मेष : या महिन्याची सुरुवात उत्साहाने होईल. महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. आरोग्याच्या काहीही तक्रारी नसतील. कौटुंबिक वातावरण चांगले राहिल. व्यापाऱ्यांना फायदा होईल. मित्रपरिवारात तुमचे वर्चस्व राहील आणि शत्रूंवर तुमचा दबाव कायम राहील.
वृषभ : मुलांवर खर्च होतील. विद्यार्थ्यांसाठी हा महिना अनुकूल आहे. त्यांनी अभ्यासात चांगले लक्ष दिले पाहिजे. भविष्यात त्याचे फायदे होतील. व्यापार, उद्योग किंवा अन्य कामासंबंधी कोणाशी तणाव निर्माण झाले असतील, तर नातेसंबंधात मैत्रीपूर्ण संबंध निर्माण होतील. तीर्थक्षेत्र किंवा प्रवासाच्या दृष्टीने चांगली स्थिती आहे.
मिथुन : एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतलेला असल्यास आणि प्रयत्नपूर्वक ते मिळवण्याचा प्रयत्न केल्यास निश्चित यशप्राप्ती मिळवून देणारा हा महिना आहे. सुरुवातीला काही अडचणी येतील, परंतु त्यावर तुम्ही सहज मात करू शकाल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. घरात शुभ कार्य संभवते. जोडीदाराचे सहकार्य लाभेल.
कर्क : सरकारी कामांना गती मिळेल. नोकदार वर्गाला पदोन्नती मिळू शकेल. राजकारणाशी संबंधित व्यक्ती समाजात आपल्या कर्तृत्वाची छाप पाडू शकतील. आरोग्य चांगले राहिल. कौटुंबिक व आर्थिक स्थिती अनुकूल असेल. हा महिना प्रसन्न जाईल.
सिंह : या महिन्यात आवक कमी असल्याने खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्य चांगले राहील. परंतु पैशांची चणचण भासल्याने मानसिक अस्वस्थता राहील. जुनी येणी परत येऊ शकतील. नोकरीच्या ठिकाणी आपल्या कामाबाबतीत सजग राहा तसेच कौटुंबिक वादविवादापासून दूर राहा. हा महिना थोडा प्रतिकूल परिस्थिती दर्शवतो.
कन्या : ग्रहस्थिती चांगली असल्याने अनेक निलंबित कामे मार्गी लागतील. विद्याथ्र्यांसाठीदेखील हा महिना अनुकूल आहे. भावंडांचे सहकार्य मिळेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील.
तूळ : या महिन्यात वाहनखरेदी लाभदायक ठरेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. मानसिक सुख शांती मिळेल. जोडीदाराबरोबर अविस्मरणीय वेळ घालवाल. आर्थिक व्यवहारासंबंधी प्रश्न दूर होतील.
वृश्चिक : व्यवसायात, व्यापारात यश मिळेल. आर्थिक लाभ होतील. कामात मन रमेल. शुभवार्ता कळतील. मातृसौख्य लाभेल. विद्यार्थी अभ्यासात मेहनत घेतील.
धनु : विद्यार्थ्यांसाठी हा महिना उत्तम आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असल्यास यश मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. शत्रूंपासून सावधान राहा. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. व्यवसाय, व्यापारात प्रगती होईल.
मकर : कुटुंबाचे सहकार्य मिळाल्यामुळे वैयक्तिक आयुष्यात प्रगती होईल. वास्तू व जमीन खरेदीसाठी हा काळ उत्तम आहे. मातृसौख्य लाभेल़ व्यापार, व्यवसाय, नोकरी यात चांगले योगदान दिल्यास भविष्यात त्याची चांगली फळे मिळतील.
कुंभ: ग्रहस्थिती चांगली असल्याने, अनेक क्षेत्रात पराक्रमाच्या संधी मिळतील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. भावंडांचे सहकार्य मिळेल. आरोग्य चांगले राहील. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. शत्रू वर्ग प्रभावहीन ठरेल.
मीन : या महिन्यात आर्थिक अडचणी दूर होतील. मुलांवर खर्च होतील. व्यापार व्यवसायात प्रगती होईल. नोकरदारांना चांगल्या संधी मिळतील. आरोग्य चांगले राहील. प्रापंचिक सौख्य मिळेल.