शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

Magh Mass 2023: पौषामुळे स्थगित झालेल्या शुभकार्यांना माघ मासामुळे मिळणार चालना; जाणून घ्या माघ मासाची महती आणि माहिती!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 11:37 AM

Magh Mass 2023: वसंताचे आगमन, गणरायचा उत्सव आणि भोलेनाथाची महाशिवरात्र यांनी सजलेला माघ मास २२ जानेवारीपासून सुरू!

२१ जानेवारी रोजी पौष मास संपून २२ जानेवारी रोजी माघ मास सुरु होत आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला अथवा तिच्या आधी किंवा नंतर 'मघा' नक्षत्र येते, म्हणून या मासाला 'माघ' असे नाव प्राप्त झाले आहे. याचे प्राचीन नाव `तप' असे आहे.  या मासातील बहुतेक व्रतांमध्ये पौष मासाप्रमाणे तिळाचा अधिक उपयोग केल जातो. भगवान शिवशंकराची महाशिवरात्री आणि कश्यप अदितीचा पुत्र म्हणून गणपतीने `महोत्कट विनायक' म्हणून ज्या तिथीला अवतार घेतला, ती विनायकी ही गणेशजयंती अशा पिता पुत्राच्या अवतारांनी हा माघ महिना सर्व शिवभक्तांना तसेच गणेशभक्तांना अतिप्रिय आहे. 

याशिवाय माघातील शुद्ध सप्तमीला येणारी 'रथसप्तमी' ही सूर्योपासकाां 'पर्वणी' वाटते. तर त्याच्या दुसऱ्या दिवशी येणारी भीमाष्टमी ही भिष्म पितामहांच्या श्राद्धकर्मासाठी आपल्या धर्मधुरिणांनी आग्रहपूर्वक तसेच आदरपूर्वक राखून ठेवल्याने भारतीय संस्कृतीचा एक वेगळा हृदयंगम असा पैलू अखिल जगाला दाखवून देते. 

कृष्णपक्षातील 'दासनवमी' ही समर्थभक्तांसाठी आणि समर्थ सांप्रदायिकांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. हा नेमक्याच परंतु अतिमहत्त्वाच्या तिथ्यांमुळे माघ महिना आपले वेगळे आणि महत्त्वाचे स्थान दाखवतो. या मासात विशेष कोणती व्रते नाहीत. तरीही त्याचे उत्साहाने स्वागत केले जाते. पौषामुळे साखरपुडा, मुंज, गृहप्रवेश इ. खोळंबलेल्या शुभ कार्यांना माघ मासामुळे पुनश्च चालना मिळते. 

माघ मासात वसंत ऋतूचे आगमन होते. वसंत ऋतू हा समस्त ऋतूंचा राजा. वसंताचे आगमन ही सृष्टीसाठीदेखील एक सुंदर कलाटणी असते. शिशिराची पानगळती संपवून वसंताची चाहूल लागताच कोकीळ कूजन कानावर पडू लागते. झाडावर फुटलेली नवीन पालवी वसंतोत्सवाची वर्दी देते. निष्पर्ण झालेली झाडे इवल्याशा पानांनी साजिरी दिसू लागतात आणि पाहता पाहता निसर्गाचे रूप पालटू लागते. याच काळात रसिकजनांना साहित्य संगीताची मेजवानी मिळावी, म्हणून वसंत व्याख्यानमाला, वसंत संगीत महोत्सव इ. कार्यक्रमांची आखणी केली जाते. दूरदर्शनपूर्वीच्या काळात  असे कार्यक्रम लोकांचे मनोरंजन आणि प्रबोधन करत असत. आजच्या मोबाईलयुगात या कार्यक्रमांचे स्वरूप पालटले असले, तरीही सातत्य कायम आह़े. 

माघ मासात दानाला अतिशय महत्त्व आहे. येनकेनप्रकारेण आपल्या हातून पुण्य घडावे, हा त्यामागील आशय आहे. आपल्या उत्पन्नाचा दहावा भाग समाजासाठी, देशासाठी खर्च व्हावा. कारण आपण जसे समाजाकडून घेत असतो, तसे आपण समाजाचे देणेही लागतो. व्रत वैकल्याच्या निमित्ताने ही छोटीशी परतफेड करावी, हा आपल्या संस्कृतीने आपल्यावर घातलेला संस्कार आहे.

याशिवाय माघ मासातील दिनविशेष आणि सण उत्सवांची महती आणि माहिती वेळोवेळी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूच, तुर्तास एवढेच!