शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
3
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
4
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
5
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
6
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
7
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
8
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
9
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
10
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
11
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
12
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
13
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार
14
IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी
15
हरियाणात भाजपाची मतं वाढणार, पण जागा घटणार; असा आहे एक्झिट पोलमधील नंबर गेम
16
IND vs BAN 1st T20: "संजू सॅमसन सलामीला खेळेल, दुसरा ओपनर म्हणून..."; सूर्यकुमार यादवने दिली मोठी माहिती
17
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
18
हार्दिकला विसरून नताशाने शोधला नवा जोडीदार? स्वीमिंग पूलमध्ये केली मौजमजा 
19
'आप' मंत्र्याने विरोधी पक्षनेत्यांचे धरले पाय, दिल्लीत राजकीय नाट्य, फोटो व्हायरल
20
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!

Kojagiri Purnima 2023: कोजागिरीला चंद्राला दुधाचा नैवेद्य का दाखवतात, त्यामागील धार्मिक आणि शास्त्रीय कारण वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 12:47 PM

Kojagiri Purnima 2023: यंदा २८ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा आहे, त्यादिवशी चंद्राला दुधाचा नैवेद्य दाखवतात हे माहितीय, पण का ते जाणून घ्या!

कोजागरी पौर्णिमेला चंद्राला दुध-साखरेचा नैवेद्य दाखवतात. त्यात चंद्राची किरणे पडली की ते दूध नैवेद्य म्हणून सर्वांना देतात. हे दूध मुख्यत्त्वे चांदीच्या वाटीतून देतात. यामागे कोणती कारणे आहेत ते जाणून घेऊ.  >> ज्योतिषांच्या मते, संपूर्ण वर्षात फक्त या दिवशी चंद्र सोळा कलांनी फुललेला असतो. त्यावेळेस त्याच्यातून निघणारी किरणे अमृतासमान असतात. ती किरणे दुधात मिसळल्यामुळे दुधाची पौष्टिकता अधिक वाढते. म्हणून कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात दूध किंवा खीर ठेवतात.

>> असे मानले जाते की हे दूध किंवा खीर सेवन केल्याने कुंडलीतील चन्द्रदोष दूर होतात. म्हणून चंद्रकिरण मिश्रित दुधाचे या रात्री सेवन केले जाते. 

>> सूर्यकिरणांप्रमाणे चंद्राची किरणेही शरीरास उपयुक्त असतात. म्हणून कोजागरीला नैवेद्य म्हणून ठेवलेले दूध प्राशन केल्याने रोग प्रतिकार शक्ती वाढते व सुदृढ आरोग्य लाभते. 

>> शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. या रात्री चंद्राच्या किरणांमध्ये औषधी गुणांचे प्रमाण सर्वाधिक असते. यासाठी शुभ्र किरणे शोषून घेण्याची क्षमता शुभ्र दुधात असल्यामुळे चंद्राला दुधाचा नैवेद्य दाखवतात. 

>> चंद्र, चांदणे, दूध, पोहे, साखर सर्वच पांढरे आहेत म्हणून कोजागरी पौर्णिमा हा धवलरंगी उत्सव म्हणून गणला जातो.

>> चन्द्रप्रकाश मानवी देशासाठी उपयुक्त असतो. विशेषतः तापट लोकांनी चन्द्र प्रकाशात सफर केली असता त्यांना आल्हाददायी वाटते आणि मन शांत होते. अशा शांत वेळी गरम दूध तना मनाला उभारी देते. 

>> काही जण दुधाऐवजी तांदुळाची खीरसुद्धा नैवेद्य म्हणून ठेवतात. ती देखील पौष्टिक असल्याने उत्सवाची लज्जत वाढवणारी ठरते. 

>> चांदी हा धातू शरीरासाठी फायदेशीर असतो. तसेच चन्द्र किरणे शोषून घेण्याची क्षमता त्यात अधिक असल्याने दूध किंवा खिरीचा नैवेद्य चांदीच्या वाटीतून दाखवला जातो. 

>> असे मानले जाते की शरद पौर्णिमेच्या रात्री आकाशातून अमृताचा वर्षाव होतो. चंद्रदेव त्याच्या अमृत किरणांनी पृथ्वीवर त्याच्या शीतलता आणि पोषण शक्तीचा अमृत वर्षाव करतात. तो आनंद लुटण्यासाठी मोकळ्या आकाशाखाली किंवा गच्चीत जमून एकत्रपणे हा उत्सव साजरा करायचा असतो. 

चंद्राला दाखवलेल्या दुधाच्या किंवा खिरीच्या नैवेद्याला नैवेद्यत्व प्राप्त झाल्याने त्याची लज्जत कैक पटींनी वाढते आणि त्याची गोडी उत्सवाचा आनंद द्विगुणित करते. म्हणून तुम्ही सुद्धा ही अनुभूती अवश्य घ्या आणि कुटुंब व मित्रपरिवारासमवेत कोजागरी साजरी करा!

टॅग्स :kojagariकोजागिरी