स्त्री क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता असते, हे विधान आपण सर्वांनीच ऐकले आहे. परवाच जागतिक मातृदिन साजरा झाला. त्यानिमित्ताने आपण आपल्या नात्यातल्या सर्व मातृरूपी स्त्रियांचा गौरव केला, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. स्त्री शक्तीचे ऋण एका दिवसात फिटणारे नाही. तर तिचा आठव प्रत्येक क्षणी व्हावा, तिचे मूल्य आपल्याला कळावे, म्हणून स्वामी शांतिगिरीजी महाराज स्त्री हे सुखाचे मूळ आहे हे पटवून देण्यासाठी लोकमत भक्ती युट्युब चॅनेल वर आपल्याला live मार्गदर्शन करणार आहेत.
उत्तम समाजसेवक आणि अध्यात्मिक गुरु अशी स्वामीजींची ख्याती आहे. साधारणतः १९७५-७६ मध्ये शांतिगिरीजी बाबांनी जे घर सोडले ते आजतागायत आहे. 'जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती.' या उक्तीप्रमाणे शांतिगिरीजी बाबांनी आपले कार्य सुरू केले. पहिल्यापासूनच शांतिगिरीजी बाबा जनार्दन बाबांचे आवडते शिष्य होते. सन १९८९ मध्ये जनार्दन बाबांचे महानिर्वाण झाले. आणि सोडशी सोहळ्यात जनार्दन बाबांच्या उत्तराधिकारी पदाची शाल अनेक मान्यवरांच्या साक्षीने आणि शंभू पंचनाम जुना आखाड्याच्या साधूंच्या उपस्थितीत शांतिगिरीजी बाबांच्या अंगावर चढवली. परंतु आजही काही नतभ्रष्ट लोक हे मान्य करायला तयार नाही. त्यानंतर ही शांतिगिरीजी बाबांना अनेक प्रकारचे त्रास काही लोकांनी दिला. प्रसंगी मारायचा प्रयत्न झाला. परंतु जनार्दन बाबांनी दिव्य दृष्टी दिलेल्या शांतिगिरीजी बाबांनी आपले कार्य थांबवले नाही. या सर्वांतून शांतिगिरीजी बाबांनी संयमाने आणि धैर्याने मार्ग काढत बाबांच्या कार्याचा प्रचार प्रसाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली ती आजतागायत सुरू आहे.
स्त्री शक्तीच्या विविध रूपांचा, गुणांचा परिचय व्हावा आणि सर्व नात्यात तिला योग्य मान मिळावा, यासाठी १२ मे रोजी रात्री ८ वाजता लोकमत भक्ती युट्युब चॅनलवर आपणही सहभागी व्हा.