तुम्ही पाहिलं असेल अनेक लोकं त्यांच्या दुकानांवर, वाहनांवर आणि घराच्या गेटवर लिंबू मिरची लटकवतात. काहीजण याला अंधविश्वास मानतात तर काही परंपरेनुसार प्रगतीसाठी आणि येणाऱ्या त्रासातून वाचवण्यासाठी लिंबू मिरची बांधतात असं म्हटलं जातं. अनेकजण दुकानाबाहेर आणि घराबाहेर लिंबू मिरची बांधतात कारण त्यामुळे वाईट शक्ती तुमच्यापासून दूर राहतात असा विश्वास आणि श्रद्धा लोकांच्या मनात आहे.
अनेकांच्या मते, लिंबू मिरची लटकवल्यानं वाईट नजरेपासून रक्षण होतं. लिंबूचा आंबटपणा आणि मिरचीचा तिखटपणा वाईट नजरेचा प्रभाव कमी करतो. पण याचं वैज्ञानिक कारण तुम्हाला माहीत आहे का? तर हे जाणून घेऊया. दारावर लिंबू मिरची लटकवण्यामागेही शास्त्र आहे. वास्तविक, मिरची, लिंबू यांसारख्या वस्तू पाहिल्यावर त्याची चव आपल्याला मनाला जाणवू लागते, त्यामुळे आपण ती फार काळ बघू शकत नाही आणि लगेच आपले लक्ष तिथून हटवतो.
आरोग्याचंही होतं रक्षण
याशिवाय आरोग्याच्या दृष्टीकोनातून लिंबू आणि मिरची दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर लिंबू खूप आंबट आणि मिरची खूप तिखट असते त्यामुळे जेव्हा ती दुकानाबाहेर किंवा घराबाहेर प्रवेशद्वारात बांधली जाते तेव्हा त्याचा मजबूत वासामुळे मच्छर, माशा, किडे घरात प्रवेश करू शकत नाही. त्यामुळे वातावरण शुद्ध होते आणि आपल्या आरोग्याचेही रक्षण होते.
वास्तुशास्त्रातील महत्त्व
लिंबू मिरचीमध्ये कीटकनाशक गुणधर्म असतात. ज्यामुळे वातावरण शुद्ध राहते. जिथे लिंबूचे झाड असते तिथे त्याच्या आजूबाजूची ठिकाणे अगदी शुद्ध राहतात, वास्तुशास्त्रानुसार ज्या घराजवळ लिंबूचे झाड असते ते घर पूर्णपणे शुद्ध मानले जाते, लिंबूच्या आत नकारात्मक ऊर्जा नष्ट करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता असते.
दर शनिवारी लिंबू-मिरची बदलतात
बहुतांश लोकं त्यांच्या घरावर, वाहनांवर आणि दुकानाबाहेर लिंबू मिरची बांधतात. काही जण दर शनिवारी दाराबाहेर लटकवलेली लिंबू मिरची काढून नवीन लावतात. असंही म्हटलं जातं लिंबू, मिरची रस्त्यात कुठेही पडली असेल तर त्यावर पाय ठेवू नका. लिंबू मिरची नकारात्मक ऊर्जा आणि वाईट नजरेपासून लोकांचा बचाव करत असते. त्यामुळे लिंबू मिरची घराबाहेर लटकवली जाते.