शहरं
Join us  
Trending Stories
1
नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात विधानसभा निवडणूक?; CM एकनाथ शिंदेंचे संकेत
2
मराठा आरक्षण: मंत्र्यांच्या शिष्टाईला यश; राजश्री उंबरे यांनी १४ दिवसांनंतर उपोषण केलं स्थगित
3
धनगर समाजाच्या मागणीवर राज्य सरकारचं मोठं पाऊल; धनगर आणि धनगड एकच असा GR काढणार
4
चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला, मग कपडे उतरवले आणि..., कोलकात्यातील आणखी एका रुग्णालयात धक्कादायक घटना  
5
Investment Tips : जाणून घ्या गुंतवणूकीची १८x१५x१० स्ट्रॅटजी; तुमचं मूल १८ व्या वर्षीच बनेल कोट्यधीश
6
आजीला पाहून खूश झाली राहा, टाळ्या वाजवत बोलताना दिसली; आलिया अन् रणबीरही पाहतच राहिले
7
बायडेन आणि कमला हॅरिस यांच्या हत्येचा कोणी प्रयत्न का करत नाही?; एलन मस्क असं का म्हणाला?
8
Post Officeच्या कोणत्या स्कीमवर मिळेल 'अधिक' व्याज, गुंतवणूकीपूर्वी पाहा प्रत्येक योजनेचे इंटरेस्ट रेट
9
Bigg Boss Marathi 5 : "दम असेल तर तोंडावर बोल", निक्कीने संग्रामला सगळ्यांसमोरच दिली धमकी
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणारा हल्लेखोर नेमका आहे कोण? धक्कादायक माहिती आली समोर 
11
अनन्या पांडेने वॉकर ब्लँकोसोबतच्या नात्यावर सोडलं मौन, म्हणाली - "मी एक..."
12
जेवढा प्रवास, तेवढाच टाेल; कशी आहे जीपीएसवर आधारित टाेल संकलन यंत्रणा?
13
PM नरेंद्र मोदी तिसऱ्या टर्ममध्ये आणखी एक ऐतिहासिक निर्णय घेणार; लवकरच विधेयक आणणार?
14
लोकसभेला भाजप ३०३ वरून २४० वर कसा आला? नितीन गडकरींनी सांगितलं कारण
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा पुन्हा प्रयत्न; AK 47 नं गोळीबार, नेमकं काय घडलं?
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: शब्द जपून वापरा, नवीन कार्य सुरू करायला आजचा दिवस प्रतिकूल!
17
दोन दिवसांत केजरीवाल सोडणार मुख्यमंत्रिपद; नवी खेळी : म्हणाले, जनतेने प्रमाणपत्र दिल्यावरच पदावर परतणार
18
लवकरच जनगणना, जात रकान्यावर निर्णय नाही; पहिलीच डिजिटल गणना, स्व-गणनेचीही संधी
19
वैद्यकीय प्रवेशाच्या आमिषाने फसवणूक; दाेघांना अटक; मुंबईसह दिल्लीत गुन्हे
20
यांचे गुऱ्हाळ, त्यांची चक्की! ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागू होण्याची शक्यता

Lokmanya Tilak Jayanti 2023: पूर्वीचा बहुजन समाज लोकमान्य टिळकांना गुरुस्थानी मानत होता, मात्र आता का नाही? कारण... 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 9:20 AM

Lokmanya Tilak Jayanti 2023: टिळकांना लोकमान्य ही पदवी लोकांनीच दिली कारण त्यांनी सर्व ज्ञाती बांधवांना जोडून ठेवले होते, मात्र ती आपुलकी कमी झाली त्याचे कारणही जाणून घ्या. 

गुरु म्हणजे मार्गदर्शक. कुठे जावे, काय करावे याचा नीट उलगडा होण्यासाठी जो योग्य मार्ग दाखवतो, तो गुरु. म्हणूनच लोकमान्य टिळकांना राष्ट्रगुरु असे यथार्थतेने म्हणता येते. २३ जुलै रोजी लोकमान्य टिळकांची जयंती आहे. त्यानिमित्त करून घेऊ त्यांच्या बहुमूल्य कार्याची ओळख व तेव्हाची आणि आताची लोकांच्या मनातील त्यांची प्रतिमाही जाणून घेऊया!

पारतंत्र्याच्या काळात लोकमान्यांनी `स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!' असे तेजस्वी उद्गार काढले आणि या टिळकांच्या उद्गारांना मंत्राचे स्वरूप प्राप्त झाले. जोखड झुगारण्यासाठी आत्मविश्वास देणारा, स्वाभिमानाची ज्योत मनात पेटविणारा हा मंत्र टिळकांनी उभ्या भारतवर्षाला दिला. त्यांच्याबद्दल अधिक माहिती देताना ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर लिहितात-

अलीकडच्या इतिहासात गेल्या शे दीडशे वर्षांत लोकमान्यांएवढी लोकप्रियता आणि लोकमान्यता दुसऱ्या कोणाला मिळालेली नाही. लोकमान्यांचे व्यक्तिगत जीवन अतिशय स्वच्छ व निष्कल असे होते. लोकमान्य हे जणू परमेश्वराचा अवतार आहेत, अशा भावनेने लोक त्यांच्याकडे पाहत असत. लोकमान्य तुरुंगात गेले तर त्यांच्यामुळे तुरुंग पावन झाला असे एका कवीने म्हटले आहे.

लोकी निंद्य कारावास, परि तू पावन केले त्यास।।

रँडच्या खुनासंदर्भात टिळकांना शिक्षा झाली. प्रथम काही महिने टिळक डोंगरीच्या तुरुंगात होते. तिथे तळहाताएवढ्या भाकरीचा तुकडा ते पाण्यात कुस्करून खात. दोन महिन्यांत त्यांचे वजन तीस पौंडांनी कमी झाले. टिळक तुरुंगात असताना कोट्यावधी भारतीयांना जेवण गोड लागत नसे. लोकमान्य तुरुंगात आहेत म्हणून लोकमान्यांचे गुरू श्रीधर गणेश जिनसीवाले हे इतके व्यथित झाले, की ते चौपाटीवर जाऊन लहान मुलासारखे रडत बसले. लोकमान्यांना तुरुंगात अतिशय वाईट भोजन मिळते, हे समजल्यावर कैद्यांना घरुन जेवण आणायची मुभा होती ते आपल्या डब्यातून लोकमान्यांना आवडणारे पदार्थ मागवीत आणि युक्तीने ते त्यांच्यापर्यंत पोहोचवित. 

येरवड्याच्या तुरुंगात टिळक असताना तेथील शिपाई टिळकांना आवडती सुपारी त्यांना देण्यात आनंद मानत असे. काही समाजकंटक लोकमान्यांना हिणवण्यासाठी तेल्या तांबोळ्यांचे पुढारी म्हणत असत. परंतु समाजाच्या या वर्गाचा लोकमान्यांवर अतिशय लोभ होता. 

टिळक मंडालेच्या तुरुंगातून सुटून आले त्यावेळी पुण्यातील काही देवळांमध्ये चक्क दीपोत्सव साजरा झाला. सरदार खाजगीवाल्यांनी टिळक सुटून येईपर्यंत गणपतीचे विसर्जन करणार नाही असा पण केला होता. टिळक सुटून आल्यावर थाटामाटात विसर्जन करण्यात आले.

१८९८ च्या प्रारंभी मुबईला प्लेगची साथ होती. प्लेग प्रतिबंध लस विश्वासार्ह न वाटल्याने टिळक ती लस टोचून घेण्यास नाखुष होते. त्यामुळे तुरुंगातील इतर कैदीही लस टोचून घ्यायला तयार होईना. मग डॉक्टरांनी टिळकांना सांगितले, `तुम्ही लस टोचून घ्या  तरच इतर लोक लस घेतील.' टिळकांची खात्री पटल्यावर त्यांनी अणि इतर कैद्यांनी लस टोचून घेतली. 

टिळक तुरुंगातून सुटून येईपर्यांत लोकांनी अनेक उपासतापास केले, नवस केले, आवडते पदार्थ सोडले. अनुष्ठाने केली. टिळक राष्ट्राचे पुढारी होते, पण प्रत्येकला ते आपल्या घरचेच कोणी वडीलधारे आहेत, असे वाटे. टिळकांसारखा लोकोत्तर आदर्श पुढारी अद्वितीय स्थान प्रस्थापित करणारे टिळक या देशाला स्वातंत्र्याचा मंत्र देणारे राष्ट्रगुरु म्हणून पुजनीय वाटतात.

मात्र अलीकडच्या काळात लोक इतिहास जाणून घेण्याबद्दल उदासीन झाले आहेत. सत्य समजून न घेता केवळ आडनावावरून सत्पुरुषांची आपापल्या ज्ञातीत विभागणी करत आहेत. त्यामुळे लोकांची मने कलुषित झाली आहेत. मात्र त्यांनी इतिहास वाचला तर त्यांच्या मनातील मळभ दूर होईल हे नक्की! समस्त सत्पुरुषांनी मातृभूमीच्या स्वातंत्र्याचा लढा देताना जाती, धर्म, भाषा दूर सारून एकोपा केला आणि त्याच सत्पुरुषांना विभागण्याचे पाप आपण करत आहोत. त्यामुळे त्यांचे बलिदान लक्षात घेता त्यांच्याप्रती आदर व्यक्त करूया आणि त्यांच्याप्रमाणेच आपल्या देशाच्या विकासासाठी आपापसातले मतभेद विसरून भारतीय अशी ओळख बनवूया!

जय हिंद!

टॅग्स :Lokmanya Tilakलोकमान्य टिळक