शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

आपले काम शेवटपर्यंत प्रामाणिकपणे करत राहा, काय सांगावं कधी भाग्य उघडेल ते!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 10:20 AM

प्रामाणिक माणसाला त्याच्या कामाचा मोबदला तर मिळतोच, पण नशीब बलवत्तर असेल तर घबाडही हाती लागते!

'कर भला, सो हो भला' अशी आपल्याला शिकवण दिली जाते. शिकवण नव्हे, तर हा संस्कारच! यापुढे जाऊन भगवान श्रीकृष्ण तर सांगतात, 

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि।

तुम्ही चांगले काम करत राहा, फळाची अपेक्षा ठेवू नका. तुमच्या कामाची नोंद घेण्यासाठी स्वर्गामध्ये चित्रगुप्त बसले आहेत. ते योग्य वेळी योग्य फळ तुम्हाला देतील. तोवर तुम्ही तुमचे कर्म करत राहा. 

परंतु, बऱ्याचदा आपल्याला चांगले काम करूनही वाईट अनुभव येतात. मग दुनियादारी नकोशी होते आणि सत्कर्मावरून विश्वास उडून जातो. मात्र, हीच ती वेळ असते, स्वत:शी प्रामाणिक राहण्याची. आपण जर स्वत:ची फसवणूक केली, आपल्या कामाशी प्रतारणा केली, तर त्याचे फळ आपल्यालाच भोगावे लागते. म्हणून प्रत्येक काम इमानदारीने आणि स्वत:शी प्रामाणिक राहून करा, त्याचे फळ आज ना उद्या मिळाल्यावाचून राहणार नाही. हेच सांगणारी छानशी बोधकथा!

एक युवक असतो. अत्यंत हुशार, सुस्वभावी, प्रामाणिक, मेहनती परंतु अतिशय गरीब. प्रतिकुल परिस्थितीवर मात करून, शिष्यवृत्ती मिळवून त्याने आपले अभियांत्रिकीचे प्रशिक्षण पूर्ण केले. मात्र, हवी तशी नोकरी त्याला मिळत नव्हती. त्यामुळे घरचे दारिद्र्यही दूर होत नव्हते. नोकरी नाही त्यामुळे छोकरीही नाही. तरीदेखील, त्या युवकाने काम मिळवण्यासाठी आपले प्रयत्न सुरू ठेवले. 

एक दिवस त्याला ओळखितल्या एका बिल्डरकडून एका जुन्या वसाहतीचे पुनर्वसन करण्याचे काम मिळाले. नशीबाचे दार उघडले. तो खुश झाला. त्याने वसाहतीची बारकाईने पाहणी केली आणि नवीन वसाहतीचे स्वरूप कसे असेल, याची आखणी केली. 

त्या वसाहतीत बहुतांशी वृद्ध जोडपी राहत होती. युवकाने नवीन वसाहतीचा आराखडा त्यांच्यासमोर ठेवला. सर्व जोडप्यांचे एकमत होईना. प्रत्येकाची मागणी ऐकून घेत, युवकाने नवीन आराखडा तयार केला. सर्वांना दाखवला. सर्वांची पसंती मिळाली आणि कामाचा श्रीगणेशा झाला. 

युवकाने जातीने हजर राहून कामाची पाहणी केली. उत्तम प्रतीचे सिमेंट, वीटा, दगड, लोखंडी सळ्या, पाईप इ. बांधकाम निगडित वस्तुंची यादी केली. बिल्डरने दुजोरा दिला. आर्थिक पाठबळ मिळाले. त्यामुळे दर्जेदार कामाची सुरुवात झाली. युवकाची मेहनत आणि नवी वसाहत आकार घेत असल्याचे पाहून वसाहतीतील जुने लोक आनंदून गेले. त्या युवकाशी सर्वांची चांगली गट्टी जमली. आणि त्याच्याशी बोलताना आर्थिक स्थितीबद्दल माहिती मिळाली. 

वसाहतकरांनी एक शक्कल लढवली. आपल्याच वसाहतीत त्यांनी आणखी एक छोटेसे घर बांधून मागितले. त्या घराचे काम बिल्डरच्या अखत्यारित नव्हते. परंतु वसाहतीतल्या लोकांनी त्या घरासाठी पैसा उभा करणार असे सांगितले. फक्त ते काम याच युवकाच्या देखरेखित व्हावे, असा सर्वांनी आग्रह केला. युवकाने प्रामाणिकपणे, तेवढ्याच मेहनतीने शेवटचे घरही बांधून पूर्ण केले. नवीन वसाहतीसकट त्या घराची चावीदेखील वसाहतीच्या लोकांच्या स्वाधीन केली. युवकाला त्याच्या कामाचा चांगला मोबदला बिल्डरकडून मिळाला होताच, परंतु त्याच्या चांगल्या वागणुकीचे, प्रामाणिकपणाचे आणि अविश्रांत घेतलेल्या मेहनतीचे फळ म्हणून वसाहतीतल्या लोकांनी जादा बांधून घेतलेले घर युवकाच्या नावे केले आणि घराची चावी त्याला सुपूर्द केली. 

भाग्योदय झाला, की रंकाचा राव होतो. परंतु, त्यासाठी आपले सत्कर्माचे पारडे जड असावे लागते. निरपेक्षपणे केलेली सेवा निश्चितच फळते, फक्त कधी, याची वाट न पाहता, कर्म करत राहायचे असते.

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी