शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
3
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
4
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
5
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
6
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
7
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
8
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
9
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
10
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
11
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
12
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
13
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
14
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
15
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
16
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
17
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
18
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
19
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
20
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर

Lunar Eclipse 2024: येत्या चंद्रग्रहणात 'या' चार राशींना बाळगावी लागेल कमालीची सावधगिरी; अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 12:11 PM

Lunar Eclipse 2024: १८ सप्टेंबर रोजी चंद्रग्रहण आहे, आणि त्याचदिवसापासून महालयारंभ होत आहे; त्यामुळे दिलेल्या चार राशींनी विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे!

वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण (Lunar Eclipse 2024) होणार आहे. यंदा पितृ पक्षाची (Pitru Paksha 2024)सुरुवात चंद्रग्रहणाने होत आहे. हे ग्रहण भारतातून दिसणार नाही त्यामुळे ग्रहणाचे नियम पाळण्याची आवश्यकता नाही, मात्र चंद्रग्रहणाचा प्रभाव चार राशींवर नकारात्मक पडण्याची शक्यता आहे. त्या राशी कोणत्या आणि त्यांनी काय काळजी घ्यायची ते जाणून घेऊ.  

जेव्हा चंद्र, सूर्य आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात आणि सूर्यप्रकाश पृथ्वीवर पडतो परंतु चंद्रावर नाही, तेव्हा चंद्रग्रहण होते. म्हणजे चंद्र काही काळासाठी पूर्णपणे किंवा अंशतः नाहीसा होतो. खगोलशास्त्रात चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण खूप महत्वाचे मानले जाते. हिंदू धर्म आणि ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रहण अशुभ मानले जाते, त्यामुळे ग्रहण काळात कोणतेही शुभ किंवा शुभ कार्य केले जात नाही. ग्रहणाच्या काही तास आधी सुतक कालावधी सुरू होतो. हिंदू धर्मातील पितृ पक्षाच्या १५ दिवसांमध्ये पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी. श्राद्ध, तर्पण, पिंड दान इत्यादी विधी केले जातात. यावर्षी पितृ पक्षाच्या सुरुवातीला चंद्रग्रहण होत असून शेवटच्या दिवशी अर्थात सर्वपित्री अमावस्येला (Sarvapitri Amavasya 2024) सूर्यग्रहण (Solar Eclipse 2024) होत आहे. त्यामुळे हा काळ काहीसा नकारात्मक ऊर्जा वाढवणारा ठरू शकतो असे मत ज्योतिष तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 

भारतात चंद्रग्रहण कधी होईल?  या वर्षातील दुसरे चंद्रग्रहण १८ सप्टेंबर २०२४ रोजी भाद्रपद पौर्णिमेला आणि पितृ पक्षातील पहिल्या दिवशी होत आहे. ते भारतातून दिसणार नसले तरी जनजीवनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

चार राशींनी राहावे सावधान! १८ सप्टेंबर २०२४ रोजी वर्षातील दुसरे चंद्रग्रहण चार राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव टाकेल. यापैकी हे चंद्रग्रहण मेष, सिंह, मकर आणि मीन राशीच्या लोकांसाठी त्रासदायक ठरू शकते. या लोकांना अपमान, आर्थिक नुकसान किंवा अपघाताला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे चंद्रग्रहणाच्या दिवशी आणि एकूणच पितृपक्षात या राशीच्या लोकांनी काळजी घ्यावी. उदाहरणार्थ, विनाकारण कोणाशीही संबंध ठेवू नका, आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करा. वाहन चालवताना काळजी घ्या, वाहतुकीचे नियम मोडण्याची चूक करू नका, इ. 

चंद्रग्रहणाचे अशुभ परिणाम टाळण्याचे उपाय  चंद्रग्रहण यथाशक्ती दानधर्म करा. इष्ट देवाचें स्मरण तसेच गरजूंना मदत करा. ग्रहण काळात घराबाहेर पडू नका. तसेच पितृपक्षात पितरांचे श्राद्धविधी यथोचितपणे पार पाडून त्यांना नैवेद्य दाखवून त्यांचे आशीर्वाद मिळवा, जेणेकरून तुम्हाला होणारा त्रास कमी प्रमाणात जाणवेल. 

( सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.)

टॅग्स :Lunar Eclipseचंद्रग्रहणsolar eclipseसूर्यग्रहणpitru pakshaपितृपक्षZodiac Signराशी भविष्यAstrologyफलज्योतिष