ज्योतिषशास्त्राप्रमाणेच समुद्रशास्त्र देखील माणसाचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती देते. ज्योतिष शास्त्र व्यक्तीच्या राशीच्या आधारावर भाकीत करते तर सामुद्रिक शास्त्र व्यक्तीच्या शरीराच्या अवयवांचा आकार, रंग, शरीराच्या खुणा इत्यादींच्या आधारे भविष्य वर्तवते. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक रचना वेगळी असते आणि त्यावर त्या व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्य अवलंबून असते.
'गालावर खळी डोळ्यात धुंदी, ओठावर फुले लाली गुलाबाची' हे स्वप्नील बांदोडकरचे गाणे ऐकले की डोळ्यासमोर उभ्या राहतात मऊ मऊ गालांवर खोलवर खळ्या पडणाऱ्या मुली! मुलांनाही खळ्या पडतात, पण मुलींच्या गालावर पडणाऱ्या खळ्या त्यांच्या सौंदर्यात भर घालतात. त्यांचे हास्य बहारदार बनवतात. त्यांचे व्यक्तिमत्त्व खुलवतात. खळी पडणाऱ्या मुलींना पाहून इतर मुलींनाही आपल्याला खळी का पडत नाही याची खंत वाटते. पण हे नैसर्गिक वरदान म्हटले पाहिजे. समुद्र शास्त्र सांगते, की खळी पडणाऱ्या मुली भाग्यवान असतात. एवढंच नव्हे तर त्यांच्यावर लक्ष्मी मातेची विशेष कृपा असते. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल अधिक माहिती!
>> समुद्रशास्त्रात असे म्हटले आहे की ज्या मुलींच्या गालावर खळी पडते, त्यांची आर्थिक स्थिती इतर मुलींच्या तुलनेत चांगली असते. या मुलींना आयुष्यात खूप यश मिळते, आनंद मिळतो. त्या ऐषोआरामी जीवन जगतात. मुक्त हस्ते खर्च करतात. तसेच या मुलींचे आयुष्य लग्नानंतरही आनंदी राहते.
>>गालावर तीळ असणाऱ्या मुलींना खूप भाग्यवान समजले जाते. त्या हुशार असतात. जीवनातील प्रत्येक कार्यात यश मिळवतात. याउलट पुरुषांच्या गालावर नाही तर मानेवर तीळ असणे भाग्यकारक समजले जाते.
>>गोलाकार चेहरा, गोबरे गाल आणि त्यावर खळी असणारी मुलगी तर बाहुली सारखीच गोड दिसते. अशा मुली स्वभावाने पण निरागस असतात. त्यांच्या नाकावर राग असतो, पण त्या पटकन राग विसरून सगळ्यांमध्ये सहभागी होतात.
>>याउलट ज्या मुलींचे गाल बसलेले असतात, चेहऱ्यावर राकट भाव असतात, चेहरा त्रासलेला असतो, अशा मुली सतत इतरांचा दुःस्वास करत राहतात. दुसऱ्यांशी तुलना करून स्वतःचा आणि कुटुंबाचा आनंद गमावतात.
>>उभट आणि अंडाकृती चेहरा रेखीव दिसतो. परंतु अशा मुलींचा स्वभाव थोडा गूढ असतो. त्या बोलतात एक आणि वागतात भलतेच. त्यांच्या मनाचा ठाव घेणे ब्रह्मदेवालाही शक्य नाही.