शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख!
2
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
3
"मी ठासून सांगतोय माघार घेणार नाही"; वर्षा बंगल्यावरील भेटीनंतर सरवणकरांची स्पष्ट भूमिका
4
Maharashtra Election 2024: महाविकास आघाडीचा गेम बिघडवणार?; ११ बंडखोर कोण आहेत?
5
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
6
तरुणीचा व्हिडीओ कॉल उचलला आणि हनिट्रॅपमध्ये अडकले मंत्री, त्यानंतर घडलं असं काही...
7
Video - "RC, ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही, पकडलं तर फक्त भाजपाची डायरी दाखवा, पोलीस..."
8
Gautam Adani News : अदानींनी नेमकं केलंय तरी काय? 'या' कंपनीच्या मागे का लागल्यात PNB, ICICI सारख्या बँका?
9
'सुंदर' चेंडू अन् 'कॉपी पेस्ट फॉर्म्युला'! टॉम लॅथमसह रचिन झाला क्लीन बोल्ड (VIDEO)
10
कार्तिक आर्यन-विद्या बालनचा 'भूल भूलैय्या ३' कसा आहे? पहिला Review आला समोर
11
ई-स्कूटर घ्या; पण तक्रारींचे काय? कंपन्यांविराेधात १२ हजार तक्रारी, केंद्र सरकार करणार चाैकशी
12
IND vs NZ : भारताची आपल्या घरात 'कसोटी' तरी बुमराहला का विश्रांती? BCCI ने सांगितलं महत्त्वाचं कारण
13
गुरु-शुक्राचा राजयोग: ९ राशींना सुखकर, दिवाळीनंतरही लाभ; उत्पन्न वाढ, नवीन नोकरीची संधी!
14
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
15
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
16
भेटायला आले, नमस्कार केला अन् गोळ्या झाडल्या; दिवाळी साजरी करणाऱ्या काका-पुतण्याची हत्या
17
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
18
अर्जुन कपूरने ब्रेकअप झाल्याचं सांगताच मलायकाची पोस्ट, म्हणते - "एका क्षणासाठी..."
19
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
20
HDFC Bankची उपकंपनी HDB फायनान्शिअल सर्व्हिसेस आणणार IPO; 'इतके' हजार कोटी उभे करणार

Laxmi Pujan 2024: लक्ष्मीपूजेत केरसुणीची पूजा केल्यावर लक्षात ठेवा 'हे' नियम; अन्यथा पूजा जाईल व्यर्थ!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2024 9:41 AM

Laxmi Pujan 2024: लक्ष्मी पूजेत घराची स्वच्छता करणाऱ्या केरसुणीलाही मान असतो, पण पूजा झाल्यानंतर त्यासंबंधित नियमांचे पालन करणेही तेवढेच बंधनकारक आहे. 

आज १ नोव्हेंबर, शुक्रवार आणि दिवाळीतला मुख्य दिवस अर्थात लक्ष्मी पूजेचा (Laxmi pujan 2024) दिवस! आजच्या दिवशी लक्ष्मी पूजेत आपण केरसुणी आणि मिठाचीही पूजा करतो. मिठाचा वापर आपण सांभाळून करतोच, पण केरसुणी मात्र काम झाल्यावर घराच्या कोपऱ्यात उभी-आडवी कशीही ठेवून देतो. अशाने लक्ष्मी पूजेच्या वेळी केलेली पूजा व्यर्थ जाईल आणि लक्ष्मी कृपा होणार नाही. म्हणून निर्जीव असली तरी केरसुणी योग्य प्रकार कशी हाताळावी यासंबंधीचे वास्तू नियम जाणून घ्या. 

प्रत्येक घरात झाडू ठेवलेला आढळतो. घराच्या स्वच्छतेसाठी झाडूचा वापर केला जातो. शिवाय त्याची लक्ष्मी म्हणूनही पूजा केली जाते. ते कशासाठी? ते समजून घेऊ. झाडूमुळे घरातली घाण बाहेर पडते व स्वच्छता, पावित्र्य आणि संपत्ती आपोआप येते. स्वच्छता आणि पावित्र्य यांमुळे घराचे दारिद्रय दूर होते आणि लक्ष्मीचा गृहप्रवेश होतो. आर्थिक अडचणी दूर होतात. त्यामुळे झाडूला लक्ष्मी मातेचे रूप मानले गेले आहे.

Laxmi Pujan Muhurta 2024: लक्ष्मीकुबेर पूजन कधी आणि कसं करावं? दाते पंचांगाने दिली सविस्तर माहिती!

झाडूच्या रचनेवरून एक महत्त्वपूर्ण संदेश मिळतो. तोच संदेश संत गाडगे बाबांनीसुद्धा दिला होता. मोळ नावाच्या गवतापासून किंवा शिंदीच्या झाडाच्या पानांपासून झाडू बनवला जातो. तो एकत्रपणे घट्ट बांधलेला असतो. नव्हे तर अनेक घरांमध्ये आजही विकतचा झाडू नव्हे तर झाडू विक्रेत्यांकडून झाडू बांधून घेतात. झाडूची घट्ट गाठ एकात्मतेचे महत्त्व दर्शवते. एकात्मता नसेल तर देश, समाज, प्रदेश, घर यातील घाण साफ होऊ शकणार नाही. 

वास्तू शास्त्रानुसार घराच्या सुख-समृद्धीमध्ये झाडूचा महत्त्वाचा सहभाग असतो. ज्या घरात झाडूची काळजी घेतली जाते त्या घरात सकारात्मकता दिसून येते. झाडूबाबत काही खास गोष्टी लक्षात ठेवाव्यात व त्यासाठी  झाडू खरेदीचे नियम जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

केरसुणी वापराचे वास्तु नियम (Vastu Shastra rule : how to use broom): 

>> जर तुम्हाला नवीन झाडू घ्यायचा असेल तर शनिवारीच खरेदी करा. शनिवारी घरात नवीन झाडू वापरणे खूप शुभ मानले जाते. म्हणजेच जुना झाडू बदलायचा असेल तर तो शनिवारीच बदलावा.

>> जेव्हाही तुम्ही नवीन घरात जाल तेव्हा नवीन झाडू घ्या. नवीन झाडूच्या वापराने नवीन वास्तूमध्ये सुख समृद्धी येईल. 

>>वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण-पश्चिम दिशेला झाडू ठेवणे सर्वात योग्य आहे, जर हे शक्य नसेल तर झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे बाहेरच्या लोकांची दृष्टी पडणार नाही. 

>> झाडू स्वयंपाकघर आणि धान्य साठवणुकीच्या खोलीत ठेवू नये, यामुळे आजारपण आणि गरिबी येते. शक्यतो अंगणात किंवा स्वयंपाक घराच्या बाल्कनीमध्ये ठेवा. 

>> एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की झाडू कधीही जाळू नये. जुना झाडू टाकायचा असल्यास तो केराच्या टोपलीत न टाकता पाला पाचोळ्यात किंवा एखाद्या आड वळणाच्या झाडापाशी टाकावा. 

>> शक्यतो सायंकाळी केर काढू नये कारण त्यावेळी घरात लक्ष्मी येत असते. काही कारणाने रात्री केर काढावा लागला तरी केर भरून टाकू नका, तो दुसऱ्या दिवशीच भरावा. 

>> घरात झाडू कधीही उभा ठेवू नका, झाडू नेहमी आडवा ठेवावा किंवा एखाद्या कोनाड्यात गवताची दिशा खाली राहील अशा बेताने ठेवावा. 

>> जर एखादी व्यक्ती तुमच्या घरातून बाहेर पडली तर किमान अर्ध्या तासानंतरच केर काढावा. 

>> झाडूवर पाय ठेवल्याने लक्ष्मीचा अनादर होतो, म्हणूनच झाडूला पाय लागताच नमस्कार करावा. 

>> रात्री झोपण्यापूर्वी झाडू मुख्य दरवाजाजवळ ठेवा आणि झोपा. यामुळे रात्रीच्या वेळी नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करू शकत नाही असेही म्हटले जाते. 

>> या सर्व कारणांमुळे आपण धनत्रयोदशीला नवीन झाडू खरेदी करतो आणि लक्ष्मी पूजेला त्याचे पूजन करतो. 

Laxmi Pujan 2024: लक्ष्मी पूजेच्या दिवशी का करतात केरसुणी आणि मीठाची पुजा? वाचा कारण!

टॅग्स :Diwaliदिवाळी 2024Vastu shastraवास्तुशास्त्र