नवीन वर्ष नवीन सकारात्मकता घेऊन सुरू होते. हजारो लोकं दररोज अगदी न चुकता राशीभविष्य पाहात असतात. राशिभविष्य हा एक मार्ग असतो येणाऱ्या वर्षात घडणार्या घटनांचा अंदाज लावण्याचा आणि म्हणूनच आपण बघणार आहोत की २०२२ सिंह राशीच्या व्यक्तींसाठी कसे असणार आहे? चला तर मग जाणून घेऊया..
सन २०२२ नुसार सिंह राशीच्या लोकांसाठी हे वर्ष चांगले जाणार आहे. विशेषत: वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी महिन्याच्या मध्यात मंगळ धनु राशीत प्रवेश करणार आहे. सिंह राशीच्या पाचव्या स्थानी हे राशीपरिवर्तन होत असल्यामुळे तुम्हाला आर्थिक, करिअर, शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित सर्वोत्तम परिणाम मिळतील. तुमच्या करिअरबद्दल बोलायचे झाले, तर हे वर्ष करिअरच्या दृष्टीने अनुकूल राहील. विशेषत: फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात, तुम्हाला कार्यक्षेत्राशी संबंधित प्रत्येक कामात अपार यश मिळेल. या वर्षी विशेषतः ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा काळ तुमच्यासाठी खूप चांगला आहे.
सिंह राशीच्या व्यक्तींच्या आर्थिक आघाडीबाबत बोलायचे झाले, तर तुम्हाला २०२२ मध्ये आर्थिक स्तरावर सकारात्मक परिणाम मिळतील. आर्थिक चणचण असेल तर वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारीच्या मध्यात सुधारणा होईल. यानंतर, एप्रिलच्या महिन्यात गुरुच्या राशीबदलानंतर तुम्हाला अनेक मार्गांनी गुप्त धन प्राप्त होईल. या काळात काही अनावश्यक खर्च वाढल्यामुळे आर्थिक आघाडीवर चिंता निर्माण होऊ शकेल. अशा परिस्थितीत, तुम्हाला योग्य बजेटनुसार पैसे खर्च करण्याचा सल्ला दिला जात आहे.
दुसरीकडे, विद्यार्थीवर्गासाठी सन २०२२ हे वर्ष उत्तम परिणाम देणारे ठरू शकेल. परंतु यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त तुमच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला जात आहे. विशेषत: फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्यात तुमचे लक्ष काहीसे विचलित असू शकते. त्याचा परिणाम अभ्यासावर होऊ शकतो. त्यामुळे अभ्यासात सातत्य टिकवून ठेवणे आवश्यक आहे. जे विद्यार्थी अभ्यासासाठी परदेशात जाण्याचा विचार करत होते, त्यांनाही यावर्षी सकारात्मक निकाल मिळण्याची शक्यता आहे. परंतु, एप्रिलनंतर जेव्हा गुरु तुमच्या राशीच्या आठव्या भावात प्रवेश करेल, तेव्हा तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल.
सन २०२२ च्या शेवटच्या तीन महिने म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरबद्दल बोलायचे, तर हा काळ सिंह राशीच्या जातकांसाठी आरोग्याच्या दृष्टीने सर्वोत्तम असणार आहे. कारण या काळात मंगळ तुमच्या राशीच्या अनुकूल स्थानी संचार करेल. यामुळे तुम्हाला प्रचंड ऊर्जा आणि चैतन्य मिळू शकेल. परिणामी, एखाद्या जुन्या आजारापासून सुटका होऊ शकेल. मन प्रसन्न राहील. चिंतामुक्तीमुळे आनंद द्विगुणित होऊ शकेल. तुम्ही निरोगी जीवनाचा आनंद घेऊ शकाल.
याशिवाय कौटुंबिक, वैवाहिक जीवन आणि प्रेमाशी संबंधित बाबींमध्येही तुम्हाला उत्तम परिणाम मिळतील. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून ते जुलैच्या मध्यापर्यंत कुटुंबात एखाद्या शुभ कार्याचे आयोजन केले जाऊ शकते. यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुम्ही विवाहित असाल, तर हे वर्ष तुमच्यासाठी चांगले असेल, परंतु तुमच्या जोडीदारासोबत काही आरोग्य समस्यांमुळे तुमचा मानसिक ताण वाढण्याची शक्यता आहे.