इंग्रजी नवे वर्ष सुरू झाले. गत वर्षाने लोकांना संमिश्र अनुभव दिले. कोणाच्या वाट्याला सुख आले, तर कोणाच्या दुखं. हे चढ उतार आयुष्यात नेहमीचेच, परंतु हे पारडे समसमान असेल तर ठीक, अन्यथा दुःखाचे माप झुकले, तर आयुष्याची वाताहत होऊ लागते. सुखाची ओढ लागावी, तर सुख आणखीनच पुढे पुढे जाते. अशा रुसलेल्या सुखाच्या क्षणांना आपल्या घरचा पत्ता कसा सांगावा आणि त्यांना चिरंतन आपल्याकडे कसे थांबवून ठेवावे, याचे बहुमूल्य मार्गदर्शन करणार आहेत, ज्येष्ठ निरुपणकार प्रल्हाद वामनराव पै. रविवार दिनांक ३ जानेवारी २०२१ रोजी रात्री ८ वाजता लोकमत भक्ती या युट्युब चॅनेलवर अभिनेत्री गायत्री बनसोडे त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.
श्री. प्रल्हाद पै हे आपल्याला ज्येष्ठ निरुपणकार म्हणून परिचित आहेत. ते सद्गुरू श्री वामनराव पै यांचे चिरंजीव आहेत. जीवनविद्या तत्वज्ञानाचे ही सद्गुरू वामराव पै यांनी सुरु करून दिलेल्या संस्थेचे सर्वेसर्वा आहेत. वडिलांप्रमाणे प्रल्हाद पै यांनाही तत्वज्ञानाची आवड आहे. कारण तत्वज्ञान हे वैज्ञानिक, व्यावहारिक आणि प्रत्येक जीवनात प्रत्येक व्यक्तीसाठी उपयुक्त ठरते. जीवनविद्या तत्वज्ञान हे मानसशास्त्र, परजीवी विज्ञान आणि मेटाफिजिक्सचे उत्कृष्ट संयोजन आहे. त्यांनी अनेक वर्षांपासून समुपदेशन सत्रे घेतली आहेत आणि जीवनविद्या तत्वज्ञानाची तत्त्वे लागू करून सामान्य माणसाचे जीवन उन्नतीत आणण्यास मदत केली आहे.
या live चर्चासत्राच्या माध्यमातून आपणही पै यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊया आणि आगामी काळात सुखासाठी आपल्या घराचे आणि मनाचे कवाड खुले करूया. आपणही या live चर्चासत्राचा जरूर लाभ घ्या.