शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
2
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
3
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
5
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
6
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
7
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
8
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
9
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
10
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
11
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
12
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
13
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
14
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
15
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
16
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
17
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
18
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
19
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं

मनाचा आवाज ऐकायला शिका, अनेक प्रश्नांची उत्तरं आपोआप सापडतील- संदीप महेश्वरी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 7:00 AM

मनाचा आवाज आपल्याला काही सांगू पाहतो, पण आपण तो दुर्लक्षित करतो, तो आवाज ऐकायचा कसा त्याचा उपाय संदीप महेश्वरी सांगत आहेत.

आपल्या अवती भोवती एवढे आवाज असतात की बाजूला बसलेला माणूस काय बोलतो हे ऐकू येत नाही तर आतला आवाज कुठून ऐकू येणार? परंतु याच गदारोळामुळे आपण सतत गोंधळलेल्या अवस्थेत असतो. प्रश्नांची उत्तरे बाहेर शोधत राहतो. पण मोटिव्हेशनल स्पीकर संदीप माहेश्वरी सांगतो, तुम्हाला हवी असलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे तुमच्याच जवळ आहेत, पण ती ऐकण्यासाठी तुमचे कान सावध नाहीत. त्यासाठी सात दिवस दिलेला सराव करा, तुम्हाला तुमचा शोध लागेल. 

आपल्या सगळ्यांना वाईट सवय किंवा खोड असते, ती म्हणजे रिकामे वाटू लागले की वेळ काढण्यासाठी मोबाईल हातात घ्या नाहीतर टीव्ही बघणे. अशा वेळी आपण बाहेर जाणे, निसर्गात फिरणे, लोकांशी बोलणे या गोष्टी करायच्या सोडून आपल्याच चौकटीत राहणे पसंत करतो. त्यामुळे एकलकोंडेपणा जास्त वाढतो. त्याऐवजी जेव्हा काहीच सुचत नाही तेव्हा शांत बसायला शिका. आपल्या डोक्यात काय सुरू आहे ते तटस्थपणे बघायला शिका. काहीही न करता शांत बसण्याची सवय नसल्याने सुरुवातीला ते अवघड वाटेल, शांत बसण्याचा कंटाळाही येईल, मात्र ते करत राहा. सरावाने तो कंटाळा निघून जाईल. 

संदीप हे स्वानुभवाच्या आधारावर सांगताना म्हणतो, 'मी वर्षातून दोनदा तरी बाहेरगावी एकटा जातो व जाताना मोबाईल नेणे टाळतो. त्यामुळे मला माझ्या सान्निध्यात पूर्ण वेळ मिळतो. पूर्णवेळ स्वतःच्या सोबत राहणे कंटाळवाणे वाटले तरी तो अनुभव नावीन्य पूर्ण असतो. एका लिमिटनंतर तुमच्या डोक्यातले विषय संपून जातात आणि मनाच्या खोलवर रुतलेले विषय मान वर काढतात. त्यावर मनातल्या मनातही व्यक्त होणे टाळा. त्यामुळे तुमचे मन तुमच्याशी बोलू लागेल. तुम्हाला नेमके काय अपेक्षित आहे, तुमच्या मर्यादा किती व कोणत्या यांची जाणीव करून देईल. तुमची उत्तरे तुम्हाला अवश्य सापडतील. 

या सरावासाठी सलग तीन दिवस, दहा दिवस मोबाईल किंवा अन्य संपर्क साधनांपासून दूर राहिले पाहिजे. तसे केले, तरच तुम्हाला स्वतःची नव्याने ओळख होईल. बाहेरचे आवाज शांत झाले की आतला आवाज ऐकू येईल आणि तो कधीच चुकीचा मार्ग दाखवणार नाही. यासाठी खूप अवघड गोष्ट म्हणजे एखाद्या मुद्द्याशी थांबणे, चिंतन करणे, स्वतःला वेळ देणे. म्हणतात ना, 'तुज आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी'

ध्यानधारणा ही त्याची प्राथमिक पातळी आहे. रोज स्वतःसाठी दहा मिनिटे काढा. विचार मनात आले तरी येऊ द्या. शांत राहिल्याने तुमचा मेंदू अधिक कार्यक्षम होईल, जशी आपली संगणक व्यवस्था असते. तिच्यावर बटनं दाबून मारा केला तर ती आणखी कोलमंडते, याउलट वेळ दिला तर यंत्रणा शांत होते आणि आपोआप कार्यन्वित होते. 

तीच शांतता मेंदूलाही आवश्यक असते. त्याला शांत होऊ द्या, तुम्हाला तुमचा आतला आवाज नक्की सापडेल!

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी