शहरं
Join us  
Trending Stories
1
Sourav Ganguly, Police Complaint: सौरव गांगुलीने केली तक्रार, कारवाई करण्यासाठी पोलीस 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; प्रकरण काय?
2
गणपती विसर्जन मिरवणुकीत भंडारा येथे इमारतीचा सज्जा खचला; ३ महिला गंभीर, ६ किरकोळ जखमी
3
Lebanon Explosions: लेबनानमध्ये पेजर नंतर आता रेडिओ-लॅपटॉप, मोबाईल स्फोट; ३ ठार, १००हून अधिक जखमी
4
महायुतीत ‘ऑल इज नॉट वेल’, नागपुरात भाजपची डोकेदुखी वाढली, आभा पांडे बंडखोरीच्या भूमिकेत
5
प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार; लातुरात आराेपीला १० वर्षांचा सश्रम कारावास, लाखाचा दंड
6
'धुळ्याच्या लेकी'चा राजेशाही थाट! बॉलिवूडच्या मृणाल ठाकूरचा 'रॉयल कारभार', पाहा Photos
7
वेसावे कोळीवाड्यात शिपीलमधून ७४ गणेशमूर्तींचे विसर्जन; २० तास चालला विसर्जन सोहळा
8
२०२९ला होणार वन नेशन, वन इलेक्शन? कोणालाच बहुमत मिळाले नाही तर? १८ हजार पानी अहवालात काय?
9
Fazalhaq Farooqi Allah Ghazanfar, AFG vs SA: टांगा पलटी घोडे फरार... 'अफगाणी' आक्रमणापुढे आफ्रिकेचे लोटांगण, १०६ धावांत All Out
10
बिहारच्या नवादामध्ये गावगुंडांचा हैदोस; अंदाधुंद गोळीबारानंतर 80 घरांना लावली आग
11
डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा मारण्याचा प्रयत्न, रॅलीजवळ कारमध्ये आढळली स्फोटके
12
शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय; मोदी सरकारने PM-ASHA योजनेसाठी मंजूर केले ₹35,000 कोटी
13
"एक देश एक निवडणूक हे सर्व ठीक आहे पण...", राज ठाकरेंनी विचारले नाना प्रश्न
14
लेबनॉन पेजर स्फोटानंतर हिजबुल्लाह संतापले; इस्रायलवर शेकडो रॉकेट डागले
15
Glenn Phillips Dhananjaya de Silva Video, SL vs NZ 1st Test: खतरनाक स्पिन! टप्पा पडून चेंडू वळला अन् काहीही कळण्याआधीच 'दांडी गुल'
16
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!
17
मध्य प्रदेशात मोठा अपघात! सात जणांचा मृत्यू; दहा जण जखमी, अंगावर काटा आणणारे दृश्य
18
India vs Bangladesh 1st Test Free Live Streaming: फुकटात पाहता येणार भारत-बांग्लादेश पहिली कसोटी, पण कुठे? वाचा सविस्तर
19
पाण्यासाठी पाकिस्तान तरसणार, भारताने पाठविली नोटीस; सिंधू वाटप करार बदलणार
20
'एक देश एक निवडणूक' संविधानविरोधी; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर हल्लाबोल

Guru Purnima 2024 गुरुपौर्णिमा: गुरुचरित्र पारायण शक्य नाही? १० मिनिटांत होणारे ‘हे’ स्तोत्र म्हणा, तितकेच पुण्य मिळवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 7:07 AM

Bavan Shloki Gurucharitra On Guru Purnima 2024: संपूर्ण गुरुचरित्राचे महत्त्वाचे सार यात दिलेले आहे. याच्या पठणाने गुरुचरित्र पारायणाचे पुण्य लाभू शकते, असे सांगितले जाते.

Bavan Shloki Gurucharitra On Guru Purnima 2024: चातुर्मासातील पहिला मोठा सण म्हणजे गुरुपौर्णिमा. आषाढ महिन्याची पौर्णिमा व्यास पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. भारतीय पंरपरा, संस्कृतींमध्ये गुरुपौर्णिमेला अनन्य साधारण महत्त्व आहे. या दिवशी गुरुबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली जाते. या दिवशी दत्तगुरूंचे पूजन, नामस्मरण, मंत्र जप करणे शुभ मानले जाते. 

श्रीदत्त अवताराचा आणि श्रीदत्तात्रेय देवतेचा उद्भव, उगम आणि प्रवास अद्भुत आहे. श्रीदत्तात्रेय अवतार हा उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही स्थितींचा निर्देशक आहे. निर्गुण आणि निराकार अशा ब्रह्म तत्त्वाची अनुभूती जो करून देतो तो गुरू. गुरू म्हणजे केवळ मास्तर नव्हे, गुरू म्हणजे केवळ शिकविणारा नव्हे. ज्याला आपल्या शिष्याबद्दल ममत्व वाटते, आपल्यापाशी असलेली ज्ञानसमृद्धी शिष्यापर्यंत पोहोचवावी अशी ज्याला तळमळ असते. शिष्याने आपल्याही पुढे जावे अशी इच्छा जो मनोमन बाळगतो तो खरा गुरू. दत्त संप्रदायात गुरुचरित्रण पारायणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. गुरुचरित्र पारायणाचे अनेक लाभ होतात. अपार पुण्य लाभते. दत्तगुरुंची विशेष कृपा होते, अशी मान्यता आहे.

आजच्या धकाधकीच्या जीवनात कितीही इच्छा असली, तरी सर्व नियम पाळून गुरुचरित्र पारायण करणे, त्यासाठी तेवढा वेळ देणे, शक्य होतेच असे नाही. गुरुपौर्णिमेला गुरुचरित्र पारायणाची अनेकांची इच्छा असते. परंतु, ते साध्य होत नाही. अशावेळी निराश होण्याचे कारण नाही. यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे बावनश्लोकी गुरुचरित्र. श्रीदत्त साहित्यात बावनश्लोकी गुरुचरित्रास फार महत्त्व आहे. संपूर्ण गुरुचरित्राचे महत्त्वाचे सार यात दिलेले आहे. बावन श्लोकांत संपूर्ण गुरुचरित्र सांगितलेले आहे. हे गुरुचरित्र सार श्लोकात्मक आहे. परम दत्तभक्तांनी याचे नित्यपठण करावे. किमान गुरुवार किंवा पौर्णिमेला एकदा पठण करावे. बावनश्लोकी गुरुचरित्राच्या पठणाने जीवनात उद्भवणाऱ्या समस्या सोसण्याचे बळ मिळून त्या समस्यांची तीव्रता कमी झाल्याचे जाणवेल. कल्याण होईल, असे आशिर्वचन देण्यात आले आहे. 

बावनश्लोकी गुरुचरित्र

श्रीगणेशाय नमः । श्रीदत्तात्रैयगुरुवे नमः ॥

अथ ध्यानम्

दिगंबरं भस्मसुगंधलेपनं चक्रं त्रिशूलं डमरुं गदांच ।पद्मासन्स्थं रविसोमनेत्रं दत्तात्रयं ध्यानमभिष्ट सिद्धिदम् ॥ १ ॥

काषायवस्त्रं करदंडधारिणं कमंडलुं पद्मकरेण शंखम् ।चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥ २ ॥

कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनंदनः ।द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपादश्रीवल्लभः ॥ ३ ॥

ॐ नमोजी विघ्नहरा । गजानना गिरिजाकुमरा । जयजयाजी लंबोदरा । शकदंता शूर्पकर्णा ॥ १ ॥ त्रिमूर्तिराजा गुरु तूंचि माझा । कृष्णातिरी वास करुनी ओजा ॥सद्भक्त तेथे करिती आनंदा । त्या देव स्वर्गी बघती विनोदा ॥ २ ॥ जयजयाजी सिद्धमुनी । तूं तारक भवार्णंवातुनी ।संदेह होता माझे मनीं । आजि तुवां कुडें केलें ॥३॥

ऐशी शिष्याची विनंती । ऐकूनि सिद्ध काय बोलती ।साधु साधु तुझी भक्ति । प्रीती पावो श्रीगुरुचरणीं ॥४॥

भक्तजन रक्षणार्थ । अवतरला श्रीगुरुनाथ ।सगरपुत्रा कारणें भगीरथें । गंगा आणिली भूमंडळीं ॥५॥

तीर्थें असती अपार परी । समस्त सांडूनि प्रीति करी ।कैसा पावला श्रीदत्तात्री । श्रीपादश्रीवल्लभ ॥६॥

ज्यावरीं असे श्रीगुरुची प्रीति । तीर्थमहिमा ऐकावया चित्तीं ।वांछा होतसे त्या ज्ञानज्योती । कृपामूर्ति गुरुराया ॥७॥

गोकर्णक्षेत्रीं श्रीपादयती । राहिले तीन वर्षें गुप्ती ।तेथूनि गुरु गिरिपुरा येती । लोकानुग्रहाकारणें ॥८॥

श्रीपाद कुरवपुरीं असता । पुढें वर्तली कैसी कथा ।विस्तारुनि सांग आतां । कृपामूर्ति दातारा ॥९॥

सिद्ध म्हणे नामधारकासी । श्रीगुरुमहिमा काय पुससी ।अनंतरुपें परियेसी । विश्वव्यापक परमात्मा ॥१०॥

सिद्ध म्हणे ऐक वत्सा । अवतार झाला श्रीपाद हर्षा ।पूर्व वृत्तांत ऐकिला ऐसा । कथा सांगितली विप्रस्त्रियेची ॥११॥

श्रीगुरु म्हणती जननीसी । आम्हां ऐसा निरोप देसी ।अनित्य शरीर तूं जाणसी । काय भंरवसा जीवित्वाचा ॥१२॥

श्रीगुरुचरित्र कथामृत । सेवितां वांछा अधिक होत ।शमन करणार समर्थ । तूंचि एक कृपासिंधु ॥१३॥

ऐकूनि शिष्याचें वचन । संतोष करी सिद्ध आपण ।श्रीगुरुचरित्र कामधेनु जाण । सांगता झाला विस्तारें ॥१४॥

ऐक शिष्या शिरोमणी । धन्य धन्य तुझी वाणी ।तुझी भक्ति श्रीगुरुचरणीं । लीन झाली परियेसी ॥१५॥

विनवी शिष्य नामांकित । सिद्ध योगियातें पुसत ।सांग स्वामी वृत्तांत । श्रीगुरुचरित्र विस्तारें ॥१६॥

ऐक शिष्या नामकरनी । श्रीगुरुभक्त शिखामणी ।तुझी भक्ति श्रीगुरुचरणीं । लीन झाली निर्धारें ॥१७॥

ध्यान लागलें श्रीगुरुचरणीं । तृप्ति नोहे अंतःकरणीं ।कथामृत संजीवनी । आणिक निरोपाची दातारा ॥१८॥

अज्ञान तिमिर रजनींत । निजलो होतो मदोन्मत्त ।श्री गुरुचरित्र वचनामृत । प्राशन केलें दातारा ॥१९॥

स्वामी निरोपिलें आम्हांसी । श्रीगुरु आले गाणगापुरासी ।गौप्यरुपें अमरपुरासी । औदुंबरीं असती जाण ॥२०॥

सिद्ध म्हणे नामधारका । ब्रह्मचारी कारणिका ।उपदेशी ज्ञान विवेका । तये प्रेंत जननीसी ॥२१॥

तुझा चरणसंपर्क होता । झालें ज्ञान मज आतां ।परमार्थीं मन ऐकतां । झालें तुझें प्रसादें ॥२२॥

लोटांगणें श्रीगुरुसी । जाऊनि राजा भक्तीसीं ।नमस्कारी विनयेसी । एकभावें करुनियां ॥२३॥

शिष्यवचन परिसुनी । सांगता झाला सिद्धमुनी ।ऐक भक्ता नामकरणी । श्रीगुरुचरित्र अभिनव ॥२४॥

सिद्ध म्हणे ऐक बाळा । श्रीगुरुची अगम्य लीला ।सांगतां न सरे बहुकाळा । साधारण मी सांगतसे ॥२५॥

श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी । नको भ्रमू रे युक्तीसी ।वेदांत न कळे ब्रह्मायासी । अनंत वेद असती जाण ॥२६॥

चतुर्वेद विस्तारेंसी । श्रीगुरु सांगती विप्रासी ।पुढें कथा वर्तली कैसी । विस्तारावी दातारा ॥२७॥

नामधारक म्हणे सिद्धासी । पुढील कथा सांगा आम्हांसी ।उल्हास होतो माझे मानसीं । श्रीगुरुचरित्र अति गोड ॥२८॥

पुढें कथा कवणेपरी । झाली असे गुरुचरित्रीं । निरुपावें विस्तारीं । द्धमुनी कृपासिंधू ॥२९॥

श्रीगुरुचरित्र सुधारस । तुम्हीं पाजिला आम्हांस ।परि तृप्त नव्हे गा मानस । तृषा आणिक होतसे ॥३०॥

सिद्ध म्हणे नामधारका । पुढें अपूर्व झालें ऐका ।योगेश्वर कारणिका । सांगे स्त्रियांचे स्वधर्म ॥३१॥

पतिव्रतेच्या रीती । सांगे देवांसी बृहस्पती ।सहगमनाची फलश्रुती । येणें परी निरुपिली ॥३२॥

श्रीगुरु आले मठासी । पुढें कथा वर्तली कैसी ।विस्तारुनि आम्हांसी । निरुपावें स्वामिया ॥३३॥

श्रीगुरु म्हणती दंपतीसी । ऐका पाराशरऋषि ।तया काश्मीररायासी । रुद्राक्षमहिमा निरुपिला ॥३४॥

पुढें कथा कैसी वर्तली । विस्तारुनि सांगा वहिली ।मति असे माझी वेधिली । श्रीगुरुचरित्र ऐकावया ॥३५॥

गाणगापुरीं असतां श्रीगुरु । महिमा झाला अपरंपारु ।सांगतां न ये विस्तारु । तावन्मात्र सांगतसे ॥३६॥

ऐसा श्रीगुरु दातारु । भक्तजनां कल्पतरु ।सांगतां झाला आचारु । कृपा करुनि विप्रांसी ॥३७॥

आत झालों मी तृषेचा । घोट भरवीं गा अमृताचा ।चरित्रभाग सांगें श्रीगुरुचा । माझें मन निववीं वेगीं ॥३८॥

सिद्ध म्हणे नामधारका । पुढें अपूर्व झालें ऐका ।साठ वर्षें वांझ देखा । पुत्रकन्या प्रसवली ॥३९॥

सिद्ध म्हणे नामधारका । अपूर्व वर्तलें आणिक ऐका ।वृक्ष झाला काष्ट सुका । विचित्र कथा परियेसा ॥४०॥

जयजयाजी सिद्धमुनी । तूं तारक या भवार्णवांतुनी ।नाना धर्म विस्तारुनि । श्रीगुरुचरित्र निरुपिलें ॥४१॥

मागें कथा निरुपिलें । सायंदेव शिष्य भले ।श्रीगुरुंनीं त्यासी निरुपिलें । कलत्रपुत्र आणि म्हणती ॥४२॥

श्रीगुरु म्हणती द्विजांसी । या अनंत व्रतासी ।सांगेन ऐका तुम्हांसी । पूर्वीं बहुतीं आराधिलें ॥४३॥

श्रीगुरु माझा मल्लिकार्जुन । पर्वत म्हणजे श्रीगुरुभवन ।आपण नये आतां येथून । सोडूनि चरण श्रीगुरुचे ॥४४॥

तूं भेटलासी मज तारक । दैन्य गेले सकळहि दुःख ।सर्वाभीष्ट लाधलें सुख । श्रीगुरुचरित्र ऐकतां ॥४५॥

गाणगापुरीं असतां श्रीगुरु । ख्याति झाली अपारु ।लोक येती थोरथोरु । भक्त बहुत झाले असती ॥४६॥

सांगेन ऐका कथा विचित्र । जेणें होय पतित पवित्र ।ऐसें हें श्रीगुरुचरित्र । तत्त्परतेसी परियेसा ॥४७॥

श्रीगुरु नित्य संगमासी । जात होते अनुष्ठानासी ।मार्गांत शूद्र परियेसी । शेतीं आपुल्या उभा असे ॥४८॥

त्रिमूर्तींचा अवतार । वेषधारी झाला नर ।राहिलें प्रीतीं गाणगापुर । कवण क्षेत्र म्हणूनियां ॥४९॥

तेणें मागितला वर । राज्यपद धुरंधर ।प्रसन्न झाला त्यासी गुरुवर । दिधला वर परियेसा ॥५०॥

राजभेटी घेउनी । श्रीपाद आले गाणगाभुवनीं ।योजना करिती आपुले मनीं । गौप्य रहावें म्हणूनियां ॥५१॥

म्हणे सरस्वती गंगाधर । श्रोतयां करी नमस्कार ।कथा ऐका मनोहर । सकळाभीष्ट साधेल ॥५२॥

॥ इति श्रीगुरुचरित्रकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादेद्विपंचाशत् श्लोकात्मकं गुरुचरित्रं संपूर्णम् ॥

॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥

॥ श्री गुरुदेव दत्त ॥

टॅग्स :Guru Purnimaगुरु पौर्णिमाPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३spiritualअध्यात्मिक