शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

ज्ञान हाच देव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 11:56 IST

जगामध्ये "सुख कणभर आहे तर दुःख मणभर", याचे प्रमुख कारण लोकांनी पैशाला वाजवीपेक्षा जास्त महत्त्व देऊन ज्ञानाकडे पाठ फिरवली हे होय.

मानवी जीवनात ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे. ज्ञानाइतके पवित्र, मंगल व उपयुक्त अन्य कांहीही नाही. हे ज्ञान संपादन करण्यासाठी आपण जे प्रयत्न करतो त्याला शिक्षण असे म्हणतात. आईच्या कुशीतून शिक्षणाला जी सुरुवात होते ती  थेट सरणावर संपेपर्यंत, याचाच अर्थ असा की, जन्मापासून मरेपर्यंत शिकत राहिले पाहिजे. म्हणूनच जीवनविद्या सांगते - 'शिक्- क्षण', "क्षणाक्षणाला शिकणे म्हणजे शिक्षण" ज्ञान नसेल किंवा शिक्षण नसेल तर माणूस म्हणजे दोन पायांचा पशू होय. माणसातील दोन पायांच्या पशुंची संख्या दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणात वाढत आहे. पैसा हाच परमेश्वर झाल्यामुळे माणसे या पैशाच्या पाठीमागे पिसाटासारखी धावत आहेत व ज्या ज्ञानातून शहाणपण निर्माण होते त्या ज्ञानाकडे पाठ फिरवून आहेत. जगामध्ये "सुख कणभर आहे तर दुःख मणभर", याचे प्रमुख कारण लोकांनी पैशाला वाजवीपेक्षा जास्त महत्त्व देऊन ज्ञानाकडे पाठ फिरवली हे होय. थोडक्यात, जीवनात ज्ञानाला पर्याय नाही आणि म्हणूनच जीवन विद्या सांगते-

ज्ञान हे शस्त्र, अस्त्र व शास्त्र आहे,ज्ञान हे शक्ती, बल व सामर्थ्य आहे,ज्ञान हे धन, संपत्ती व ऐश्वर्य आहे,ज्ञान हा देव, ईश्वर व परमेश्वर आहे,म्हणून ज्ञानी व्हा व धन्य व्हा.

ज्ञान देतात त्यांना आपण शिक्षक किंवा गुरु म्हणतो. "देतो तो देव" असा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. देवाला आपण देव म्हणतो याचे मुख्य कारण देवाने म्हणा किंवा निसर्गाने म्हणा आपल्याला अत्यंत मौल्यवान असे मानवी शरीर दिलेले आहे. इतकेच नव्हे तर पाच कर्मेंद्रिय, पाच ज्ञानेंद्रिय, पाच पंचप्राण, मन, चित्त, बुद्धी अशी अंतरेंद्रिये, स्मरणशक्ती, इच्छाशक्ती अशा प्रकारच्या सूक्ष्म व अत्यंत उपयुक्त अशा महान देणग्या दिलेल्या आहेत.

त्याचप्रमाणे जीवनात आपल्याला आनंदाची रासक्रीडा करण्यासाठी विश्व निर्माण केलेले आहे. थोडक्यात, देवाने आपल्यावर कृपेची बरसात केलेली आहे. म्हणून अशा देवाशी सदैव कृतज्ञ राहिले पाहिजे. 

त्याचप्रमाणे माता आणि पिता आपल्याला खूप काही देत असतात ते आपल्याला जन्म देतात, अनेक प्रकारच्या हाल अपेष्टा सोसून व खस्ता खाऊन ते आपले लालन पालन, संगोपन, संवर्धन करतात व शिक्षण देऊन आपल्याला आपल्या पायावर उभे करतात. आई -बापाचे आपल्यावर अनंत उपकार असतात म्हणून त्यांना देव मानणे आवश्यक आहे. 

त्याचप्रमाणे शिक्षक -प्राध्यापक आपल्याला ज्ञान देतात. जगात ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे व ज्ञानदानासारखे मोठे पुण्य नाही. खरंतर ज्ञानरुपी अक्षाभोवती सर्व  ब्रम्हांड फिरते. ते ज्ञान जो स्वत: आत्मसात करतो व इतरांना शिकवितो तो शिक्षक. 

तुकाराम महाराज म्हणतात.ज्ञान तोचि नारायण।सदगुरू श्री वामनराव पै सांगतात,ज्ञान हाच देव.

जगात सर्वत्र परमेश्वर ज्ञानरुपाने प्रगट आहे. हे ज्ञान मिळवितो तो ज्ञानी. विश्वाचे ज्ञान म्हणजेच विज्ञान व हे ज्ञान संपादन करून व संशोधन करून जो शास्त्र मांडतो तो शास्त्रज्ञ. 

उदा. अवकाशाचे ज्ञान संपादन करून संशोधन करतो तो खगोलशास्त्रज्ञ. वनस्पतींचे ज्ञान संपादन करून संशोधन करतो तो वनस्पतीशास्त्रज्ञ, प्राण्यांच्या बाबतीत प्राणीशास्त्रज्ञ इ.मानवी शरीर हे सुध्दा ज्ञानघन आहे. त्याचा अभ्यास करुनच आरोग्यशास्त्र उदयाला आहे व मनाच्या अभ्यासातून मानसशास्त्र उदयाला आले.

शास्त्रज्ञ संशोधन करून शास्त्र निर्माण करतात व ते शास्त्र स्वत: शिकून आत्मसात करतात व इतरांना शिकवितात ते शिक्षक किंवा प्राध्यापक. ते ज्ञान देतात म्हणूनच पुढिल पिढ्यांपिढ्याना ते ज्ञान संक्रमित होते. विज्ञानाने जग विकसित होते व जगाला सुखसोयी व सुविधा प्राप्त होऊन मानवजातीचे जीवन जगणे सुसह्य होत आहे.

सदगुरु श्री वामनराव पै सांगतात की, जगातील प्रत्येक गोष्ट, वृक्ष, पक्षी, प्राणी, व्यक्ती ही आपला गुरु किंवा शिक्षक असते कारण ती आपल्याला काहीना काही शिकवितच असते. फक्त ते पहाण्याची व शिकण्याची दृष्टी आपल्याकडे हवी असते. उदा.- अगदी दारु पिणारा माणूस सुध्दा आपला गुरु असतो, कारण तो आपल्याला शिकवितो की, या दारुच्या व्यसनापायी माझ्या जीवनाची जी वाताहात झाली, ती तूला जर तुझ्या आयुष्यात करुन घ्यायची नसेल तर दारु पासून दूर रहा.

जन्माला आल्यापासून आई, बाबा, घरातली सर्व वडीलधारी मंडळी, मित्र मैत्रिणी, शाळा, कॉलेज मधील शिक्षक, नोकरी किंवा व्यवसायात आपले सहकारी, अधिकारी, कामगार, ग्राहक, स्पर्धक, संसारात आपली बायको अथवा नवरा, मुले, सासू सासरे इ. सर्व आपले शिक्षकच असतात.

आपल्या कौटुंबिक व व्यावसायिक क्षेत्राबरोबर कला, विद्या, क्रिडा, अभिनय, संगीत, साहित्य, वक्तृत्व, व्यायाम, सामाजिक व राजकीय कार्य इ. अनेक विविध क्षेत्रात यश संपादन करायचे असेल तर त्या त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तीला (गुरु) आपण शरण जाऊन तिच्याकडून ते विशेष ज्ञान संपादन करावे लागते.

विश्व ज्यातून प्रगट झाले आहे त्या प्रभूचे ज्ञान म्हणजे प्रज्ञान. त्यालाच आत्मज्ञान असेही म्हणतात. हे आत्मज्ञान किंवा प्रज्ञान शिकविणारे शास्त्र म्हणजे अध्यात्मशास्त्र. हे शिकविणारे शिक्षक म्हणजे सदगुरु.

स्थूल स्वरूपाच्या विद्या व कला गुरूशिवाय आकळता येत नाहीत मग अध्यात्मविद्या सारखी सूक्ष्मविद्या सद्गुरूंशिवाय आत्मसात करता येणे शक्य आहे का? अध्यात्मविद्येचे स्वरूपच न समजल्यामुळे सर्व घोटाळा निर्माण झालेला आहे. अध्यात्मशास्त्र शिकायचे म्हणजे आपल्या जीवनातील फार मोठे गुह्य आकळणे होय. परंतु खेदाची गोष्ट अशी आहे की, या सत्याची जाणीव परमार्थात पडलेल्या बहुसंख्य लोकांना नसते. खरे सद्गुरू भेटतात तेव्हाच या सत्याची जाणीव होते व ते सद्गुरूच जीवनातील मोठे गुह्य समजावून देऊन महान गुह्याची उकल कशी करून घ्यायची त्याचा स्पष्ट मार्ग दाखवितात. म्हणूनच ज्ञानेश्वर माऊली सांगतात...गुरु तेथे ज्ञान। ज्ञानी आत्मदर्शन॥

सहज असणारा देव सहज कसा प्राप्त करून घ्यावयाचा हे सहज शिकवितात ते सदगुरु.

सदगुरु वाचोनी सापडेना सोय।धरावेते पाय आधी आधी॥

"देतो तो देव" म्हणून शिक्षक-प्राध्यापक व सदगुरूंना देव मानणे उचित ठरते. या सर्वांकडून जे ज्ञानार्जन करतात ते विद्यार्थी होत. म्हणूनच जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपण सर्वजण विद्यार्थीच असतो.

या संदर्भात विद्यार्थ्यांनी जीवनविद्येचा खालील सिद्धांत नित्य लक्षात ठेवला पाहिजे.

"कृतज्ञता हे पुण्य व कृतघ्नता हे पाप" 

त्याचप्रमाणे डॉ. मर्फी सांगतात.-A grateful heart it is always clothes to the creative forces of the inverse causing countless blessing to flow towards it, by the law of reciprocal relationship based on the cosmic law of action and reaction. 

या संदर्भात एका इंग्लिश लेखकांच्या वचन अत्यंत चिंतनीय आहे."Think of all you have to be grateful for and thank God for all your boons and bounties."

जन्म व मृत्यू यामधील प्रवास म्हणजे जीवन. हा प्रवास जर आनंदमय, सुखमय, यशस्वी व समृध्द करायचा असेल तर आपल्याला योग्य रस्ता दाखविणारा व त्या मार्गावर चालण्यास शिकविणारा योग्य मार्गदर्शक, शिक्षक अर्थात सदगुरु मिळणे महत्त्वाचे असते.

आपले जीवन खर्‍या अर्थाने समृद्ध करणार्‍या या सर्व शिक्षकांच्या चरणाशी मनापासून नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच शिक्षकदिन.

फक्त शिक्षकदिनीच नव्हे तर क्षणोक्षणी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, हा यशस्वी व समृध्द जीवनाबरोबरच शांती सुखाचा राजमार्ग आहे.

-संतोष तोत्रेजीवनविद्या मिशन

 

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyan Sumanअध्ययन सुमन