शहरं
Join us  
Trending Stories
1
CM म्हणून शिंदेंना मोठी पसंती, उद्धव ठाकरेंना किती मते; फडणवीस-राज ठाकरेंना किती टक्के कौल?
2
“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
3
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
4
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
5
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
6
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
7
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?
8
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती
9
Exit Poll: २०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
10
“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”: संतोष बांगर
11
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन
12
“अमित शाह यांनी CM भाजपाचा असेल असे कधी म्हटले नाही”; महायुतीतील नेत्याचे सूचक विधान
13
‘लाडकी बहीण’ योजनेचा फायदा महायुतीला मिळेल का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महिलांनी मतदान...”
14
“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत
15
“लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट, भ्रष्ट गौतम अदानींना अटक का करत नाही?”: नाना पटोले
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना अटक होणार? इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टानं जारी केलं 'अरेस्ट वॉरंट'
17
"सरकार तर स्थापन होऊ द्या"; मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरुन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने नाना पटोलेंना झापलं
18
IND vs AUS: ना विराट, ना रोहित, ना बुमराह; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 'हा' खेळाडू ठरेल 'हिरो'- पुजारा
19
गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार
20
IND vs AUS: "विराट म्हणजे क्रिकेटचा सुपरस्टार"; ऑस्ट्रेलियन खेळाडूची पत्नी 'किंग कोहली'वर फिदा

Kartik Purnima 2024: कार्तिक पौर्णिमेला 'या' वेळेतच कार्तिकेयाचे दर्शन घ्या; आर्थिक चिंतेतून मुक्त व्हा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 2:09 PM

Kartik Purnima 2024: कार्तिक महिन्यातील पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्र हा कार्तिकेय स्वामींच्या दर्शनासाठी शुभ मानला जातो; उपासना आणि लाभ जाणून घ्या!

>> सचिन मधुकर परांजपे, पालघर 

श्रीशिवपार्वतीचे ज्येष्ठ चिरंजीव, श्रीगजानानचे ज्येष्ठ भ्राता श्रीकार्तिकेय/कार्तिकस्वामी यांच्या दर्शनाचा योग यंदा दिनांक १५ नोव्हेंबर २०२४ कार्तिक पौर्णिमा, वार शुक्रवार रोजी रात्री ९ वाजून ५५ मिनिटे ते मध्यरात्री (उजाडती १६ तारिख, उजाडता शनिवार) २ वाजून ५८ मिनिटे या कालावधीत म्हणजे एकूण ५ तास ३ मिनिटे या वेळेतच कार्तिकस्वामी दर्शन पर्वणी आहे. या इतक्याच कालावधीत कार्तिक महिना, कार्तिक पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्र असा योग जुळून येतो आहे याची नोंद घ्यावी. त्यामुळे भाविकांनी श्रीकार्तिकस्वामी दर्शन केवळ या ५ तास ३ मिनिटे कालावधीत घेणे आवश्यक आहे. 

"कार्तिक महिना, पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्र" या तीन गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा म्हणजे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ज्या काळात कृत्तिका नक्षत्र असेल तेव्हा श्रीकार्तिकेयाचे दर्शन घेण्याचा शुभकाल मानला जातो. श्रीकार्तिकेय हे बल,बुध्दी,साहस आणि यशस्वितेचे प्रतिक मानले गेले आहे. तो शिवगणांचा सेनापती मानला जातो. त्यामुळे ज्ञानसंपन्नता, यशस्विता आणि इतर सर्व शुभगुणांचे अधिपत्य श्रीकार्तिकेयाकडे आहे. वर वर्णन केलेल्या पर्वणीकाळात त्याचे दर्शन घेणे हे "धनसंपत्तीकारक" ही मानले गेले आहे. कार्तिकस्वामींचे दर्शन घेतल्यानंतर आगामी सबंध वर्ष हे धनलाभाचे जातेच असा माझ्यासह अनेकांचा वर्षानुवर्षाचा अनुभव आहे. आर्थिक अडचणीत, कर्जात बुडालेल्या व्यक्तींनी या पर्वणीकाळात अवश्य दर्शन घेऊन प्रार्थना केल्यास आगामी वर्ष हे आर्थिक लाभाचे जाते असा समज आहे. श्रध्दा असेल तर हा अनुभव नक्कीच येतो. विशेष म्हणजे इतरवेळी कार्तिकेयाचे दर्शन हे पौराणिक संदर्भानुसार सर्व स्त्रीयांना वर्ज्य असले तरी या पर्वणीकाळात स्त्रीयादेखील कार्तिकेयाचे दर्शन घेऊ शकतात हे विशेष आहे. 

कार्तिकेय हा ब्रह्मचारी असल्याने दर्शनाचे वेळी त्यांना दंड, पाण्याने भरलेला कमंडलु, २७ रुद्राक्षांची माळ, कमळाचे फुल (किंवा कोणतीही पांढरी फुले) आणि दर्भ अर्पण करण्याची प्रथा आहे. अनेक भक्त प्रतिकात्मक पातळीवर सोने (सुवर्ण-Gold) देखील अर्पण करतात ( हे प्रतिकात्मक अर्पण असल्याने ते किमान १०० मिलीग्रॅम असले तरी चालते). दर्शनाचे वेळी अत्यंत भक्तिभावाने दर्शन घेऊन, वरीलपैकी शक्य असतील त्या वस्तुंचे अर्पण करावे आणि अपेक्षित प्रार्थना करावी. दर्शनाचे वेळी कार्तिकस्वामींच्या २८ नावांचा उल्लेख असलेले "प्रज्ञाविवर्धन स्तोत्रा"चे पाठ केल्यास अधिक उत्तम. विशेषत: विद्यार्थीदशेतील मंडळींनी प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचे पाठ करुन कार्तिकेयाचे दर्शन घेणे अधिक लाभदायक मानले गेले आहे. विद्याप्राप्ती व शैक्षणिक यशासाठी हे पर्वणी दर्शन खुप शुभ असते. 

पूजा विधी : 

त्या दिवशी स्नान, दैनंदिन पुजाअर्चा आटोपुन, आईवडील, गुरुंना नमस्कार करुन, शुचिर्भुतपणे दर्शन घ्यावे. वरीलपैकी शक्य असतील त्या गोष्टी अर्पण कराव्यात, प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचे पाठ जमतील तसे करावेत. त्या दिवशी मद्यपान, मांसाहार अर्थातच कटक्षाने वर्ज्य करावा. ब्रह्मचर्यपालनही करावे… दिनांक १५/उजाडता १६ नोव्हेंबर २०२४ रोजी फक्त ५ तास ३ मिनिटे या पर्वणीच्या काळातही रात्री ९.५५ ते १०.४७ आणि मध्यरात्री १२.२४ ते १ हे अधिक जास्त शुभकाळ असतील. 

पालघर व आसपासच्या परिसरात भवानगड (केळवे), वसई (निर्मळ) या परिसरात कार्तिकेयांची देवळे आहेत. पुण्याला पर्वतीवर, कोल्हापुरला महालक्ष्मी मंदिरालगत देऊळ आहे. स्वतंत्र मंदिर न मिळाल्यास कोणत्याही दाक्षिणात्य मंदिरातील मुरुगनस्वामींचे दर्शनही घेऊ शकता (मुरुगन म्हणजेच कार्तिकेय) 

अधिक माहितीसाठी प्रज्ञाविवर्धन स्तोत्र आणि कार्तिकेयाष्टकम् दोन्ही देत आहे...

प्रज्ञाविवर्धन स्तोत्र

अस्य श्रीप्रज्ञाविवर्धन-स्तोत्र-मंत्रस्य सनत्कुमारऋषि:।स्वामी कार्तिकेयो देवता। अनुष्टुप् छंद:।मम सकल विद्यासिद्ध्यर्थं जपे विनियोग:।श्रीस्कंद उवाच।।योगीश्वरो महासेन: कार्तिकेयोSग्निनन्दन:। स्कंद:कुमार: सेनानी: स्वामिशंकरसंभव: ।।१।। गांगेयस्ताम्रचूडश्च ब्रह्मचारी शिखिध्वज:। तारकारिरुमापुत्र: क्रौंचारिश्च षडानन: ।।२।। शब्दब्रह्मसमुद्रश्च सिद्ध:सारस्वतो गुह:। सनत्कुमारो भगवान् भोगमोक्षफलप्रद: ।।३।।शरजन्मा गणाधीशपूर्वजो मुक्तिमार्गकृत। सर्वागमप्रणेताच वांछितार्थप्रदर्शन: ।।४।। अष्टाविंशति नामानि मदीयानीति य: पठेत्। प्रत्यूषं श्रद्धयायुक्तो मूको वाचस्पतिर्भवेत् ।।५।। महामंत्रमयानीति मम नामानुकीर्तनम्। महाप्रज्ञामवाप्नोति नात्र कार्या विचारणा ।।६।। || इति श्री प्रज्ञाविवर्धन स्तोत्रं संपूर्णम्।

श्रीकार्तिकेयाष्टकम् 

ॐ श्रीगणेशाय नमः ।अगस्त्य उवाच- नमोऽस्तु वृन्दारक-वृन्दवन्द्य-पादारविन्दाय सुधाकराय । षडाननाया-मितविक्रमाय गौरीहृदानन्दसमुद्भवाय ॥ १॥ नमोऽस्तु तुभ्यं प्रणतार्तिहन्त्रे कर्त्रे समस्तस्य मनोरथानाम् । दात्रे रथानां परतारकस्य हन्त्रे प्रचण्डासुरतारकस्य ॥ २॥ अमूर्तमूर्ताय सहस्रमूर्तये गुणाय गण्याय परात्पराय । अपारपाराय परापराय नमोऽस्तु तुभ्यं शिखिवाहनाय ॥ ३॥ नमोऽस्तु ते ब्रह्मविदां वराय दिगम्बरायाम्बरसंस्थिताय । हिरण्यवर्णाय हिरण्यबाहवे नमो हिरण्याय हिरण्यरेतसे ॥ ४॥ तपः स्वरूपाय तपोधनाय तपः फलानां प्रतिपादकाय । सदा कुमाराय हि मारमारिणे तृणीकृतैश्वर्यविरागिणे नमः ॥ ५॥ नमोऽस्तु तुभ्यं शरजन्मने विभो प्रभातसूर्यारुणदन्तपङ्क्तये । बालाय चाबालपराक्रमाय षाण्मातुरायालमनातुराय ॥ ६॥ मीढुष्टमायोत्तरमीढुषे नमो नमो गणानां पतये गणाय । नमोऽस्तु ते जन्मजरातिगाय नमो विशाखाय सुशक्तिपाणये ॥ ७॥ सर्वस्य नाथस्य कुमारकाय क्रौञ्चारये तारकमारकाय । स्वाहेय गाङ्गेय च कार्तिकेय शैवेय तुभ्यं सततं नमोऽस्तु ॥ ८॥ इति स्कान्दे काशीखण्डतः श्रीकार्तिकेयाष्टकं सम्पूर्णम् ॥

या दर्शनपर्वणीचा लाभ घ्या

 

टॅग्स :Puja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२४