>> सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)
आज दिनांक २४ नोव्हेंबर रोजी खंडोबाचे षड्रात्र सुरु होत आहे. कुलदेवतेची कृपा आपल्या घराण्यावर सतत रहावी यासाठी नवरात्र इत्यादी काळामधे तिची विशेष उपासना करतात. आजपासून खंडोबाचे षड्रात्र घरोघरी बसत आहे. ज्यांचे कुलदैवत श्री खंडोबा आहे त्यांनी आजपासून चंपाषष्ठी पर्यंतच्या ६ दिवसात आपापल्या कुळाचाराप्रमाणे खंडोबाचे पूजन, नामस्मरण करावे. देवता या स्मरणमात्र व स्तुतीने संतुष्ट होत असतात. यासाठीच अनेक सत्पुरुषांनी विविध देवतांची स्तुती व स्तोत्रे रचलेली आहेत.
श्री खंडोबाचे असेच एक दिव्य व प्रासादिक स्तोत्र परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांनी रचलेले आमच्या देशपांडे पंचांगाच्या छापील प्रतीत आम्ही मुद्दाम छापलेले आहे, ते सोबत देत आहोत. देव हा अनन्यभावे भक्तीचा भुकेला असून अंत:करणापासून स्तुति केल्यास त्याची कृपा निश्चित संपादन होते. या खंडोबाच्या षड्रात्रोत्सवकाळात या स्तोत्राचे किमान एकवेळा तरी भक्तीभावाने पठण करून श्री खंडोबास भंडारा अर्पण करावा व मल्हारीमार्तंडाची कृपा संपादन करावी.
श्रीमत्खण्डराजस्तोत्रम्| श्रीशंकरावतारोsयं खण्डराजो महामतिः। तस्मै महालसेशाय मणिमल्लारये नमः।।१।। ऋषीणां यस्तपःसिद्ध्या अवतीर्य महीतले। दैत्याननाशयत्तस्मै मणिमल्लारये नमः।।२।। यो वेदमयमास्थाय महाश्वमपराजितम्। जघ्ने दैत्यरिपून्तस्मै मणिमल्लारये नमः।।३।। पीतवस्त्रपरीधानः पीताभरणभूषितः। त्रैलोक्यवंदितस्तस्मै मणिमल्लारये नमः।।४।। मार्गशीर्षे महामासे प्रत्यब्दं यन्महोत्सवः।योsभीष्टदो विभुस्तस्मै मणिमल्लारये नमः।।५।। देवः प्रतापमार्तण्डभैरवः शत्रुकृन्तनः। सर्वापत्तिहरस्तस्मै मणिमल्लारये नमः।।६।। खण्डराज प्रसीद त्वं सर्वापत्तिमपाकुरु। पाहि मां त्वं प्रभो तुभ्यं मणिमल्लारये नमः।।७।। कायेन मनसा वाचा येsपराधा मया कृताः। तां क्षमस्व प्रभो तुभ्यं मणिमल्लारये नमः।।८।। खण्डराजस्तुतिमिमां त्रिसंध्यं यः पठेद्द्विजः। सर्वान्कामान्स आप्त्वेह शिवलोके महीयते।।९।। इति श्री प. प. श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितं श्रीखण्डराजस्तोत्रं संपूर्णम्।।
संपर्क : 9823916297