सध्याच्या काळात प्रत्येक जण पैसा मिळवण्यासाठी आणि श्रीमंत होण्यासाठी प्रयत्न करत आहे. श्रीमंत होण्याची इच्छा नाही अशी व्यक्ती कदाचितच कोणी असेल. पैसा कमवण्याच्या शर्यतीत आज प्रत्येकजण पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हीही या शर्यतीत सहभागी असाल तर त्यात नवल नाही. परंतु पैसा कमवण्यासाठी मेहनत करण्याबरोबरच तुम्ही काही वास्तू टिप्स फॉलो केल्या तर तुम्हाला पुढे जाण्यास नक्की फायदा होऊ शकतो.
वास्तु टिप्सनुसार काही गोष्टी तुमच्या पर्समध्ये ठेवल्यास तुमची आर्थिक समस्यांपासून सुटका होते आणि तुमच्यावरील कर्ज देखील संपते. काही वस्तू पर्समध्ये ठेवल्याने तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा होते. आणि तुम्हाला लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. यामुळे तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतात.
कमळाचे बी :वास्तुशास्त्रानुसार पर्समध्ये कमळाचे बी ठेवल्याने देखील तुमच्या आर्थिक समस्या दूर होऊ शकतात. धार्मिक मान्यतांनुसार माता लक्ष्मीला कमळ अतिशय प्रिय आहे. त्यामुळे माता लक्ष्मीची पूजा करताना कमळाचे फूल अर्पण केले जाते. तुम्ही पर्समध्ये नेहमी कमळाचे बी ठेऊ शकता. यामुळे तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही.
सोन्याचे किंवा चांदीचे नाणे: वास्तूशास्त्रानुसार पर्समध्ये नेहमी सोन्याचे किंवा चांदीचे नाणे ठेवावे. परंतु ते पर्समध्ये ठेवण्यापूर्वी ते माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करा आणि देवीचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो अशी प्रार्थना करा. वास्तूनुसार हा एक रामबाण उपाय आहे जो तुमची पर्स कधीही रिकामी होऊ देणार नाही.
श्री यंत्र : आर्थिक अडचणींतून बाहेर पडण्यासाठी तुम्ही पर्समध्ये श्री यंत्र देखील ठेऊ शकता. वास्तुशास्त्रानुसार पर्समध्ये श्रीयंत्र ठेवणे देखील शुभ मानले जाते. पर्समध्ये श्री यंत्र ठेवल्याने व्यक्ती सकारात्मक बनते आणि सुख-समृद्धी प्राप्त होते अशी मान्यता आहे.
पिंपळाचे पान : वास्तुशास्त्रानुसार पर्समध्ये पिंपळाचे पान ठेवल्याने आर्थिक समस्यांपासून सुटका होते. धार्मिक मान्यतांनुसार पिंपळाच्या पानांमध्ये भगवान विष्णूंचा निवास असतो आणि भगवान विष्णू प्रसन्न झाले तर देवी लक्ष्मीची कृपा देखील प्राप्त होते. परंतु पिंपळाचे पान पर्समध्ये ठेवण्यापूर्वी ते गंगाजलाने धुवून त्यावर श्री लिहावे. पर्समध्ये ठेवल्यानंतर ते पान कोणालाही दिसणार नाही याची काळजी घ्यावी.