पुष्पा चित्रपटामुळे रक्तचंदनाची सर्वसामान्यांना कळली. चला तर जाणून घेऊया त्याचे इतरही फायदे! ज्योतिषशास्त्रामध्ये शारीरिक, मानसिक आणि आर्थिक जीवनाशी संबंधित समस्यांवर मात करण्यासाठी अनेक सोपे आणि प्रभावी उपाय सांगण्यात आले आहेत. यातील बहुतेक उपाय आपल्या जीवनशैलीशी संबंधित आहेत. सुख, समृद्धी आणि सौभाग्याशी संबंधित सर्व उपाय दैनंदिन पूजा आणि भोजनाद्वारे देखील केले जाऊ शकतात. त्यासाठी दोन मुख्य घटकांचा वापर सांगितला आहे. ते घटक म्हणजे चंदन आणि चांदी. त्यांचा डोळसपणे वापर कसा करावा ते वाचा.
>>दुर्गा मातेच्या कृपा प्राप्तीसाठी रक्तचंदनाच्या माळेने जप केला असता तिचा आशीर्वाद लवकर मिळतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. म्हणून शक्य झाल्यास रक्तचंदनाची जपमाळ घेऊन जप करावा अन्यथा रुद्राक्षाची माळही पर्यायी वापरता येते.
>> ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यासारखे तेज प्राप्त व्हावे म्हणून रक्त चंदनाचा टिळा लावावा. तसेच आपल्या पत्रिकेत कडक मंगळ असेल तर मंगळाच्या शुभतेसाठी शुभ्र चंदनाचा तिलक लावणे शुभ मानले जाते. म्हणजेच आपण चंदनाचे खोड घेऊन सहाणेवर उगाळतो, त्या चंदनाचा टिळा लावावा. याशिवाय बृहस्पति ग्रहाच्या अनुकूलतेसाठी पिवळे चंदन वापरता येते. असे मानले जाते की चंदनाची माळ घातल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो. यासोबतच सुख-समृद्धीही नांदते.
>> ज्योतिषशास्त्रानुसार चांदीचा संबंध चंद्र आणि शुक्राशी आहे. चांदीचे अलंकार धारण केल्याने मन एकाग्र होते आणि प्रसन्न राहते.
>>जर तुम्हाला कठोर परिश्रम करूनही आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षात शुक्रवारपासून चांदीचा चौकोनी तुकडा जवळ ठेवायला सुरुवात करा. असे मानले जाते की त्याच्या प्रभावाने आर्थिक स्थिती मजबूत होते.
>>जर तुम्ही चांदीचा तुकडा जवळ ठेवू शकत नसाल तर चांदीची अंगठी घालणे फायदेशीर ठरेल. याशिवाय शुक्ल पक्षातील शुक्रवारी चांदीच्या भांड्यात केशर विरघळवून तिलक लावल्याने सुख, समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते असेही सांगितले जाते.
या गोष्टी वरकरणी छोट्या वाटतील परंतु त्यांचा वापर केल्याने होणारे फायदे मोठे असतात. अनेकांनी तसा अनुभव घेतला आहे, तुम्हीही घेऊन बघा!