शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

Life Lesson: हसवणाराही रडवून जातो, आपण जाण्याआधी थोडे हसायला शिकून घेऊ!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: September 21, 2022 2:55 PM

Life Lesson: राजू श्रीवास्तव या विनोदी कलाकाराच्या अकाली निधनाने दुःखाचे सावट पसरले असले, तरी विनोदाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. 

>> ज्योत्स्ना गाडगीळ 

विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव यांच्या जाण्याने, निखळ विनोदी शैलीने उमटणारी हास्यलकीर आपल्या हातून पुसली गेली की काय अशी क्षणभर भीती वाटली. तसेही आपल्याला मनमोकळे, खळखळून, गडगडाटी हसून काळ लोटला असेल, बरोबर ना?

सद्यस्थितीत जो तो एकमेकांचा पाणउतारा करण्यावर टपलेला असतो. कुरघोडी, द्वेष, मत्सर, हेवेदावे यातच आपले आयुष्य वाया जात आहे. आपण शेवटचे खळखळून कधी हसलो होतो हे जरा आठवून बघा. मुळात हे आठवावे लागत आहे हीच खेदजनक बाब आहे. सतत कसला तरी विचार, ताण, स्पर्धा यामुळे आपण मनमुरादपणे जगणे विसरत चालले आहोत. 

आज समाज माध्यमांवर हसण्याचे इमोजी उपलब्ध आहेत, पण ओठावरचे हसू हरवले आहे. कारण माणसं माणसांपासून दुरावली आहेत. अगदी काही वर्षांपूर्वी 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' हा कार्यक्रम आपण सर्वांनी आपल्या कुटुंबाबरोबर एकत्रित पाहिला असेल. हसत हसत, डोळ्यातून पाणी येत निखळ विनोदाला दाद दिली असेल. मात्र मोबाईल क्रांती झाली आणि तेच विनोद छोटे व्हिडीओ बनून व्हायरल झाले, पण एकत्र पाहण्याची, अनुभवण्याची गंमत निघून गेली, हे तुम्हीसुद्धा मान्य कराल. 

हसणे म्हणजे जीवनाचा मनमुराद आनंद घ्यायला शिकणे. तणावावर उपाय म्हणजे हसणे. आनंदी राहण्याचा उपाय म्हणजे हसणे. सुखी जीवनाचा मूलमंत्र म्हणजे हसणे! हे हसणं राजू श्रीवास्तव यांच्या विनोदासारखं निखळ असावं. कोणाच्या व्यंगावर, उणिवांवर, अपयशावर, चुकांवर हसण्याला हसणे म्हणत नाहीतर तर तो अहंकार म्हटला जातो. तो समोरच्याला जिव्हारी लागू शकतो. हसण्याला कोणाच्या दुःखाची किनार नसावी. दुसऱ्याला दुखवून मिळवलेला आनंद फार काळ टिकत नाही. त्यामुळे लहान मुलांसारखे निस्पृह राहून हसण्याची संधी स्वतः शोधा आणि इतरांना मिळवून द्या!

राज कपूर यांच्या गाण्यात म्हटलं आहे ना, 

इक दिन बित जाएगा, माती के मोल,जग में रह जाऐंगे, प्यारे तेरे बोल, दुजे के होटो को देकर अपने गीत, कोई निशानी छोड, फिर दुनियासे 'डोल!

राजू श्रीवास्तव हे आता आपल्यात नाहीत, पण जाण्याआधी त्यांनी लोकांना हसवण्यासाठी पुरेपूर साठा करून ठेवला आहे आणि आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेत मरण्याआधी थोडं जगायला आणि हसायला शिकूया!

टॅग्स :Raju Shrivastavराजू श्रीवास्तव