शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण कोरियात मार्शल लॉची घोषणा, राष्ट्रपती यून सुक-योल म्हणाले, "देशविरोधी शक्तींचा अंत होईल"!
2
Video: विनोद कांबळीला पाहताच सचिन तेंडुलकर भेटायला गेला, त्याला पाहून 'बालमित्र' भावूक झाला...
3
अंबाजोगाईत साडे दहा लाखांचा गुटखा पकडला; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; दोघे ताब्यात
4
शेतातील शेडवर छापा; २ लाखांचा गुटख्या जप्त, एक ताब्यात; दहशतवादविराेधी शाखेची कारवाई
5
अपहरण झालेल्या दाेन मुलींची हैदराबादमधून सुटका; दाेन आराेपी अटकेत, AHTU शाखेची कारवाई
6
अमरावती विद्यापीठात अधिष्ठाता पदभरतीतून आरक्षणाचा ‘बिंदू’ गायब, अखेर 'ती' जाहिरात रद्द
7
संभल हिंसाचाराचं पाकिस्तान कनेक्शन! 3 पुरावे ओरडून-ओरडून देतायत साक्ष; फॉरेन्सिक टीमनं नाल्या खंगाळल्या
8
“निवडणुकीत आम्हाला थर्ड अंपायर मिळाला असता तर अनेक निकाल बदलले असते”: राज ठाकरे
9
UPI मुळे ATM ला फटका! 5 वर्षात प्रथमच एटीएमची संख्या घटली; ग्रामीण भागात काय स्थिती?
10
वाह.. क्या बात है! विराट-रोहितची एकत्रित नेट प्रक्टिस पाहायला ऑस्ट्रेलियन फॅन्सची गर्दी (Video)
11
निर्मला सीतारामन यांना मोठा दिलासा; कर्नाटक हायकोर्टाने रद्द केला 'इलेक्टोरल बाँड'चा खटला...
12
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी देवेंद्र फडणवीस 'वर्षा'वर; नेमकी कोणती चर्चा झाली?
13
7 कॅबिनेट मंत्रीपदं, दोन राज्यमंत्रीपदं, एक राज्यपालपद अन्...; अजित दादा काय-काय मागणार?
14
“...तर एकनाथ शिंदे कधी उद्धव ठाकरेंना सोडून बाहेर पडले नसते”; भाजपा नेत्याची टीका
15
"आपणच सर्व उत्तरं द्या...!"; मोदी सरकारमधील मंत्र्यांवर का नाराज झाले ओम बिरला? भरसंसदेत म्हणाले...
16
Pappu Yadav : मोठा खुलासा! पप्पू यादव यांना सुरक्षा मिळावी म्हणून जवळच्यांनी रचला 'धमकीचा ड्रामा'
17
Airtel आणि Jio चा 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लॅन; मिळेल फास्ट इंटरनेट
18
निर्मला सीतारामन जिथे 'निरीक्षक' म्हणून गेल्या, तिथे कसा होता भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला?
19
“मोदी-शाह, १० हजार लाडक्या बहिणी, २ हजार शेतकरी शपथविधीला येणार”; भाजपा नेत्याने यादीच वाचली
20
"आम्ही कधीही लग्न करणार नाही’’, १२ तरुणींनी घेतला अजब निर्णय, कारण काय? 

Life Lesson: स्वतःची किंमत कशी ओळखावी? शिक्षिकेने दिला मुलांना स्वाभिमानाचा धडा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 7:00 AM

Life Lesson: कोणी आपली किंमत करो न करो, पण स्वतःची किंमत आपण स्वतः ओळखली पाहिजे; त्याचा हा परिपाठ!

एकदा एक शिक्षक वर्गातल्या विद्यार्थ्यांसमोर एक शंभर रुपयांची नोट धरतात. मुलांना त्याची किंमत विचारतात. सगळी मुलं एकसुरात सांगतात, शंभर रुपये!शिक्षक विचारतात, कोणाकोणाला ही नोट हवी आहे? सगळी मुले हात वर करतात. 

मग शिक्षक तीच नोट हाताच्या मुठीत घट्ट धरून चुरगळून टाकतात. आणि ती चुरगळलेली नोट दाखवत विद्यार्थ्यांना विचारतात, आता याची किंमत किती आहे सांगा? मुलं पुन्हा एक सुरात सांगतात, शंभर रुपये....!शिक्षक विचारतात, कोणाकोणाला ही नोट हवी आहे?सगळी मुले हात वर करतात. 

आता तीच नोट शिक्षक आपल्या चपलेखाली टाकतात. चुरगळलेल्या नोटेला माती लागते, ती आणखी चुरगळते. मुलांना ते आवडत नाही. शिक्षक ती नोट उचलून पुन्हा वर्गासमोर धरतात आणि विचारतात, आता या नोटेची किंमत किती? मुलं एक सुरात म्हणतात, शंभर रुपये....!शिक्षक विचारतात, कोणाकोणाला ही नोट हवी आहे?सगळी मुले हात वर करतात. 

यावरून शिक्षक मुलांना सांगतात, मुलांनो, ही नोट कितीही चुरगळली, त्याला माती लागली तरी ती जोवर फाटत नाही, तिचे तुकडे होत नाहीत तोवर तिची किंमत बदलत नाही. तुम्ही सुद्धा या नोटेसारखे व्हा! तुमच्या आयुष्यात कोणी तुम्हाला चुरगळून टाकण्याचा प्रयत्न करेल कोणी तुम्हाला पायाखाली तुडवल्यासारखी वागणूक देईल, पण तुम्ही स्वतः तुटून जाऊ नका, तरच लोक तुमची किंमत करतील आणि तुमचे महत्त्व टिकून राहील. 

तुमची किंमत कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहील.... हे मनावर कोरून ठेवा आणि तसेच किमती व्यक्तिमत्त्व घडवा!