शहरं
Join us  
Trending Stories
1
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
2
‘लाडकी बहीण’ योजनेत पुन्हा गैरप्रकार समोर; ६ लाडक्या भावांचे अर्ज, ‘असा’ लागला शोध
3
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
4
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
5
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
6
इटलीच्या PM मेलोनी यांना डेट करताहेत इलॉन मस्क? चर्चांना उधाण, स्पष्टीकरण देत म्हणाले...  
7
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली
8
“ब्रिजभूषण सिंहचा एन्काउंटर का केला नाही, RSSच्या लोकांना वाचवायला अक्षय शिंदेला संपवले”
9
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
10
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात मोठी कारवाई! टीटीडीकडून 'या' डेअरीच्या विरोधात तक्रार दाखल
12
सत्ता आल्यावर कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला 
13
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
14
Video - "मी ऑनलाइन गेममध्ये १५ लाख गमावले, मला ५००-५०० रुपयांची मदत करा"
15
Swiggyचा आयपीओ येण्यापूर्वी राहुल द्रविड पासून करन जोहर पर्यंत दिग्गजांच्या उड्या, पाहा डिटेल्स
16
मुंडेंच्या परळीत पवारांची मोर्चेबांधणी: राजेभाऊ फड यांच्या हाती तुतारी; तिकीट मिळणार?
17
'मला आशा आहे, तुम्ही उत्तर द्याल'; अरविंद केजरीवाल यांचे मोहन भागवतांना पत्र
18
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
19
रोहित पवार बैठकीत मोबाईल, बाटल्या, चाव्या फेकून मारतात; राम शिंदेंचा खळबळजनक आरोप
20
लख लख चंदेरी... आलिया भटचा पॅरिस फॅशन वीक मध्ये 'जलवा'; पाहा अभिनेत्रीचे Photos

स्वामीपूजन, आरती झाल्यावर आवर्जून म्हणा ‘स्वामी समर्थ मंत्र पुष्पांजली’; होईल स्वामीकृपा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 7:53 AM

Swami Samarth Mantra Pushpanjali: अनेक ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांचे मंत्रपुष्प म्हटले जाते, असे सांगितले जाते.

Swami Samarth Mantra Pushpanjali: एखादी विशेष पूजा किंवा व्रताचे उद्यापन असेल किंवा व्रताची सांगता असेल, तेव्हा घरात शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजन, आरती केली जाते. त्यानंतर मंत्रपुष्प किंवा मंत्रपुष्पांजली म्हटली जाते. गणेशोत्सवात तर बाप्पाचे आगमन झाल्यापासून ते बाप्पााला निरोप देईपर्यंत दररोज दोनवेळा आरती केली जाते. मंत्रपुष्प म्हटले जाते. नवरात्र आणि अन्य उत्सवांवेळीही असेच चित्र पाहायला मिळते. 

स्वामी समर्थ महाराज हे कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान आहेत. स्वामींचे दररोज न चुकता पूजन, नामस्मरण हजारो घरांमध्ये होत असते. स्वामींची कृपा लाभावी, यासाठी विविध स्तोत्रे, श्लोक, मंत्र, जप आदी केले जाते. यातच स्वामींचे पूजन, नैवेद्य, आरती झाल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांना मंत्रपुष्पांजली अर्पण करावी. आपण जे परंपरेने म्हणतो ते मंत्रपुष्प म्हटल्यावर किंवा ते म्हणायच्या आधी स्वामींच्या चरणी मंत्रपुष्पाची सेवा अर्पण करावी, असे सांगितले जाते. स्वामी समर्थ दत्तावतार मानले गेले असून, गुरुवार हा स्वामींच्या पूजनासाठी विशेष मानला जातो. अनेक ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांचे मंत्रपुष्प किंवा मंत्रपुष्पांजली म्हटली जाते, असे सांगितले जाते.

स्वामी समर्थ मंत्र पुष्पांजली

पूर्ण ब्रह्मा सनातना विभुवरा निर्गुण सर्वेश्वरा।ओंकाराकारा परात्परा गुरो आम्हा तुझा आसरा।मूलाधार जगतप्रभू तुझी लीला न जाणे कुणी।देवा विघ्न हरी आम्हावरि करी, आडो न माया गुणी॥१॥

आनंदकंद विमला ज्ञानस्वरुपा।साक्षी सदैव हृदयस्थ ही मायबापा।स्वामी समर्थ गुरु तू हरी सर्व तापा।दावि स्वरूप मज लावूनी ज्ञानदीपा॥२॥

धर्मग्लानि कराल काल कली हा शास्ता नुरे या मही।तत्वाचा लव मागमूस न दिसे धुंडूनि सत्वातहि।भक्ता न्याय प्रमत्त दंड करण्या येई विजयदत्त हाहोई लीन अनन्यभावे चरणी वंदी सदा दास हा॥३॥

विधीहरिहर हे एकरूपे मिळाले।परमगुरुस्वरूपे देखता नेत्र घाले।अनुपम तव प्रीती लीन होताती भक्तं।तव पद झणि देशी धन्य तू एक दत्त॥४॥

परमात्मा पुरूषोत्तमा गुणतिये नारायणा श्रीधरा।लीलाविग्रही सूत्रधार हृदयी राहुनिया आचरा।ज्ञाते भाव सरो सदैव विसरो हा जीव तो दुसरा।अर्पितसे सुमनांजली तव पदा प्रेमे जगतगुरुवरा॥५॥

ब्रह्मा इंद्र सुरासुर प्रतिदिनी प्रार्थित तुझिया पदा।ओंकारस्वरूपा तू वेद जननी दुरवी न आम्हा कदा।भावे ज्या भजता भिउनि पळती दैन्यादि सर्वापदा।गायत्री सुमने नमू करी कृपा आम्हावरी सर्वदा॥६॥

॥श्री स्वामी समर्थ॥ 

टॅग्स :Puja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३spiritualअध्यात्मिक