व्यक्ती तितक्या प्रकृती किंवा प्रवृत्ती असे म्हणतात. काही जण आपल्या बोलण्यामुळे समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पाडतात, तर काही जण आपल्या कृतीमुळे. प्रत्येकाची व्यक्त होण्याची पद्धत वेगवेगळी असते. मात्र, काही व्यक्ती अशाही असतात, ज्या गोड बोलण्यात, गोड बोलून समोरच्याकडून काम करून घेण्यात किंवा काम काढून घेण्यात अतिशय माहीर असतात.
ज्योतिषशास्त्रात एखाद्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीचा अभ्यास करून त्याचा स्वभाव, भविष्यातील घटना, भूतकालीन काही गोष्टी यांचा अंदाज बांधता येऊ शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार, काही राशीच्या व्यक्तींची वाणी अतिशय मधाळ असते. यामुळे समोरच्या व्यक्ती आकर्षित होऊ शकतात. कोणत्या राशीच्या व्यक्ती गोडबोले असतात, काम काढून घेण्यात असतात माहीर, जाणून घेऊया...
कर्क - गोड, मधाळ बोलून आपले काम कसे काढून घ्यावे, हे कर्क राशीच्या व्यक्तींकडून शिकावे, असे सांगितले जाते. या राशीच्या व्यक्ती शक्यतो कुणाशी वाद घालत नाहीत. तसेच एखाद्याला एखाद्या गोष्टीसाठी शक्यतो नाही म्हणत नाहीत, असे म्हटले जाते. मात्र, जे मनाला पटेल, तेच या व्यक्ती करतात. या राशीच्या व्यक्तींचा जनसंपर्क खूप मोठा असतो, असेही सांगितले जाते.
कन्या - दिखाऊपणा करायला कन्या राशीच्या व्यक्ती पटाईत असतात, असे सांगितले जाते. या व्यक्ती एखाद्या व्यक्तीशी बोलताना अशा पद्धतीने चर्चा करतात की, यांच्या इतका शुभचिंतक त्या व्यक्तीचा दुसरा कोणी असू शकत नाही. या राशीच्या व्यक्तींच्या मनात नेमके काय सुरू आहे, हे कुणीच ओळखू शकत नाही, असे म्हटले जाते. समाजात या राशीच्या व्यक्तींना खूप चांगला मान, सन्मान असतो. प्रतिष्ठा लाभते, असे सांगितले जाते.
वृश्चिक - वृश्चिक राशीच्या व्यक्ती गोड बोलण्यात दुसऱ्या क्रमांकावर असतात, असे म्हटले जाते. या राशीच्या व्यक्ती अनेकदा प्रामाणिक असल्याचा आव आणतात, देखावा करतात, असे सांगितले जाते. मात्र, या राशीच्या मनात नक्की काय चालू आहे, हे सहजासहजी ओळखता येत नाही. एखादी गोष्ट या व्यक्ती कधी सरळपणे सांगत नाही. त्या अशा पद्धतीने सांगतात की, समोरची व्यक्ती आपोआप घोळात येऊ शकते, असे म्हटले जाते. एखाद्या व्यक्तीची तोंडावर स्तुती करणे आणि मागून नावं ठेवणे, असा स्वभाव या व्यक्तींमध्ये दिसतो, असे सांगितले जाते.
मीन - राशीचक्रात शेवटच्या क्रमांकावर असलेली मीन रास गोड बोलणे आणि कामे काढून घेण्यात वरच्या क्रमांकावर पोहोचते, असे सांगितले जाते. समोरच्या व्यक्तीकडून काम आपले काम काढून घेण्यात किंवा काम करून घेण्यास या राशीच्या व्यक्ती पटाईत असतात, असे म्हटले जाते. मात्र, या व्यक्तींच्या मनात काय सुरू आहे किंवा त्यांच्या भावना काय आहेत, हे पटकन समजू शकत नाही. आभासी जगात किंवा खयाली दुनियेत त्यांना जगायला आवडते, असे सांगितले जाते.