शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, खर्गे, सुप्रिया सुळेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
2
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
3
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
4
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
5
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
6
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
7
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
8
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
9
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
10
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
11
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
12
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
13
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
14
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
15
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
17
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
18
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)
19
कॅनडा झालं सुतासारखं सरळ! आता म्हणे- निज्जर हत्याकांडात भारताचा कुठलाही समावेश नाही!
20
पंढरपूर, मंगळवेढ्यासह प्रमुख ३० गावे ठरवणार नवीन आमदार; तुतारी, इंजिन कुणाच्या विजयाचे गणित बिघडवणार?

Kartiki Ekadashi 2024: कार्तिकी एकादशीच्या उपासाला 'हे' पदार्थ खाणे आवर्जून टाळा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 10:02 AM

Kartiki Ekadashi 2024: १२ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीचा उपास करायचा आहे, त्यावेळेस कोणती पथ्य पाळायची तेही जाणून घेऊ.

आपल्याकडे अनेक कारणांसाठी उपास केले जातात. सोमवार महादेवाचा, मंगळवार गणपतीचा, गुरुवार दत्त गुरूंचा, शनिवार मारुती रायाचा! शिवाय व्रत वैकल्य, उपासना, नवस इ. कारणांसाठीही उपास केले जातात. काही जण नैमित्तिक उपास करतात. तर काही जणांचे वर्षातून मोजके उपास ठरलेले असतात. अशातच बाराही महीने एकादशीचा उपास करणारे भाविक आहेत आणि ज्यांना शक्य नाही ते आषाढी कार्तिकी एकादशीचा उपास आवर्जून करतात.  मात्र सतत खाण्याची सवय मोडत उपसाच्या दिवशी तोंडावर पट्टी चिकटवायची म्हणजे अवघडच! त्यावर पर्यायही आहेत, १२ नोव्हेंबर रोजी येणार्‍या कार्तिकी एकादशीनिमित्त (Kartiki Ekadashi 2024) आपणही ते जाणून घेऊ!

एकादशी आणि दुप्पट खाशी म्हणतात ते उगाच नाही. वास्तविक पाहता उपासाची थाळी ही रिकामी असणे अपेक्षित आहे. मध्यंतरी समाज माध्यमांवर रिकामी थाळी आणि रिकाम्या वाट्या असा फोटो उपासाची थाळी या नावे फिरत होतो. आपण त्यावर गमतीने हसत असलो, तरी उपासाची थाळी धर्मशास्त्राला अशीच अभिप्रेत आहे- रि का मी!

उपास म्हणजे काय?

उपावृत्तीच पापांची सहवास गुणी सदा,उपवास म्हणावे त्या, शरीरा शोषणे न चि।

मन व शरीर यांनी कोणतेही पापाचरण म्हणजे वाईट किंवा निंद्य आचरण करू नये व गुणीजनांचा सहवास मिळावा या दोन्ही क्रियांना मिळून उप अधिक वास म्हणजे उपवास असे म्हणतात. फक्त शरीराचे पोषण अर्थात उपास, लंघन करेल तो उपवास नव्हे. या पार्श्वभूमीवर आपण जर उपासाचे पदार्थ खाऊन उपास करत असू, तर त्याला उपास म्हणताच येणार नाही असे धर्मशास्त्र सांगते. उपासाच्या दिवशी काहीही न खाता केवळ शरीराला नाही तर विविध विकारांपासून मनालाही उपास घडावा म्हणून सत्संग करावा असे शास्त्र सांगते.

उपास केल्याने होणारे फायदे : 

उपावृत्तस्य पापेभ्यो सहवासो गुणे हि य:।उपवास: स विज्ञेय: न शरीरस्य शोषणम् ।।

उपासाचे दिवशी शारीरिक लंघन केल्याने शरीराचे विकार दूर होतात, तसेच मनाचे लंघन केले तर मनाचे विकार दूर होतात. विषयांची आसक्ती दूर करण्यासाठी उपासाच्या दिवशी मन कामात, हरीकीर्तनात, भजनात रमवावे आणि अनन्यभावे भगवंताला शरण जाऊन नामस्मरण करावे. 

हे सर्व वाचून सुगरणींचा हिरमोड झाला असेल, परंतु आपल्याला केवळ देहाचे नाही तर मनाचेही आरोग्य जपायचे आहे ना? ते सर्वस्वी तुमच्याच हातात आहे. उपासाचे पदार्थ अन्य कधीही बनवून खाता येतील, पण उपासाचा हेतू साध्य करायचा असेल तर तना-मनाचा उपास अर्थात लंघन घडणे आवश्यक आहे!यंदाच्या एकादशीला तना-मनाला उपास घडवुया आणि विठ्ठल रखुमाईचे नाम घेऊया! 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न