शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
2
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
3
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
5
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
6
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
7
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
8
IPL 2025 : राहुल द्रविडच्या टीममध्ये त्याच्या मित्राची एन्ट्री; राजस्थानच्या फ्रँचायझीचा मोठा निर्णय
9
'जोरात शॉट्स मारुन काचा फोडायचा अन्..';अशोक सराफ 'या' दिग्गजासोबत खेळायचे गल्ली क्रिकेट
10
राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्या पक्षामधून राजकारणात उतरणार? दिलं असं उत्तर  
11
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
12
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
13
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
14
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
15
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
16
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
17
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
18
Pitru Paksha 2024: पितृपक्षात 'या' पाच ठिकाणी ठेवा दिवा; पितृकृपेबरोबरच होईल लक्ष्मीकृपा!
19
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
20
चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"

Numerology: तुमची जन्मतारीख ‘या’ ३ पैकी आहे? शनी कृपेने शुभ-लाभ, अमाप यश; मिळेल पद-पैसा, मान-सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 8:08 AM

Numerology: या मूलांकाच्या व्यक्ती बुद्धिमान असतात. मेहनतीच्या बळावर मान-सन्मान आणि भरपूर पैसा कमावतात, असे सांगितले जाते. जाणून घ्या...

Numerology: आपल्याकडे ज्योतिषशास्त्राला अनन्य साधारण महत्त्व आहे. भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये अनेकविध शास्त्रांचा समावेश असून, त्यात ज्योतिषशास्त्राचे स्थान विशेष आहे. नक्षत्र, ग्रह-तारे यांचे चलन, परिभ्रमण यांच्या अभ्यासातून मानवी जीवनावरील प्रभाव पाहिला जातो. ज्योतिषशास्त्र हे असे शास्त्र आहे, ज्याच्या अनेकविध शाखा आहेत. या शाखांच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीविषयी अंदाज बांधता येतात. केवळ जन्मकुंडली नाही, तर हस्तरेषा, स्वप्नशास्त्र, अंकशास्त्र, समुद्रशास्त्र यातूनही भविष्यकथन करता येते. यापैकी एक शास्त्र म्हणजे अंकशास्त्र अंकशास्त्रात जन्मतारखेवर आधारित मूलांकावरून व्यक्तीचा स्वभाव, वैशिष्ट्य, भविष्यकथन केले जाते. जसा प्रत्येक राशीचा स्वामी असतो, तसेच प्रत्येक मूलांकालाही ग्रहांचे स्वामित्व बहाल केलेले आहे. 

जानेवारी २०२३ मध्ये नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी ग्रह आपलेच स्वामित्व असलेल्या मकर राशीतून स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत प्रवेश करत आहे. या राशीत शनी दीर्घ काळापर्यंत विराजमान असेल. मूलांक ८ चा स्वामी शनी देव आहे. एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्या व्यक्तीचा मूलांक काढला जातो. ज्या लोकांचा जन्म ८, १७ आणि २६ तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक ८ आहे. विशेष म्हणजे जानेवारी महिन्याच्या १७ तारखेला शनीने राशीपरिवर्तन केले आहे. हा योग विशेष मानला जात आहे. 

जीवनात यशस्वी होऊनही लोक साधे जीवन जगतात मूलांक ८ असलेल्या व्यक्तींचा स्वभाव गूढ असतो. ते सहसा खूप शांत स्वभावाचे असतात. त्यांच्या मनात काय आहे, याचा थांग लागणे खूपच कठीण मानले जाते. तसेच हे लोक नशीबापेक्षा कर्मावर जास्त विश्वास ठेवतात. त्यामुळे त्यांना प्रत्येक कामात सहज यश मिळते. मात्र जीवनात यशस्वी होऊनही हे लोक साधे जीवन जगतात.

गुंतवणुकीच्या माध्यमातून चांगला नफा कमावू शकतात

मूलांक ८ असलेल्या व्यक्तींना भरपूर पैसा मिळू शकतो. त्यांची आर्थिक स्थिती सामान्यतः स्थिर असते. खर्च करण्याकडे त्यांचा अधिक कल नसतो. ते बचत योजना आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून चांगला नफा कमावू शकतात. मूलांक ८ च्या व्यक्ती बहुतेक अभियंते किंवा इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित काम करतात. हे लोक चांगले उद्योगपती देखील होऊ शकतात. बिल्डिंग मटेरियल सप्लायर, लोखंड आणि तेलाशी संबंधित व्यवसाय त्यांना अधिक फायदा देतात.

मेहनती असतात आणि स्वतःच्या हिंमतीवर यश मिळवतात

मूलांक ८ असलेल्या व्यक्ती मेहनती असतात आणि स्वतःच्या हिंमतीवर यश मिळवतात. त्यांना समाजात खूप मान-सन्मान मिळतो. ते नेहमी इतरांना मदत करतात आणि सत्याचे समर्थन करतात. कोणतेही काम पूर्ण केल्यानंतरच ते श्वास घेतात. याचा अर्थ ते त्यांच्या ध्येयाबाबत खूप गंभीर असतात. हे लोक पोलिस किंवा लष्करासारख्या सेवेतही काम करतात. यासोबतच हे लोक संशोधनाच्या क्षेत्रातही चांगले नाव कमावतात. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :numerologyसंख्याशास्त्रAstrologyफलज्योतिष