शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यात ‘आव्वाज’ कुणाचा? उद्धवसेना वि. शिंदेसेना जुगलबंदी; गर्दीचा उच्चांक कोण मोडेल?
2
म्हैसूर-दरभंगा एक्स्प्रेसची मालगाडीला धडक; ट्रेनच्या डब्यांनी घेतला पेट
3
पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यास जरांगेंचे आव्हान; भगवान भक्तिगडावर मुंडे; नारायणगडावर पाटील
4
युद्धाने समस्या सुटणार नाहीत, शक्य तितक्या लवकर शांतता, स्थिरता पुनर्स्थापित करावी: PM मोदी
5
टाटा ट्रस्टची धुरा नोएल टाटांकडे; उत्तराधिकारी निवडला, ‘टाटा ट्रस्ट्स’च्या चेअरमनपदी निवड
6
उड्डाणानंतर विमानात बिघाड, काही तास घिरट्या, सुखरूप लॅंडिंग; पायलटमुळे प्रवाशांचे प्राण वाचले
7
सीमेपलीकडून १५० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत; सुरक्षा दलांना अधिक सतर्कतेचा इशारा
8
फ्लाइट अन् फाइटसाठीही तयार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेसाठी सज्जतेचे संकेत
9
निवडणुकीच्या तोंडावर ‘सोशल इंजिनीअरिंग’; विविध समाजांसाठी महामंडळे स्थापन करण्याचा सपाटा
10
‘लाडक्या’ योजना हव्या, तर मत द्या; विकासासाठी पुन्हा महायुती सरकार आणावे लागेल: CM शिंदे
11
राजेगटाचं ठरलं! बंधू संजीवराजे ‘तुतारी’ घेणार; रामराजे महायुतीचा प्रचार करणार नाहीत
12
“राजकारणात बजबजपुरी, आता कोण कुठे असेल काही सांगता येत नाही”: संभाजीराजे
13
“हरयाणात जे घडले ते महाराष्ट्रात कदापि घडणार नाही, कारण...”: प्रणिती शिंदे
14
रिपाइंला ८ ते १० जागा हव्यात; निवडणूक आमच्याच चिन्हावर लढणार: रामदास आठवले
15
भाजप नेते अजित पवार यांना साइड ट्रॅक करताहेत; विजय वडेट्टीवार यांचा आरोप
16
महादेव ॲप प्रवर्तक चंद्राकरला अखेर बेड्या; दुबईत अटक, लवकरच होणार प्रत्यार्पण
17
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
18
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
19
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
20
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!

Lord Ganesha: गणपती बाप्पाच्या नावापुढे 'मोरया' जोडण्यामागे आहे एका भक्ताची गोष्ट; वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 2:16 PM

Lord Ganesha Story: बाप्पाचा गजर मोरया या शब्दाशिवाय पूर्ण होत नाही, पण हा शब्द कसा जोडला गेला हे जाणून घेणेही महत्त्वाचे आहे. 

गणपती बाप्पाचा गजर कोणी केला की समूहाने 'मोरयाsss' म्हणत री ओढली जाते. ही गणेशभक्ती आपल्याकडे परंपरेनेच आली असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. आबालवृद्धांना गणपती मोहून टाकतो आणि त्याचे दर्शन होताच आपण त्याच्यापुढे नतमस्तक होत 'मोरया' अर्थात नमस्कार करतो. परंतु या शब्दाचा अर्थ एवढा मर्यादित नाही. त्यामागे आणखी एक कथा जोडलेली आहे. कोणती ते पाहू... 

श्रीक्षेत्र मोरगाव हे श्रीगणेशाचे महत्त्वाचे स्थान आहे. ते महाराष्ट्रात पुण्याजवळ आहे. समर्थ रामदासस्वामी मोरगावच्या श्रीगणेशाच्या दर्शनास गेले. त्यांना श्रीगणेशाने साक्षात दर्शन दिले, त्याच ठिकाणी समर्थांनी सुखकर्ता दु:खहर्ता ही प्रासादिक आरती लिहीली. 

मोरगावच्या मयुरेश्वराचे परमभक्त गोसावीनंदन उर्फ मोरया गोसावी यांनी लिहिलेली 'सिंदुर लाल चढायो, अच्छा गजमुखको' ही हिंदी भाषेतील आरती व 'नाना परिमळ दुर्वा, शेंदूर, शमीपत्रे' ही मराठी भाषेतील आरती सर्वत्र म्हटली जाते.

मोरगावच्या श्रीगणेशाच्या सामर्थ्याचा अनुभव अनेक गणेशभक्तांना आला आहे. मोरगाव येथे गोसावीनंदन, मोरया गोसावी हा परब्रह्माचा अवतार झाला, तो त्यांच्या वडिलांनी केलेल्या उग्र व खडतर गणेश तपश्चर्येमुळे. गोसावीनंदनदेखील आपल्या वडिलांप्रमाणे गणेशाची उपासना करत होते. तेही मयुरेश्वराचे भक्त होते.

मौंजीबंधनानंतर अध्ययन चालू असताना योगीराज नयन भारती यांची भेट होऊन त्यांनी अंतरीची खूण पटवून दिली. अनुग्रह दिला व थेऊरला जाऊन चिंतामणीची सेवा करण्याची गोसावीनंदन यांना आज्ञा केली.गोसावीनंदन यांनी थेऊरला जाऊन राहण्यास आपल्या आईवडिलांची परवानगी मिळवली. ते थेऊरला गेले.

गोसावीनंदन हे गणेशाचे परमभक्त. गणेशाचे स्मरण करून ते ध्यानस्थ बसू लागले. एकदा ते या अवस्थेतून समाधीअवस्थेत गेले. ही समाधी बेचाळीस दिवसांनी उतरली. त्यांनी आपल्या डोळ्यांनी चिंतामणी पाहिला. त्या दर्शनाने ते कृतार्थ झाले. धन्य झाले. गोसावीनंदन मोरया गोसावी बनले. गणपती मंगलमूर्ती आहे. मंगलमूर्ती मोरया असे गर्जून लोक गणपतीचा आणि गोसावीनंदनाचा एकत्र जयजयकार करू लागले.

मोरया गोसावी यांना अष्टसिद्धी प्राप्त झाली होती. त्यांच्याकडे बघून लोकांना ते साक्षात मोरयाच वाटत. त्यांच्य दर्शनासाठी लोकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत राहिली. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांमुळे त्यांच्या गणेशसेवेत खंड पडू लागला. म्हणून ते चिंचवडजवळील थेरगाव येथील किवजाईच्या देवळात येऊन राहू लागले. तिथेही अष्टौप्रहर लोकांची वर्दळ सुरू झाली. नंतर ते लोकांच्या आग्रहास्तव चिंचवड येथे येऊन राहिले.

मोरगावला ते दर चतुर्थीला जाऊन मयुरेशाची पूजा करीत व पंचमीला पारणे करून चिंचवडला परत येत, असा नेम झाला. भाद्रपद चतुर्थी १४९२ मध्ये कऱ्हा  नदीत स्नान करुन अर्घ्य देत असता त्यांच्या हातात गणपती दिसला. तो घेऊन ते घरी आले. व कोठारेश्वरासमोर त्यांनी या मंगलमूर्तीची प्रतिष्ठापना केली. काही काळानंतर पुत्र चि. चिंतामणी महाराज यांच्या हाती सर्व सूत्रे व कारभार सोपवून पवनेच्या काठी मोरया गोसावी यांनी संजीवन समाधी घेतली. 

मोरया गोसावी यांच्या घराण्यात सात पिढ्यांपर्यंत गणपतीचा अंश नांदला. जनमानसात वंद्य मानलेल्या गणपतीच्या नावाबरोबर मोरयाचे नाव महाराष्ट्रात मोठ्या श्रद्धेने घेतले जाते. ही माहिती वाचून आपणही मनोभावे म्हणूया...'मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया!

टॅग्स :ganpatiगणपती