राने काही उपाय दिले आहेत, त्याचे यथाशक्ती पालन करावे. यंदा रविवार १ डिसेंबर रोजी कार्तिक अमावास्येनिमित्त (Kartik Amavasya 2024) सविस्तर माहिती जाणून घेऊ. 

माता-पिता, गुरुजन, आप्तस्वकीय यांना मान द्यावा हा संस्कार तर आपल्या संस्कृतीने घातला आहेच, परंतु त्यांच्या मृत्यूपश्चात आत्म्याला सद्गती मिळावी आणि त्यांचे ऋणात कायम कृतज्ञ राहावे, या भावनेने पितरांची सेवा सांगितली आहे. तसेच पितरांची सेवा करण्यामागे अनेक कारणेही दिली आहेत.

  • पितरांची सेवा केल्याने त्यांचे पितृलोकात गमन होते आणि सेवा करणाऱ्या मनुष्याचे जीवन सुखी आणि समृद्ध होऊन ज्यांना संतान नाही त्यांना संतान प्राप्ती होते. 
  • घरात नेहमी वातावरण तंग राहत असल्यास, घरात सतत भांडण, तंटा, कटकटी होत असल्यास यापैकी कोणत्याही कारणाने  घरातील सदस्याचे मन अस्वस्थ, बेचैन होत असल्यास पितरांची सेवा केल्याने घरातील वातावरण सुधारून प्रसन्न वाटते.
  • मुलांचे आईवडिलांशी वारंवार खटके उडत असल्यास, पती पत्नीमध्ये विकोपाची भांडणे होत असल्यास पितरांची सेवा केल्याने भांडणे वादविवाद कमी होतो व कुटुंबात सौख्य नांदते. 
  • घरात सतत आजारपण येत असेल किंवा कोणत्या ना कोणत्या कारणाने आर्थिक अडचणी निर्माण होत असल्या पितरांच्या सेवेने आरोग्य उत्तम लाभून आयुष्य वृद्धी वाढते.
  • पितरांच्या सेवेने समाजातील सर्व लोकांशी संबंध सुधारतात. कोणाकडून फसवणूक होत नाही. शेती, व्यवसाय, नोकरी संबंधित व्यक्तींशी संबंध सुधारून प्रगतीतील अडथळे दूर होतात. 
  • पितरांच्या सेवेने स्थावर मालमत्ता, संपत्ती यांचा लाभ होऊन कुटुंबास मनस्वास्थ्य लाभते व आत्मविश्वास वाढतो. 
  • बाहेरील बाधांचा, हितशत्रूंचा उपद्रव होत नाही. अकाली मृत्यू टळतो. 

  • कशी करावी पितृसेवा?

    >>आपले पूर्वज केवळ त्यांचे स्मरण केल्यानेही तुष्ट होतात. यासाठी दर अमावस्येला त्यांचे मनापासून स्मरण करा. 

    >>आपण जो स्वयंपाक करतो त्यातलाच थोडा भाग पितरांच्या नावे काढून कावळ्याला, गायीला नाहीतर कुत्र्याला खाऊ घाला. त्यांच्या रूपे पितर तृप्त होऊन समाधान पावतात. 

    >>पितरांच्या आवडीचा पदार्थ केल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला तो पितरांच्या नावे दान करा. एखाद्याचा आत्मा तृप्त झाला की पितरही तृप्त होतात. 

    >>यथाशक्ती दान करा. सेवा करा. त्यातून जे आत्मिक समाधान मिळते ते शब्दातीत असते. 

    थोडक्यात काय, तर आत्मा संतुष्ट तर परमात्मा आणि अंतरात्माही समाधान पावतो. यासाठी पितृसेवा करावी लागते. त्यासाठी दर महिन्यातील अमावस्या ही पर्वणी! वरील मुद्दे लक्षात घेता आपल्या पितरांच्या सेवेची संधी दवडू नका तसेच केवळ दिवंगत पितरांचीच नाही, तर जिवंत माता पित्यांच्या सेवेत कोणत्याही प्रकारची उणीव ठेवू नका. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिषPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२४