सर्व देशाचे लक्ष ४ जून रोजी हाती येणाऱ्या लोकसभेच्या निकालाकडे असणार आहे. मागच्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्का कमी असला, तरी मतदान केलेल्या व न केलेल्यांना निकालाबाबत उत्सुकता आहे हे नक्की. राजकारणातले बदलते वारे, नेत्यांचे बदलते रंग आणि बदलत्या राजकीय घडामोडी पाहता निकाल कोणाच्या बाजूला लागणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यादिवशीच्या ग्रहमानानुसार शनी देवांकडे सूत्र असणार आहे असे ज्योतिषांचे म्हणणे आहे.
ज्योतिष विशारद ऋतू केळकर लिहितात, 'शनी हा एकमेव असा ग्रह आहे जो निष्पक्ष आहे. यावेळी ही लढत कोणालाच सोप्पी नाही. ज्याला संपवला आहे असं समजत होतो. तो पुन्हा आव्हान बनून समोर उभा ठाकू शकतो. आणि जे आमच्या समोर कोणी नाही असे सुद्धा झोपू शकतात. असेच काहीसे ग्रह संकेत देत आहेत.' असे भाकीत वर्तवताना त्यांनी पक्षाचे नाव घेतले नसले तरी सुज्ञ वाचकांना निकालाचा अंदाज आलाच असेल.
नऊ ग्रहांपैकी शनि हा सर्वात तापट आणि कठोर ग्रह मानला जातो कारण तो न्यायाचा सर्वोच्च देव आहे आणि प्रत्येकाला त्याच्या कर्मांनुसार फळ देतो. शनि देवांचे नाव ऐकून बरेच लोक घाबरतात कारण त्यांना वाटते की शनिदेव नेहमीच वाईट आणि अशुभ परिणाम देतात, परंतु तसे तसे नाही. जी व्यक्ती शनिदेवला प्रसन्न करते, तिच्यावर शनिदेव प्रसन्न होतात. त्यांच्या कृपेने रंकाचा राव आणि अवकृपेने रावाचा रंक होऊ शकतो. एवढी शक्ती त्यांच्यात आहे.
शनी हा मजूर, कामगार, शेतकरी,अतिशय सामान्य माणसाचा द्योतक ग्रह आहे. जो कष्ट करतो त्याच्या पाठीशी शनी देव उभे राहतात असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे कष्टकरी नेत्यांच्या वाट्याला विजयश्री आणि नुसती चमकोगिरी करणाऱ्या लोकांना पराभवाचा सामना करावा लागणार आहे हे नक्की. जे नेते प्रामाणिकपणे काम करतात, त्यांच्या बाजूने जनता जनताजनार्दन कौल देणार हे नक्की. आणि ज्यांच्या वाट्याला अपयश येणार, ते या पराभवानंतर पुनश्च उभे राहणे कठीण आहे, असे भाकीत ज्योतिषांनी वर्तवले आहे.