शहरं
Join us  
Trending Stories
1
सारे अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात, मुकेश अंबानींनी तर अमेरिकेतच पैसा ओतला... मोठी डील...
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
4
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
5
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
6
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
7
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
8
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
9
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
10
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
11
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
12
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
13
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
14
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
15
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
16
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
17
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
18
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
19
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
20
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम

Life Lesson: आयुष्यात 'ही' एक गोष्ट सोडली तर सुखी, समाधानी आयुष्य आरामात जगता येईल!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 4:29 PM

Life Lesson: पैसा कमावता येतो, पण सुख, समाधान कसे कमवायचे त्याचा सोपा मंत्र जाणून घ्या!

आपल्या दु:खाचे मूळ कारण आहे तुलना. आपण जोपर्यंत तुलना करणे थांबवणार नाही, तोवर आपण सुखी समाधानी होणार नाही. आईने आपल्याला व आपल्या धाकट्या भावाला खाऊ दिला, तर माझ्यापेक्षा त्याला जास्त का दिला याचा विचार करण्यात आपण खाऊ खाण्यातली मजा गमावून बसतो. तीच सवय अंगवळणी पडते आणि कायमस्वरूपी राहते. पण ही तुलना थांबवा, तुलना कधीही न संपणारी असते पण ती करण्यात आनंद संपून जातो हे लक्षात ठेवा.

समजा तुम्हाला सांगितले, अ आणि ब ताशी अनुक्रमे ८ आणि १० किलोमीटर धावतात, तर त्यांच्यात वेगवान कोण? तुम्ही उत्तर द्याल - बसमजा तुम्हाला सांगितले, अ आणि ब चे वय अनुक्रमे ४० आणि २० आहे, तर त्यांच्यात जास्त निरोगी कोण? तुम्ही उत्तर द्याल - असमजा तुम्हाला सांगितले, अ आणि ब यांच्यात अ निरोगी आहे पण ब ला दुर्धर आजार आहे, तरीही तो धावतोय, त्यांच्यात विजेता कोण? तुम्ही उत्तर द्याल - बयाचाच अर्थ, प्रत्येकाची परिस्थिती, काळ, वेळ, वय, समस्या वेगवेगळ्या असतात. या सर्वाचा विचार करून पाहिले, तर प्रत्येक जण आपापल्या जागी योग्यच आहे. आपण करत असलेली तुलनाच अयोग्य आहे. 

प्रत्येकाच्या आयुष्याची प्रश्नपत्रिका वेगवेगळी आहे, त्यामुळे साहजिकच उत्तरपत्रिकाही वेगवेगळी आहे. चुकूनही दुसऱ्याचे उत्तर कॉपी करायला जाऊ नका, त्याच्यासाठी ते बरोबर असेलही, पण तुमच्यासाठी ते चुकीचे ठरू शकते. शालेय गणितात शिकवलेली सूत्रे नियम पाठ्यपुस्तकातील गणिते सोडवू शकतील, परंतु आयुष्याचे गणित सोडवायचे असेल, तर एकच फॉर्म्युला सगळीकडे वापरून चालणार नाही. तो व्यक्तीपत्वे बदलत जाईल. 

प्रत्येकाला भगवंताने एकमेवाद्वितीय बनवले आहे. कोणीही कोणासारखा नाही. कोणी नशिबाने मोठा होतो तर कोणी प्रयत्नाने. मात्र जो तुलना करत बसतो, तो कधीच मोठा होऊ शकत नाही. म्हणून तुलना करणे थांबवा आणि आयुष्याचा आनंद घेत समाधानाने जगायला शिका.

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीMental Health Tipsमानसिक आरोग्य